नामास काळवेळ नसुन ते दोही पक्षाचा उद्धार करितें.
काळवेळ नामस्मरणासी नाहीं । दोही पक्ष पाही उद्धरती ॥१॥
रामकृष्ण नाम हें सर्व दोषांचें हरण करणारें असुन जड जीवांचा तारण एक हरिच आहे.
रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण । जड जीवां तारण हरी एक ॥२॥
या नामाच्या जिव्हेत हरिनाम सर असुन त्याचें महात्म्य कोण जाणेल ?
हरिनामसार जिव्हां या नामाची । उपमा त्य देवांची कोण वानी ॥३॥
पुर्वजांना ज्या योगानें वैकुंठमार्ग सोपा झाला तो हरिपाठ ज्ञानेश्वरमहाराजांनी सांग केला
ज्ञानदेवी सांग झाला हरिपाठ । पुर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥४॥