पूर्वार्ध - अभंग २०१ ते ३००

श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.


पथभ्रष्ट स्वतः असतां । पूर्ण योगी ज्ञाता । म्हणुनि भासवी जगता । एक नंबरचा ॥२०१॥
मीही असाच न जाणी । एका कृष्णाविना कोणी । पण निरापागलपणीम । हें बोलणें ॥२॥
योगांत सामर्थ्य पूर्ण । शक्ती राही असीम । आनंदमयी परम । शान्ती अपार ॥३॥
पागर नटांना आराधितो । संस्कृतीचा भंग करतो । असा योगी नसतो । ना पूर्ण अँक्टरही ॥४॥
नांव व्हावें म्हणून । मिळविण्या उच्च आसन । व्हावे अपार भोग संपादन । बहुत धनप्राप्तीही ॥५॥
आणतो योग उपयोगांत । त्यापेक्षां जार-स्त्री बहुत । देहविक्रीनें जरी जीवन वेंचीत । श्रेष्ठ असे की ॥६॥
वीस मण खाणें हत्तीचें । ढेरभर तसेंच उंटाचें । खाणें घोडेबैलांचे । किती असे ॥७॥
पोट आपुलें सहज भरती । अर्था शेर तें असे किती । मुक्तानन्दा, तेवढयासाठीं । योगा कां विकसी ॥८॥
बहुत बड्या मासळीयुक्त सागर । जयांचा पुष्कळ आहार । सहज परी खाती पोटभर । देवदयेनें ॥९॥
मुक्तानंदा तव आहार । केवळ अर्धा शेर । योग कां वापरणार । पोट भरण्या ॥२१०॥
योगाचें निदान । दयेनें करण्या दान । देण्या कृपेनें आशिर्वचन । योग असे कीं ॥११॥
शिकविण्या कारुण्य भावांनीं । आपणास ऋषीमुनींनीं । अहेतुकपणें देऊनि । ठेविला असे जो ॥१२॥
योगाची त्रयमंत्र संयम प्राप्ती । पूर्ण असतां योगी प्रती । ब्राह्म वस्तु संग्रहरीती । करणें कशाला ॥१३॥
योगी योगबल सर्वसंपन्न । योग असे परिपूर्ण । सर्व लक्षणमय जाण । अनपेक्षित स्वतंत्रही ॥१४॥
काया असे निरोगपूर्ण । तसाच राही व्यवहार संपूर्ण । निर्दोषपूर्णही जीवन । योग्याचें किती ॥१५॥
निवृत्त योगी अलौकिक । असे सार्वाभौमिक । महाखतन्त्र कितीक । होऊनि वर्ते ॥१६॥
स्वतंत्रता इंद्रियांची । स्वतंत्रता चित्ताची । स्वतंत्रता व्यवहाराची । ना ज्याच्यामध्यें ॥१७॥
जन-खतंत्रता पूर्ण नाहीं । मुक्तानन्दा, ज्याच्या ठायीं । क्षणोक्षणीं परतंत्र राही । तो योगी नाहीं ॥१८॥
मठ गुरुहीन । प्रजा राजाहीन । शासना विना गृहिणी सुखहीन । सर्वज्ञ वदती ॥१९॥
वेदान्त कथितो । सर्वब्रह्म प्रसार असतो । सममान म्हणुनि तो । सर्वांचा करावा ॥२२०॥
घेई जो समदर्शन । सर्वांचा ठेवी सम्मान । अन्य कोणतें पूजन । हवें करण्या ॥२१॥
सम्मानानें सर्वत्र । बनती सर्व मित्र । प्रेम राही वर्धत । सम्मानानें ॥२२॥
सम्मान असा ह्रदयांत । करी प्रेमरस प्रवाहीत । मुक्तानंदा, सम्मानाचें व्रत । पाळ तूं म्हणुनि ॥२३॥
करणें सर्वांचा सम्मान । कर्तव्य मानीती महान । जो असे बुद्धीमान । त्याची ही रीत ॥२४॥
ज्ञानीचें आचरण । दे सर्वां सम्मान । दीक्षा घे तू म्हणुन । सम्मानाची ॥२५॥
साधुसंतांनीं केला सम्मान । राजांनींही केलें तें पालन । कुलशीलतेचें संपादन । होतें सम्मानानें ॥२६॥
मुक्तिनगरीचें द्वार । सम्मान असे खरोखर । मुक्तानंदा, आत्मसात कर । सम्मानाला ॥२७॥
प्राप्त होइ सद्‍बुद्धी । निजप्रज्ञेचीही वृद्धी । साध्य अभेद योगादी । सम्मानानें ॥२८॥
सम्मानही सौंदर्य । दैवी संपदाच होय । प्रभावी त्याचें कार्य । केवढें असे ॥२९॥
करी अंतःकरण-पूर्ण शुद्धी । नष्ट होइ भेदबुद्धी । म्हणुनि सम्मानाचा निधी । प्राप्त करी ॥२३०॥
करण्या पूजन । लगण्या ध्यान । घडण्या स्नान । सम्मान साधन ॥३१॥
परमानंदाचें निधान । सर्व कांहीं सम्मान । करूं नको अनमान । तयालागीं ॥३२॥
शीक करण्या सम्मान । होतो परमेश्वर प्रसन्न । शुद्ध होइ सारें अंतःकरण । सम्मानपूर्ण सेवेनें ॥३३॥
सम्मानपूर्वक लावी शास्त्रार्थ । तेणें पूरें ज्ञान प्राप्त । मुक्तानंदा, सदासुखी जीवनार्थ । नित्यानंदांचा सम्मान ॥३४॥
करी सदा समता प्राप्त । समताही राम सत्य । कमाई कर नित्य । समतेची ॥३५॥
समता संपदा दैवी । समद्दष्टीनें सर्वां पाही । तीच ब्रह्मद्दष्टीही । असे म्हणुनि ॥३६॥
समतावान तो । रामामधीं रमतो । योगी प्राप्त होतो । समतेला ॥३७॥
समता ही पूर्ण सुखनिधी । समतेमध्यें लावी समाधी । मुक्तानंदा, समतेची बुद्धी । पूर्ण ब्रह्म नित्यानंद ॥३८॥
समतेनें नष्ट विषमता । वैषम्य़नाशें चित्ताची स्थिरता । मुक्तानंदा, स्थिरचित्ती निर्विकारता । प्राप्तव्य जें आहे ॥३९॥
असे जेथें समता । वसे तेथें एकाग्रता । चित्ताची प्रसन्नता । तेणें होई ॥२४०॥
जाण प्रसन्न चित्ता । परिपूर्णतेचा ज्ञाता । मुक्तानंदा, म्हणुनि समता । प्राप्त करी ॥४१॥
अयोध्येचा राम । गोकुळाचा श्याम । समतेचे परमघाम । असती पाही ॥४२॥
शिव श्रीनीलकंठ । समतेचें रूप प्रगट । मुक्तानंदा, जप उत्कट । समतेला नित्य ॥४३॥
पूर्ण प्रज्ञा प्रदाता । यज्ञरूप इच्छित फलदाता ।’ प्राप्त करी पूर्ण समता ’ । आज्ञापिती नित्यानंद ॥४४॥
समतेमध्यें राही रमत । सुभद्र नगरी सुरक्षित । समताचि स्नानतीर्थ । मलशुद्धी तेणें पूर्ण ॥४५॥
समताग्नींत होतां दहन । पाप हो भस्म पूर्ण । निघे तावुन सुलाखुन । व्यक्तित्व सारें ॥४६॥
नित्यानंदामृत हा सागर । समताजल पिऊनि वारंवार । मुक्तानंदा हो तूं अमर । अविनाशी ॥४७॥
समतेमध्यें वसे परमश्वेर । समता तूं प्राप्त कर । विषमता कर दूर । सदासाठीं ॥४८॥
समतेंत निजशान्ति । योगी भक्तज्ञानी घेती । समतेमध्यें विश्रांति । ह्याचसाठीं ॥४९॥
श्रीगुरु नित्यानन्दच ती । समतामुळीं असती । पूर्णब्रह्मत्व इति । जाणुनि घेई ॥२५०॥
मंत्र उदय पावतो । वृत्तीचा अस्त होतो । पूर्णपणें लोपतो । समतेमध्येंच ॥५१॥
जीव जगजीवनाची । उत्पत्तिस्थीतिलयाची । तोंडमिळवणी सार्‍याची । होते समतेंत ॥५२॥
नित्यानंद स्वरूपच समता । होशील सुखी प्राप्त करतां । सर्व विषमता, निष्ठुरता । समता नसतां ॥५३॥
होई श्रीगुरुकृपेस पात्रा । थांबेल सहज संसारसत्र । रसहीन संसार सर्वत्र । कृपेविना कसें सुख ॥५४॥
पावेल कधीं का मूर्ख नर । गुरुकृपेविना खरोखर । पद ऐसें अमर । परमानन्दाचें ॥५५॥
नित्यानंद कृपा जी । सहजासहजीं । तारी संसारामाजीं । करुनीया पार ॥५६॥
असतां हरिकृपा पूर्ण । नर बने नारायण ।  पुरा खो देऊन । जीवत्वाला ॥५७॥
शिवकृपाप्रभाव । बनवी नराला शिव । संसारसागर सर्व । तरूनी जाई ॥५८॥
विद्येनें मूढ बने प्रज्ञावान । गुरुकृपेनें मुक्तानंद । पावुनि परमानंद । बनुनि जाई पूर्ण ॥५९॥
पावोनि गुरुकृपाप्रसाद । विषयोन्मुक्त झाला गोपीचंद । एकलव्य धनुर्विद्यापांरगत । कृपाप्रसादें झाला ॥२६०॥
कृपाप्रसादें गोपीचंद । पावला अमरपद । निद्रा घे अशी सुखद । गुरुसुखनिद्रेत ॥६१॥
गुरुकृपेवीण । हो रसहीन । बन जीवन । शुष्क सारें ॥६२॥
मानव भोगी पुरा । पूर्ण दुःखभोग सारा । संसारभ् रोग खरा । गुरुकृपा नसतां ॥६३॥
म्हणुनि तूं मुक्तानन्द । गुरुकृपाप्रसाद । अमरतेचें पदा । पावुनि घेई ॥६४॥
नराचा नारायण । जीवाला ब्रह्मपूर्ण । मर्त्यास अमर बनवुन । ठेवी कृपाजी ॥६५॥
त्या कृपेवीण । सारें जीवन । केवळ मरण । नसे का ॥६६॥
गुरुकृपाप्रसाद । दे कुण्डलिनी वरद । जीवनविकास-साद । तेणें लाभे ॥६७॥
जीवनाचा विकास । परमानन्दप्राप्ती खास । नसे जागा संयमास । थोडी सुद्धां ॥६८॥
तर गुरुकृपाहीन । नरकांतला किडा बनून । भवकूपांत बुडुन । पुरा जाइ ॥६९॥
रडत रडत जीवन । घालविलें गुरुकृपेवीण । मुक्तानन्दा, शांती म्हणुन । कसली निळाली ॥२७०॥
श्रीगुरुची कृपा । बने भवसागर नौका । मोक्ष नगरीचा चौक फुका । करी प्राप्त ॥७१॥
देते अढळ पद । नित्यानन्दपद । मुक्तानन्दा, गुरुकृपाप्रसाद । मिळवी ऐसा ॥७२॥
लाभता हरीगुरुप्रसाद । पावशी । सहज अमरपद । अंतःकरण प्रसन्न हो तद । ब्रह्मविद्याही तेणें ॥७३॥
मूर्तिमन्त प्रसादरूप । परमेश्वर स्वरूप । परमात्मस्थिती प्राप्य । प्रसादानें ॥७४॥
गुरु नित्यानन्दांचा । प्रसाद पावुनि साचा । अमर झाला मर्त्याचा । मुक्तानंद ॥७५॥
कायाशुद्धि प्रथम कर । इंद्रियनिग्रह तदनन्तर । सत्कर्म तिसरा शुद्धिप्रकार । अंतःकरण प्रसाद लाभे ॥७६॥
प्राणापानानें करी शुद्धता । अजपाजप सदोदिता । सहस्त्रनामपाठ गाऊनि गीता । मन वचन हो शुद्ध ॥७७॥
महाप्रसाद भगवन्नामांत । परब्रह्म शिवशुद्ध वैष्णवांत । श्रद्धा नाहीं होत । प्रसादाविना ॥७८॥
प्रसादें होऊनि प्रसन्न । परमेश्वर दे स्वरूप दर्शन । नित्यानन्द प्रसाद प्राप्त करून । सुखशांती पावशी ॥७९॥
परमेश्वर प्रसादीं व्याप्त । परमात्मा जाण प्रसादांत । महाप्रसाद मंत्रप्रसादवत । गुरुप्रसाद भाग्योदय ॥२८०॥
गुरु प्रसादावीण । न करीशी संसार-तरण । नित्यानंद प्रसाद ग्रहण । करी जीवनमुक्त ॥८१॥
यज्ञ प्रसाद गुरुप्रसाद । महान राही मंत्र प्रसाद । फळतां हरी गुरु प्रसाद । गोष्ट महान ॥८२॥
प्रसाद जेथ पूरला ।  कायापालट पुरा झाला । मुक्तानन्द सहजयोग पावला. । नित्यानंद प्रसादें ॥८३॥
पूर्ण तृप्ती आत्मानंदीं । स्थिर न हो जधीं । प्राप्त करी तो अवधी । प्रसादातें ॥८४॥
आपुल्या आपणामध्यें । संतृप्ति पावणें । हाच पूर्णपणें । खरा प्रसाद ॥८५॥
आपण भूलोनि । अन्य कोण ढुंढोनि । नको राहं होऊनि । दुःखी ऐसा ॥८६॥
आपुल्यास आपुला करी । निजस्वरूपीं भरी । गुरुअ नित्यानंदांचा तरी । पावशी प्रसाद ॥८७॥
श्रीगुरु प्रसाद रूप । जेथ असन तद्रूप । सुळावरीही शांती स्वरूप । पावशी मुक्तानंद ॥८८॥
गुरुप्रसाद करीत । मनाला आनंद मस्त । कैवल्याचें पद देत । आणि अन्तीं ॥८९॥
मानसिक द्वंद्वाची करामत । काय काय राही करीत । न कोणीही जाणत । कधीं कांहीं ॥२९०॥
दुःखभोग कोठपर्यंत । भोगण्या अन् लावीत । गुरुकृपेवीण बहुत । कठीण जीवन ॥९१॥
गाइ गुरुगुण । जपी गुरुस्मरण । करी गुरुध्यान । सदोदीत ॥९२॥
इष्ट दैवत । ह्या जगतांत । गुरुच होत । परम आराध्यही ॥९३॥
गुरु ज्ञानाचें मूळ । गुरु जगताचा शूल । आत्मतृप्ती लाभेल । गुरुप्राप्तीनें ॥९४॥
निजान्यपूर्ती गुरुकडुन । मुक्तानंदा आपुला मान । कुलदेवतेसमान । श्रीगुरूला ॥९५॥
गुरुच ब्रह्मविद्या । गुरूमध्यें योगविद्या । असेही मंत्र विद्या । गुरूमधेंच ॥९६॥
गुरु दे करून । प्राप्त खरें ध्यान । मुक्तानंदा, सर्व विद्यांची खाण । गुरुदेवच होत ॥९७॥
सेवेमध्यें गुरुसेवा । जप गुरुनामाचाच करावा । ध्यानयोग साधावा । गुरुमूर्तीध्यानानें ॥९८॥
पूजावें तर गुरुपाद । गुरुपूपा मुक्तानन्द । सर्व सिद्धीप्रद । असे कीं ॥९९॥
गुरु सत्य, गुरु नित्य । गुरु प्रेम गुरु अमृत । गुरुप्रेमरसपान करीत । मुक्तानन्दा अमर होइ ॥३००॥

N/A

References : N/A
Last Updated : July 01, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP