गुरुवार प्रातःस्मरण - प्रारंभीपासून भजन - गुरु...

हरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .


प्रारंभीपासून भजन - गुरुराया मजवरी ०।

उठि उठि बा पुरुषोत्तमा । भक्तकामकल्पद्रुमा ।

आत्मारामा निजसुखधामा । मेघश्यामा श्रीकृष्णा ॥१॥

भक्तमंडळी महाद्वारी । उभी तिष्टत श्रीहरि ।

जोडोनिया दोन्ही करी । तुज मुरारि पहावया ॥२॥

संत सनकादिक नारद । व्यास वाल्मिक ध्रुव प्रल्हाद ।

पार्थ पराशर रुक्मांगद । हनुमान अंगद बळीराजा ॥३॥

झाला प्रातःकाळ पूर्ण । करी पंचांग श्रवण ।

आला मुदगलभट ब्राह्मण । आशीर्वचन घे त्याचे ॥४॥

तुझा नामदेव शिंपी । घेउनि आला अंगी -टोपी ।

आता जाऊ नको बा झोपी ।

दर्शन देई निजभक्तां ॥५॥

नानापरीचे अलंकार । घेउनि आला नरहरि सोनार ।

आला रोहिदास चांभार । जोडा घेउनि तुजलागी ॥६॥

सुगंध सुमने पुष्पांजली । घेउनि आला सावंतामाळी ।

म्हणे श्रीहरिपदकमळी । अनन्यभावे समर्पू ॥७॥

कान्हुपात्रा नृत्य करी । टाळछंदे साक्षात्कारी ।

सेना न्हावी दर्पण करी । घेउनि उभा राहिला ॥८॥

लिंबुर हुरडा घेउनि आला । तो हा माणकोजी बोधला ।

दर्शन द्यावे बा त्याजला ।

भक्त भोळा म्हणवुनि ॥९॥

मीराबाई तुझेसाठी । दूध -तुपे भरुनि वाटी ।

तुझे लावावया ओठी । लक्ष लावुनि बैसली ॥१०॥

नामदेवाची जनी दासी । घेउनि आली तेलतुपासी ।

तुज न्हाऊ घालण्यासी । उभी ठेली महाद्वारी ॥११॥

गूळ -खोबरे भरुनि गोणी । घेउनि आला तुकया वाणी ।

वह्या राखिल्या कोरड्या पाणी । भिजो दिल्या नाही त्वा ॥१२॥

आला चोखामेळा महार । स्वामी करीतसे जोहार ।

त्याचा करोनिया उद्धार संतमेळी स्थापियला ॥१३॥

हरिभजनाविण वाया गेले । ते नरदेही बैल झाले ।

गोर्‍याकुंभारे आणिले । खेळावया तुजलागी ॥१४॥

गरुडपारी हरिरंगणी । टाळमृदंगाचा ध्वनि ।

महाद्वारी हरिकीर्तनी । तल्लिन कान्हा हरिदास ॥१५॥

निजानंदे रंगे पूर्ण सर्वहि कर्मे कृष्णार्पण ।

श्रीरंगा निजतनु अर्पण । चरणसेवा करीतसे ॥१६॥

भजन - गुरुवरा सदगुरुवरा ०।

सदा माझे डोळां , दिसो तुझी मूर्ति । हीच माझी आर्ति , गुरुराया ॥१॥

सदा माझे मुखी , वसो तुझे नाम । चालवावा नेम , गुरु० ॥२॥

सदा माझे कानी , तुझे गुणगान । नको त्याहुनि आन , गुरु० ॥३॥

सदा माझे हस्ते , घडो तुझी पूजा । नको भाव दुजा , गुरु० ॥४॥

सदा माझे मन , राहो तुझे ध्यानी तूच माझा धनी , गुरु० ॥५॥

कलिमलदहना , सत्यज्ञानानंता । कृपा करी आता , गुरु० ॥६॥

भजन - मजला उद्धरि ०।

पूरण प्रेम लगा दिलमे जब । नेमका बंधन छूट गया ॥धृ०॥

कोयी पंडितलोक बतावत है , समझावत है जगरीत नको ।

जब प्रीतमसे दृढ प्रीत भयी तब , रीतका बंधन छूट गया ॥१॥

कोयी तीरथ परसन जावत है , कोयी मंदिरमे नित दरसनको ।

घटभीतर देव दीदार हुवा तब , बाहरसे मन रुठ गया ॥२॥

कोयी जीव कहे कोयी ईश कहे कोयी , गावत ब्रह्मनिरंजनको ।

जब अंदर बाहर एक हुवा तब , द्वैतका पडदा फूट गया ॥३॥

सोही एक अनेक स्वरुप बना परिपूरण है जलमे थलमे ।

ब्रह्मानंद करे गुरुदेव दया भवसागरका भय ऊठ गया ॥४॥

भजन - जगदीशा ०।

दत्त निरंजन गा सदोदित ॥धृ०॥

सत्यसुखाची दृढ इच्छा तरी । दृष्या भुलसी का गा ॥१॥

कामक्रोधादि घोर अरि हे । मार्गी करिति बहु दंगा ॥२॥

दत्ता विसरुनि घालिसी किती तू जन्ममरणपिंगा ॥३॥

दत्तभजनानंदी रमता । पावसि भवभंगा ॥४॥

कलिमलदहन गुरुपदकमली । यमुना सरस्वती गंगा ॥५॥

भजन - श्रीकृष्ण चैतन्यप्रभु नित्यानंदा ०।

श्रीगुरु दत्तात्रय अवधूत । मारी सोटा जाई भूत ॥धृ०॥

गौरवर्ण विशाल नयन , तीन शिरे सहा हात ।

रुद्राक्षमाळा कंठी विराजे , सवे श्वान भुंकत ॥१॥

खाके झोळी भगवी छाटी , अंगावरी शोभत ।

दंड कमंडलु धरी हाती , सर्वांगी विभूत ॥२॥

काशी स्नान करी करवीरी भोजन , शयन करी माउलीत ।

कलिमल दूर करोनि भक्तां , अखंड आनंद देत ॥३॥

भजन - तुमबिन गुरुजी ०।

संदेशा आ गया यमका चलनकी कर तयारी है ॥धृ॥

बाल शिर के हुये धोले सपेदी आंखपर छाई ।

श्रवणसे सुन पडे उंचा दात हिलनाभी जारी है ॥१॥

कमर सब हो गयी कुबडी चले लकडी सहारे है ।

गयी सबी देहकी ताकद लगी तनमे बिमारी है ॥२॥

छुटी सब प्रीत पिरियाकी पुत्र सब हो गये न्यारे ।

बने सब मित्र मतलबके झूट लोकनकी यारी है ॥३॥

करो जगदीशका सुमरन भरोसा राखके मनमे ।

वो ब्रह्मानंद है तेरा एकहि सहायकारी है ॥४॥

भजन - सच्चिदानंद कृष्ण ०।

जाणो सदगुरुपाय आम्ही ॥धृ०॥

गुरुचरणाविण या भवसागरी । नाही तरणोपाय ॥१॥

कर्म धर्म व्रत तीर्थे नेणो । न जाणो अन्य उपाय ॥२॥

अमृत त्यजुनि कांजी पिणे । कोण करील व्यवसाय ॥३॥

सिद्धारुढपदी शिर नमविता । कलिमल दूर जाय ॥४॥

भजन - चला चला रे सर्व मिळोनि ०।

शेवट गोड करी ०। ते विज्ञापना - पान १५ व १६

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP