तें असें की हे अर्जूना हळू हळू धैर्ययुक्त बुद्धिनें मनाचा उपरम करुन आत्म्यावरत्यांची स्थापना करावी. आणि मग कांहीं एक चिंतन न करितां स्वस्थ बसावें हाच योगाचा परमावधि. ॥१०१॥
त्याचा कम असा कीं ज्या ज्या विषयापासून मन उठुन दुसर्या विषयाकडे धांवतें तोंच त्याला तेथुन ओढुन आणून आत्म्यावर आणून बसवावे. कारण तें पार चंचळ आणि अस्थिर आहे. ॥१०२॥
याप्रमाणें मन शांत झालें असतां मनामधील रजतमादि कल्मष नाहींसे होऊन हें सर्व ब्रह्मच आहे असं त्या योग्यास ज्ञान होऊन उत्तम सूखाची प्राप्ति होते. ॥१०३॥
त्या वेळेस योगाभ्यासने चित्ताचा निरोध झाल्यानें त्याचा उपरम होऊन आत्म्याकडे त्यांची दृष्टी परतते आणि आपल्यामध्येच आपण तो सूख पावतो. ॥१०४॥
तें सूख आंतीद्रिय असून केवळ बुद्धीस मात्र ग्राह्म असतें याप्रमाणें एकदां आत्म्यावर योग्याचे मनाची स्थापना झाली असतां तो स्वरुपापासून ढळत नाहीं. ॥१०५॥
अशी आत्मप्राप्ति झाल्यावर त्यापेक्षा त्याला दुसरा कोनाचा ही लाभ अधिक वाटत नाही. आणि एकदा त्याची आत्मस्वरुपाशी चिकाटी बसली म्हणजे शस्त्रवातासारख्या भयंकर दुःखाच्यानेहीं त्याला तेथुन हालवितो येत नाहीं. ॥१०६॥
या योगांत दुःखाचा संयोग मुळींच नाही. वैराग्ययुक्त चित्तानें मुमुक्षुनें याचें अनुष्ठान करावें. ॥१०७॥
याप्रमाणें सदां सर्वदा आत्म्याचें अनुसंघान करणारा पापरहित योगी आत्यातिंक जें ब्रह्मसूख ते अनायासानें पावतो. ॥१०८॥
मनोनिग्रह कठिण आहे ह्मणीन बसून उपयोग नाहीं. टिठिभपक्ष्यानें समुद्रानें नेलेलीं आंडीं परत मिळाली ह्मणोन आपणामध्यें आणि समुद्रामध्यें अंतर मुळीच न पाहतां कुशाग्रेंकरुन त्याचा एकेक बिंदु उसपण्याचा प्रयत्न धैर्य न सोडतां चालविला असतां तो जसा शेवटीं सिद्धिस गेला. त्याप्रमाणें मनाचा निग्रहही खचित सिद्धिस जाईलच जाईल. ॥१०९॥
मैत्रायणी नामक यजूःशाखेमध्यें शाकायन्य नामक मुनीनें आपला शिष्य जो बृहद्रथ राजा यास समाधीनें मुख प्राप्ति होते. अशाविषयीं पुष्कळ उपदेश केला आहे. ॥११०॥
तेथें त्यांनी असें सांगितलें आहे कीं सर्व काष्ठादिक इंधन जळुन गेल्यावर ज्वाला शांत होऊन अग्नि जसा नुस्ता तेजामान राहतो त्याप्रमाणे घटपटादिक वृत्तीचा क्षय झाला असतां चित्ताचें रजमत्व जाऊन तेंकेवळ सात्विक होऊन राहते यालाच मनोनाश ह्मणतात. ॥१११॥
याप्रमाणें आपल्या कारणाच्याठायीं मनाची शान्ति होऊन केवळ आत्म्याकडुच त्याचा ध्यास लागून विषयापासून तें परतलें असतां अर्थातच कर्मापासून होनारी सर्व दुःखें मिथ्या ठरतात. ॥११२॥
कारण आमचा सर्व प्रपंच मनाचाच केलेला आहे, ह्मणून त्या मनाचें शोधन प्रयत्नानें केलें पाहिजे ज्या विषयाकडे मनूषयचें मन लागलें तन्मय तो होतो. हें गूढ कांहीं आजकालचें नव्हें तर अनादिकालापासून चालत आलें आहे. ॥११३॥
चित्ताची शुद्धि होऊन ब्रह्मनुसंधान त्यास लागलें म्हणजे सर्व शुभाशुभकर्माचा नाश होऊन मनुष्याचे चित्त प्रसन्न होऊन आत्मस्वरुपीं त्याला अक्षय सूख मिळतें. ॥११४॥
प्राण्याचें चित्त जसें विषयांवर लागलेलें आहे तसं ब्रह्मवर लागेल तर कोण बरें मुक्त होणार नाहीं ? ॥११५॥
मनाचें प्रकार दोन. एक शुद्ध आणि अशुद्ध जेव्हा तें कामक्रोधांनी भरलेल्या असतें तेव्हा तें अशुद्ध आणि त्याहीं करुन रहित असतें तेव्हा तें शुद्ध समजावें. ॥११६॥
मनूष्याच्या बंधमोक्षांस कारण मनच आहे. ते विषयासक्त झाल्यानें मनूष्य बंधांत पडतो. आणि तें निर्विपय झाल्यानें मुक्त होतो. ॥११७॥
समाधीच्या अभ्यासनें ज्याचा मल धुवुन टाकलेला आहे व ज्याचा प्रवेश आत्मस्वरुपी झाला आहे, त्या चित्तास जें सूख होतें त्यांचे वर्णन वाणीनें करणें अशक्य आहे तें स्वतः अन्तःकरणानेच ग्रहण करावयाचें. ॥११८॥
हा समाधि चिरकाल राहणें जरी कठीण आहे तथापि तो क्षणभर मिळूं शकतो तेवढा ब्रह्मनंदाचा निश्चय करण्यास बस आहे. ॥११९॥
या आनंदाचा निश्चय होण्यास श्रद्धा आणि व्यसन ही दोन साधनें अवश्य आहेत. व्यसन म्हणजे एका कामाच्या पाठीस लागलें असतां तें होईपर्यंत चैन नसणे तो एक केवळ निश्चय झाला असतां तो तसाच सर्वदां आहे अशी खात्री होते. ॥१२०॥