गुरुसंस्था - दीक्षा व प्रकार

मंत्रशास्त्राकार जगन्नाथपुरीचे ब्रह्मीभूत पूज्य श्रीशंकराचार्य योगेश्वरानंदतीर्थ ह्यांचा हा मंत्रसाठा सिद्ध आहे ,


दीयते ज्ञान सद्‌भावः क्षीयते पशुवासना ।

दान क्षपण संयुक्ता दीक्षा तेनेह कीर्तिता ॥

आत्मस्वरूपाचें ज्ञान देणें व पशुवासनेचा क्षय करणें हीं दोन्ही कार्ये साधण्याचा प्रयत्न ज्या साधनानें साध्य होतो त्या साधनाला दीक्षा असें म्हणतात .

इंद्रियविशिष्ट भोगांची लालसा मनुष्यमात्राच्या ठय़ीं जन्मतःच असते व हे इंद्रियजन्य भोग इंद्रियें शिथिल झालीं तरीं अन्योन्य उपायांनीं भोगण्याची इच्छा पुरवून घेण्याचा मनुष्य प्रयत्न करीत असतो . उदाहरणार्थ . विडा किंवा लाडू चावतां येत नाहीं तर विडा किंवा लाडू कुटून खाणें , दांत पडले तर दुसरे दांत लावणें , एक बायको मेली तर दुसरी , तिसरी , चवथी करणें . इंद्रियें शिथिल झालीं तर इंद्रिय जागृतिकरितां माकडें मारून त्यांच्या शिरांचा उपयोग करणें . इत्यादि अनेक प्रकारांनीं प्रयत्न करून इंद्रियभोग सुखाकडील प्रवृत्ति जोंपर्यंत कमी होत नाहीं तोंपर्यंत मनुष्यप्राणी सुधारलेला पशूच होय . तेव्हां अशा नरपशूच्या पशुवासना नष्ट होण्याचें साधन दीक्षा हें होय .

मंत्रशास्त्र हें योगशास्त्राचेंच एक अंग आहे असें पूर्वी प्रतिपादन केलेलें आहे . म्हणून योगशास्त्रांतील निरनिराळ्य दीक्षांचें वर्णन देण्यांत येत आहे . मंत्रशास्त्रांतील दीक्षा व योगशास्त्रांतील दीक्षा यांचें बरेंच साम्य दिसून येतें , परंतु हें साम्य ज्या दीक्षांत अवलोकनांत येत नाहीं , अशाच योगशास्त्रांत कोणकोणत्या दीक्षा आहेत त्यांचा विचार करूं .

योगशास्त्रांत कुमारदीक्षा ही मुख्य दीक्षा होय . कारण भूलोकांत दीक्षा देण्याचें काम कुमारांकडे सोपविलेलें आहे . हे कुमार पांच आहेत . सनक , सनातन , सनंदन , सनत्कुमार व सनत्सुजात असे ते पांच कुमार होत . सप्त लोकांतील सप्तदेशांकरितां निरनिराळे कुमार दीक्षा देण्याकरितां योजलेले आहेत . त्यांपैकीं भूर्लोक ही प्रथम रेषा होय . तिला . वासुदेव रेषा असें म्हणतात . या वासुदेव रेषेंतील जीवांनां दीक्षा देण्याकरितां वरील कुमारपंचकापैकीं सनत्कुमार यांची योजना केलेली आहे . या दीक्षेंत मनुष्याच्या मनोमय कोशांत जागृत असलेल्या आत्म्याचा साक्षात्कार करून देण्यांत येतो . कुमारदीक्षेचे तीन भेद आहेत , ते असेः नाददीक्षा , मंत्रदीक्षा अथवा विद्यादीक्षा व विद्याधिदेवतादीक्षा अथवा भगवद्रूपदीक्षा .

नाददीक्षाः भूर्लोकांतील पंचमहाभूतांपैकीं सूक्ष्मतम भूत म्हणजे आकाश हें होय . अशा आकाशा शरीरांत जीवात्म्याचा वास म्हणजे आकाश हें होय . अशा आकाश शरीरांत जीवात्म्याचा वास असतो . आकाश -तत्त्वाचा गुण शब्द हा आहे . म्हणून आकाश शरीरांतील परिमाणूंत स्पंदन उत्पन्न व्हावें व त्या स्पंदनानें जीवात्म्याला बोध होण्याकरितां नाददीक्षेची योजना आहे . नाददीक्षेची अंगभूत लघुदीक्षा , " आकाशे खेचर आग्नेयादित्य चंद्रमसः " म्हणजे खेचरीदीक्षा -अग्निदीक्षा , सूर्यदीक्षा व चंद्रदीक्षा अशा नाददीक्षांच्या अंगभूत लघुदीक्षा आहेत . आणि ’ कटपयथी ’ या पद्धतीनें गणना केली तर एकंदर २६२ दीक्षा होतात .

विद्यादीक्षा अथवा मंत्रदीक्षाः ही दीक्षा झाल्याबरोबर शिष्याला जो मंत्र सांगितला असले , तो दीप्तमंत्र होतो . या दीक्षेनें शब्दाचे सत्य अर्थ समजून येतात , ही दीक्षा सिद्ध झाली म्हणजे साधकाला स्वरोदय परिचित ज्ञान व दूरदर्शन ह्या सिद्धि प्राप्त होतात . मंत्राक्षरांचा उच्चार झाल्याबरोबर आकाशफलकावर त्या मंत्रोच्चरित शब्दांचे ठसे उमटतात व चंद्रभानुलोकांत त्याच शब्दांचीं प्रतिबिंबें उमटतात व त्या चंद्रभानुलोकांत ह्या मृत्युलोकांत उच्चारलेल्या ज्या ज्या शब्दांचे ठसे उमटलेले असतात त्यांचें ज्ञान साधकाला प्राप्त होतें .

विद्याधिदेवतादीक्षाः ह्या दीक्षेनें साधकाला मंत्रवर्णित देवतेचा साक्षात्कार होतो . ह्या दीक्षेच्या साधनानें देवतेच्या रूपाचें दर्शन होतें . म्हणून ह्या दीक्षेला भगवद्रूपदीक्षा असें म्हणतात .

नारायणदीक्षाः हि शेवटली दिक्षा होय .या दीक्षेंत भगवान नारायण ऋषी स्वतः दीक्षा देतात व यालाच वासुदेवरहस्य असें संबोधण्यांत येतें . तंत्र ग्रंथांत समयीदीक्षा , योगदीक्षा , साधकदीक्षा लोकधर्मिणीदीक्षा व मोक्षदीक्षा अशा दीक्षांचें वर्णन येतें .

समयीदीक्षाः सांप्रत गर्भाधान , पुंसवन , अन्नप्राशन , उपनयनादि संस्कार योग्य तर्‍हेनें होता नाहींत . यामुळें योनीबीज , आहार , देश यांची शुद्धि दीक्षेपूर्वी करावी लागते व ती शुद्धि गुरु मंत्रशक्तीनें करून घेतात . उपनयन करण्याचे वेळीं उपवीत देत असतात . मंत्राच्या साह्यानें आत्म्याशीं जीवाचा संबंध घडवून आणतां येतो . नंतर गुरूंनीं शिष्याचें प्रोक्षण व तारण करावें व नंतर रेचक करुन आपल्या देहांतून निघून शिष्याचे देहांत जाऊन वासनामय शरीरांतील पुर्यष्टकेच्या ग्रंथी शिथिल कराव्या व त्या ग्रंथी नष्ट करून पुर्यष्टका मस्तकांत सहस्त्राराजवळ स्थापन करावी व शिष्याच्या जीवाला आपल्याशीं अभेद रूपांत आणून त्याचेकडून ह्लदयांतील ब्रह्य , कंठांतील विष्णू , तालूंतील रुद्र , भूमध्यांतील ईश्वर , ललाटांतील सदाशिव , ब्रह्यरंध्रांतील परब्रह्य या देवतांचें सामरस्य करून द्यावें व अशा तर्‍हेनें ईश्वराराधनेचा मार्ग शिष्यास सांगावा .

वर लिहिलेल्यांशिवाय आणखी पांच प्रकारच्या दीक्षा आहेत . त्या अशाः क्रियावती , वर्णमय़ी , कलावती , वेधमयी , सांप्रदायिकी . कलावती दीक्षेंत स्पर्शदीक्षा , वाग्‌दीक्षा आणि द्दग्‌दीक्षा अथवा चाक्षुषीदीक्षा असे भेद आहेत . अशा दीक्षा देण्याचें सामर्थ्य ज्यांचे ठायीं आहे तेच खरे सद्‌गुरु होत . द्दरदीक्षा अथवा द्दष्टिदीक्षा -चाक्षुषीदीक्षा -" चक्षुरुन्मीत्य यत्तत्वं ध्यात्वा शिष्यं समीक्षते , पशुबंध विमोक्षाय दीक्षेयं चाक्षुषी मता ." स्पर्शदीक्षा म्हणजे स्पर्श केल्याबरोबर प्रकाश साक्षात्कार होणें , वाग्दीक्षा म्हणजे वाक्‌सिद्धीनें शिष्यास अमुक मंत्र तुला सिद्ध झाला असें म्हटाल्याबरोबर शिष्याला तो मंत्र सिद्ध होणें हें होय . द्दग्‌दीक्षा म्हणजे शिष्याच्या द्दष्टीशीं आपली द्दष्टी लावून जी दीक्षा दिली जाते ती द्दग्‌दीक्षा होय . वैधीदीक्षा म्हणजे शिष्याचे ठायीं षट्‌चक्रांचा अनुभव देणें अशा त्या दीशा होत .

योगदीक्षाः या दीक्षेंत पाशशुद्धि वा अध्वाशुद्धि करावी लागते . लोकधर्मिणीदीक्षा -या दीक्षेनें संचित व क्रियमाण कर्मांतील अशुद्धांश नष्ट होतात . शुभ फलयोग भोगल्यावर आणखी भोगांची इच्छा असल्यास ऊर्ध्व लोकांत त्या साधकास पाठवितां येतें व शेवटीं वैराग्य प्राप्त झाल्यावर श्रेष्ठ लोकांतील अधीश्र्वराचेसह राहून सायुज्यमुक्ति प्राप्त होते . योगदीक्षा ही सबीज , निर्बीज व सद्योनिर्वाणदायिनी अशा तीन प्रकारची असत . निर्वाणदीक्षा स्त्री , बाल , अंध व रोगी यांकरितां आहे . यांत गुरुभक्तीच्या साधनानें मुक्ति प्राप्त होते . हिलाच पर्यंकदीक्षा असेंही म्हणतात .

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP