हरिपाठ - अभंग १८

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


हरिवंशपुराण हेच हरिनाम कीर्तन

हरिवंशपुराण हरिनाम कीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥

नामसंकीर्तन करणार्‍याला वैकुंठ जोडले

त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥

मनोमार्गानें मेला तो मनाला मुकुन हरिपाठी स्थिर झालेला असा घन्य होतो

मनोमागें गेला तो तेथे मुकला । हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥३॥

सर्वकाळ रामकृष्णाचे ठिकाणीं असलेल्या आवडीची गोडी ज्ञानेश्‍वर महाराजांना असुन त्यांना हरिनामाची जोडी झाली.

ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडीं सर्वकाळ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP