ब्रह्मानन्दे योगानन्द - श्लोक ८१ ते १००

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


तें ऐकुन राजास हसूं आले आणि म्हणाला काय वेडा ब्राह्मण आहे हा ! अरे केवळ संख्येच्या ज्ञानानें हजार रुपयांचें बक्षीस पटकावुन व्यावें ह्मणतोस काय ? असो ज्याप्रमाणें त्या ब्राम्हणाला अशेष वेदांचातत्वार्थ न समजतां केवळ संख्या मात्र समजली तसेंच आमच्या शंकाकारासहीब्रह्मची अशेंषस्वरुपज्ञान न होता केवळ ब्रह्म हा शब्द मात्र समजला तेव्हा तेवढ्यानें कृतार्थता कशी होईल. ॥८१॥

यावरही एक अशी शंका आहे कीं ब्रह्म अखंडेकरस आनंदरुप आहे येथें माया व तिचेकार्य याचा संपर्कच नाहीं, असें असून अशेष सशेष असें ह्मणण्याला तेथें जागाच नाहीं. ॥८२॥

तर या पुर्वपक्षकासार आह्मी असें विचारतों कीं ब्रह्म सच्चिदानंदरुप आहे इतके शब्द तोंडपाठ झाल्यानेंच पुरें आहे. कीं त्यांचा अर्थ समजला पाहिजे ? नुस्ते शब्द पाठ करुन कांहीं उपयोग नाहीं तेव्हा त्यांचा अर्थ चांगला समजला पाहिजे. ॥८३॥

बरें व्याकरणादिकांचे सहाय्याने अर्थही समजला तरी तेवढ्यानें कुठें; भागेंत त्याचा साक्षात्कार ह्मणून जो आहे तो राहिलाच तो झाल्यावांचून ज्ञान संपुर्ण होत नाहीं तसें संपुर्ण ज्ञान होऊन कृतार्थता होईपर्यंत सद्गूरुची सेवा केली पाहिजे म्हणूनच आह्मी अशेष हा शब्द घातला. ॥८४॥

असों आतां आपल्या विषयांकडे वळूं वास नानंदाची खुण हीच कीं नेहमींच्या व्यवहारामध्यें जेव्हा जेव्हां विषयांवांचून मनुष्यास सूख वाटतें तेव्हा तेव्हा तो ब्रह्मनंदाचा संस्काररुप वासनानंदन समजवा. ॥८५॥

विषयानंदातहीं असाच कांहीं प्रकार घटतो. कारण जेव्हा जेव्हा आम्हास विषयापासून आनंद होतो तेव्हा विषय मिळुन त्याची इच्छा शान्त झाल्यावर मनोव्रुत्ति अंतमुख होऊन त्यांत ब्रह्मनंदाचें प्रतिबिंब पडतें ॥८६॥

येणेंप्रमाणें ब्रह्मनंद वासनानंद आणि विषयानंद असे तीन आनंद या जगांत आहेत बाकी जे आनंद शस्त्रांत किंवा लौकिकांत आहेत त्या सर्वांचा समावेश या तिहींत होतो ॥८७॥

या तिहींपैकीं वासनानंद आणि विषयानंद या दोहोंची उप्तत्ति ब्रह्मनंदापासूनच आहे आणि तो ब्रहमनंद मात्र केवळ स्वयंप्रकाश आहे. ॥८८॥

येथ पर्यंत श्रुति युक्ति आणि अनुभव या तिहींच्या योगेंकरुन सूषुप्तिकाळीं ब्रह्मनंद स्वप्रकाश आहे असें सिद्ध केलें आतां दुसर्‍या वेळीं म्हणजे जागृतीमध्येही त्यांची सिद्धता करुं. ॥८९॥

सूषुप्तीत जो आनंदमय असतो तोच विज्ञानमय होऊन त्या त्या स्थानभेदाप्रमाणे स्वप्न व जागृति या दोन अवस्थेप्रत पावतो. ॥९०॥

तीं स्थानें हीं; जागृतीचें स्थान नेत्र स्वप्नाचें स्थान कंठ आणि सूषुप्तीचें स्थान हृदयकमळ येथें जागृतीचं स्थान नेत्र, स्वप्नाचें स्थान कंठ आणि उपलक्षण समजावें वास्तविक पाहतां चिदाभासहा आपादमस्तक देहाला व्यापुन राहतो. ॥९१॥

ज्याप्रमाणें तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यांत अग्नि व्यापुन राहतो तसा हा जीवही देहातादात्म्य पावुन मी मनुष्य असा निश्चय करुन जागृतीत असतो ॥९२॥

ह्म देहाच्या अभिमानास कारणीभूत अशा जीवाच्या तीन अवस्था आहेत. सूखी दुःखी, आणि उदासीन आह्मी जें कर्म करितों त्यांची फलें दोन प्रकारचीं एक सूख वाटणें दुसरें दुःख वाटणें, आणि स्वाभाविक जो जीवाची स्थिति ते औदासिन्य. ॥९३॥

या सूखदूःखाचे दोन प्रकार आहेत ब्राह्मविषयभोगापासून होणारीं सूखदुःखें मनोराज्यपासून होणारीं सूखदुःखें आणि सूखही नाहीं, आणि दुःखही नाहीं ह्मणजे दोहोंमधील जी फट त्या फटीस तृष्णी स्थिति असं म्हणतात. ॥९४॥

आज मला कशाची काळजी नाहीं मीं सूखी आहे. असें म्हणून प्रत्येक मनुष्य निजानंदाचें भान उदासीन स्थितीमध्यें प्रकट करितो. ॥९५॥

परंतु हा निजानंद मुख्य म्हणतां येत नाहीं. हा केवळ त्याची वासना म्हणजे संस्कार आहे कारण तेथें मी अशा सामान्य अहंकाराचें अच्छादन आहे. ॥९६॥

ज्याप्रमाणें गार पाण्याने भरलेल्या भाड्यांचा बाहेरील भाग थंड लागतो, पण तें काहीं प्रत्यक्ष पाणी नसतें तर केवळ तो पाण्याचा एक गूण आहे. आणि त्या गूणावरुन पाण्याच्या अस्तित्वाचें अनुमान करितां येतें. ॥९७॥

त्याप्रमाणें शास्त्रांत सांगितलेल्या योगाभ्यासानें अहंकाराचें जसजसें विस्मरण होत जाईल तसतसें सूक्ष्म दृष्टीस निजानंदाचें अनुमान करितां येईल. ॥९८॥

असं विस्मरण होतां होतां अगदीच अहंकार सूक्ष्म होतो. तेव्हा साक्षात्ब्रह्मनंदाचाच अनुभव होतो. ही स्थिति निद्रा आहे अशी कोणी शंका घेऊं नये. कारण निद्रेंत अहंकार अगदी लीन म्हणजे नाहींसाच होतो. तसा येथें होत नाहीं कारण तसें होईल तर निद्रेप्रमाणें देह लागलाच पडेल. ॥९९॥

जेव्हा द्वैतही भासत नाहीं आणि निद्राही नाहीं अशा वेळीं जें सूख भासतें तोच ब्रह्मनंद असे भगवंतांनीं गीतेंत सांगितलें आहे. ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP