उत्तरार्ध - अभंग ५०१ ते ६००

श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.


अंतराकाशीं महामंत्र । सदासर्वदा गुंजे सर्वत्र । जिव्हेविना अत्रतत्र । उमटे बोल ॥१॥
अमृतरस उमडे ऐकतां त्यातें । ध्यानद्वारा ह्रदयकाशीं ऐकूं येते । मस्तीनें मन नाचुं लागतें । मगा मुक्तानंदा ॥२॥
ह्रदयाकाशीं अजपाजप । होत राही आपोआप । अजपानादरस ओरपा । मुक्तानंद ॥३॥
हा रस मधुर अती । जे तो सेवीती । ते मानव न मरती । ना पुन्हा जन्मती ॥४॥
संसारींचे सर्व रस । अंतरनादाचेच सरस । ह्या रसाविना निःरस । मुक्तानंदा असली रस सेवी ॥५॥
नादरस महारस । मुक्तानंदा हा अमृतरस । मृत्यु जिंकतो विनासायास । ध्यानसमयीं सेविल्यास ॥६॥
ध्यानसाधना पूर्ण साधन । आपुलेंच करी ध्यान । मुक्तानंदा परशिव पूर्ण भरून । तुझा तुझ्यांतच ॥७॥
मस्तकीं सहस्त्रारांत । परशिवशक्ति विहरत । मुक्तानंदा । मुक्तानंदा ध्यानमार्गें तेथपर्यंत । जाऊनि पोहच ॥८॥
रुची ढुंढत बाह्य सौंदर्यांत । घालविले वृथा दिन बहुत । मुक्तानंदा रुची तर अंतर मनांत । ध्यान करी ध्यान करी ॥९॥
क्षणोक्षणीं असे बदलत । हें परिणामशील जगत । न चळुं  देतां चित्त । ध्यान करी पुन्हा पुन्हा ॥५१०॥
गहरी अंतरर्मुख-वृत्ती । मुक्तानंदा असेल चढती वाढती । बाह्य आकर्षण न गमे किंमती । ह्या प्रलोभनयुक्त जगत्तीं ॥११॥
सोडी विश्वाआभास भ्रांति । तशीच नश्वर जगत क्रांति । चिन्मात्रव्याप्त स्फुरण मस्ती -। साथा श्वूश राही ॥१२॥
बाह्य विषयीं रमणारी । गुरुकृपाप्राप्त इंद्रियें सारीं । धीरतेनें प्रवेशती अंतरीं । सुखानें ॥१३॥
ह्रदयींचा अन्तर प्रदेश । मुक्तानंदा पारमेश्वरीय देश । सत्वार करी अंतरीं प्रवेश । ध्यानयोगानें ॥१४॥
लाभे निद्नेंत अल्पशांती । मुक्तानंदान ही सर्वांची अनुभूती । तरी ध्यानप्राप्त पूर्ण शांती । निःशंकपणें न मानिती ॥१५॥
निद्रेमध्यें न जागृती प्रयोजन । जागृतींत निद्रा नसुन । मुक्तानन्दा शांतिविना अन्य न । प्रवेशी तुरीयामध्यें ॥१६॥
सुखदुःख लाभहानी । कारण अवस्था वृत्ती असोनी । केवळ अन्तर ध्यानावस्थेंतूनी । राही पूर्ण परमानंद ॥१७॥
परम शांतीसाठीं करी ध्यान । असशील त्याच अवस्थेंतून । अधिक कशाची गरज न । ध्यानासाठीं ॥१८॥
रात्र होतां सहज झोंपणें । तसेंच जेथल्या तेथें विसावणें  । क्षणभरी चित्तास गुंगवणें । मुक्तानंदा निजध्यानीं ॥१९॥
ध्यानास हवी ध्यातृत्व वृत्ती । ना अपेक्षा अन्य कशाची ती । मुक्तानन्दा सप्रेमें अती । ध्यान करी ध्यान करी ॥५२०॥
आकाशीं घेणारा भरारी । पक्षी ठेवी लक्ष भक्ष्यावरी । सत्वर खालीं उतरी भूमीवरी । भक्षण्या तें भक्ष्य ॥२१॥
धनुष्याचा बाण सहज उडावा । तसाच योगी तन्मय व्हावा । परप्रकाश दर्शनही पावावा । ही अपेक्षा ॥२२॥
सहज होउं दे पापपुण्यास । आपुल्या आपण प्राप्ता नाशास । निर्विकल्प अन्तर प्रेरणेस । पावतां ध्यान सहज ॥२३॥
पराधीनतेनें होणारी । बाह्येन्द्रिय क्रियांत रमणारी । मनोवृत्ती तुझी सारी । मुक्तानन्दा ॥२४॥
अन्तर प्रविष्ट करूनि पुन्हा पुन्हा । लागुं दे अन्तर्ज्योति-ध्याना । महासुखरूप परादशा विज्ञाना । अनुभवी आंतुनी ॥२५॥
चित्ताची तीच चितीस्फूर्ती । सर्वत्र सर्वीं एकच ध्यान वृत्ती । जर चितीच चित्तरूप सांगाती । ध्यान काय वा उत्थान ॥२६॥
स्व तुझा सोऽहम् मंत्र । स्व तुझें ध्यान स्वतंत्र । ध्यान ध्येय ध्याता स्व एकत्र । मुक्तानन्दा निज गुरुही स्व च ॥२७॥
रसमय भगवान । जगत त्याचें बाह्य प्रसरण । व्यापक जगदीश म्हणुन । जगच असे ॥२८॥
मुक्तानन्दा स्व वरी ध्यान । परमेश्वराचेंच संशोधन । अमृत राही केवढें भरून । तव अंतरीं ॥२९॥
स्व ध्यान राम ध्यान । स्व पूजा देव पूजन । गुरुचरण वन्दन । स्व-वन्दन ॥५३०॥
स्व-चिन्त । महामंत्र पुरश्चरण । मुक्तानन्दा स्व महान । स्व तें ओळखी ॥३१॥
स्व ध्यान गंगास्नान । स्व ध्यान नाना पूजन । महासुकृतपूर्ण स्व ध्यान । मुक्तानन्दा स्व तें ध्यायी ॥३२॥
योग उपासना स्व ध्यान । स्व ध्यान सर्व तीर्थस्नान । स्व-ध्यान नित्यकर्मपूर्ण । मुक्तानन्दा, सोऽहम् ध्यायी ॥३३॥
स्व ध्यान यज्ञयागमहान । शाश्वत धर्मोपासना पूर्ण । मुक्तानंदा करी सोऽहम् ध्यान । रमुनी जा त्यांत ॥३४॥
स्व ध्यान रामध्यान । कृष्णध्यानही स्व ध्यान । स्व ध्यान शिवपूजन । जाणुनी घेई ॥३५॥
स्व ध्यान महायज्ञ । सोडी अन्य ध्यान । करी स्व चेंच अनुसंधान । मुक्तानंदा हेंच साधन ॥३६॥
स्वध्यानीं मी तें दवडवी । सर्वांतरीं स्वतःतें मेळवी । मुक्तानंदा त्याची प्राप्ती करावी । स्वसमर्पणानें ॥३७॥
रक्तज्योती औट हात । तव स्थूल शरीररूउपांत । तीतें आत्मध्यानांत । पाही ॥३८॥
देखे इदम् म्हणुनी । प्रत्यक्ष पाहिल्यावाचुनी । अनुभवाविना बोलुनी । लाभ नसे कांहीं ॥३९॥
करी आत्म्याचें नित्य ध्यान । पाही अंगुष्ठप्रमाण सूक्ष्म तन । श्वेत ज्योतीचें निवासस्थान । निद्रालोक ॥५४०॥
मुक्तान्दा निज अंतरीं । प्रत्यक्ष तनु वितरी । न ती माहीत जरी । दुसर्‍याची कशी कळे ॥४१॥
अंगुलीच्या पेराएवढें । निजकारण शरीर तेवढें । कृष्णवर्णाचें रमणीय केवढें । सखोल ध्यानी पाही ॥४२॥
मुक्तानन्दा तें मूल कारण । परिणाम ज्याचा जन्म मरण । ह्याहुनीही पुढें जाण । स्वरूप दिसे ॥४३॥
ह्रदयाकाश मध्यंतरीं । अंगुष्ठप्रमाण गुहा काशांतरी । आसमानी नील प्रभा पसरी । नीलेश्वरी ॥४४॥
ती दिव्यानंद स्त्रवी । जिव्हेनें तूं रसास्वाद सेवी । ध्यानमग्न होतां करवी । रसपान ॥४५॥
मसुर दाण्याएवढा । महानील महान केवढा । सर्व शरीर मूल तेवढा । तव आत्म्याचा ठिकाणा ॥४६॥
मुक्तानन्दा सप्रेमें करी ध्यान । तव नील प्राप्त करून । सर्व प्राप्तीही लाभून । जाइ तेणेंकरून ॥४७॥
दिलदार चमक । ह्रदयींची दमदमा दमक । निजमस्तीदर्याची अस्मानी झांक । अन्तरीं प्रवेशुनी पाही ॥४८॥
करूनि चित्त ध्यानमग्न । नीलाकाश घे पाहुन । चिन्मय राही चमचम  चमकुन । मुक्तानंदा हरघडी ॥४९॥
ह्रदयमध्य दिव्य चमकांतरी । नीलप्रभा भासे साजरी । तें पवित्र नील रश्मीस्नान करी । नको बाह्य रसहीन कांहीं ॥५५०॥
बहात्तर हजार नाडींत । नील चमक चमकती सतत । मुक्तानंदा कां स्वतःतें महान समजत । तेजहीन मलिन बहिरंगीं ॥५१॥
संसाराची चमक । बलवानाची धमक । रूपवान मुखडा सुरेख । सुंदर कांतीचा ॥५२॥
कवीची कलापूर्ण चमक । मुक्तानंदा नील प्रकाशाविना नाहक । जणु अमावास्येची झलक । काळ्या रात्रीची॥५३॥
कंगाल हो धनी, मूढ विद्यावान । गुणहीन गुणी, रसहीन रसवान । जेथ नीलमणी प्रसरे प्रभावान । तेथ जाती हे बनुन ॥५४॥
जेथून न माधारा । जेथ पोहचतां रड संपणार । जेथ आबादी आबाद राहणारा । मुक्तानंदा तो सच्चिन्मय नीलिमा ॥५५॥
सहस्त्रारींचे महातेज । तेथील चिन्मय मंदिरीं सतेज । तव प्रिय नीलमणीची शेज । ध्यानद्वारा गवसे ॥५६॥
उर्ध्वाकाशी तिलवत नील । चमकती करूनी प्रतीक्षील  । मुक्तानंदा तव यात्रा कोठील । चालली असे ॥५७॥
अंतरींची चमकती आस्मानी। प्रभा पाही  रसमयी तेजस्विनी । मुक्तानंदा आत्मतेज स्वरूपिणी । हीण अंतर आस्मानी ॥५८॥
हा निर्मल सर्वज्ञ । जयांतरी परमात्मा महावेगवान । फकीरीपणें कां तुडविसी वनोवन । मुक्तानंदा नीलाला  घे शोधून ॥५९॥
स्वांतरीं चिन्मय-नीलेश्वरी । तेथ येती जाती हरहरी । मुक्तानन्दा अपरिचित त्यांना तरी । स्वतःतें शहाणा मानीसी? ॥५६०॥
लहान मूर्ती । महती । अणुहुनी छोटा किती । परी सामर्थ्यवान अती ॥६१॥
निज आत्मा । व्यापक सर्वात्मा । मुक्तानंदा नीलेश्वर सप्रेमा । सख्यत्व त्याशीं असूं दे ॥६२॥
न कळत सर्वत्र । तव असे मित्र । न जपतांही त्याच्या मंत्र । रक्षक तुझा आहे ॥६३॥
तुज नसे ठावें । जीवन तुझें विसावे । नीलातीत चित‍स्फूर्ति प्रभावे । म्हणुनी मुक्तानंदा ॥६४॥
छोटयाहुनी छोटा पूर्ण । मोठयाहुनी मोठा पण। परमशुद्ध संपूर्ण । मलिनामध्येंही ॥६४अ॥
हा अंतर चिन्मय । सर्वीं पूरा समाना होय । मुक्तानंदा त्याचेंच नसे काय । सर्व सारेंही ॥६५॥
न द्दग्गोचरा दिसे । म्हणुनि परमात्मा नसे । भ्रम नाहक असे । पसरवूं नकोस ॥६६॥
सहस्त्रारामध्यें पाही । परमात्मा तेथ राही । परिपूर्ण सर्वात्मकही । मुक्तानंदा जाणुनी घेई ॥६७॥
मूलाधार चक्रमध्यांत । षट्‍चक्रभेदनांत । समान रूपानें व्याप्त । राहुनी ॥६८॥
सहस्त्रारी बोधगमन मध्यस्थी । नीलेश्वराची उपस्थिती । जगाची उदय लय स्थिती । त्याचेंच कर्तृत्व असती ॥६९॥
तयाचें सौंदर्य पाही । तेथ मानव मस्ती राही । पूर्ण वास करूनही । अनुभवें कळों येई ॥५७०॥
सहस्त्रार-सहस्त्रसूर्य रश्मी । तेज प्रकाशक परमनील प्रेमी । मुक्तानंदा तयांचें दर्शन ये कामीं । महाभाग्योदयाच्या ॥७१॥
नीलात्मा न नर ना नारी । न छोटा वा मोठा भारी । मुक्तानंदा तो स्त्रीपुरुषरूपधारी । स्त्रीपुरुष बनले त्यापासुनी ॥७२॥
नील बिंदु सिंधु परम । सच्चिन्मय नीलिमा सप्रेम । मुक्तानंदा तोच कृष्ण राम । सर्वांचेंही परमधाम ॥७३॥
योगसिद्धीचा उदय । संयारभ्रमाचा अस्त होय । प्रज्ञा स्थिती प्राप्तीचीही सोय । नीलमणीच्या- प्रथेनेंच ॥७४॥
पराभक्तीचा महारस । प्रज्ञास्थिरतेचा सरस । वेदांतोक्त ब्रह्मानंद सुरस । जो असे ॥७५॥
इंद्रियांचा उल्लसित विषयानंद । ह्या सर्वाहुनी महान नीलानंद । परम दिव्य प्रेमानंद । जाणुनि घे मुक्तानंद ॥७६॥
मंत्र चैतन्याची शुद्धी ती  । योगाची सिद्धी, गुरुची भक्ती । मुक्तानंदा मानवाची पूर्ण विश्रांती । नील निरंजन होय ॥७७॥
योगांग पूर्ण समाधीरूपानें । वेदान्त पूर्ण समजण्यानें । तसेंच तत्त्वज्ञान समतेनें । नीलेश्वरीच्या पूर्ण दर्शनानें ॥७८॥
भक्ति होते रसवान । योगा होई समतापूर्ण । आनंदमया बने ज्ञान । नीलेश्वरी कृपेनं ॥७९॥
ह्रदयीं परम शांत । पाही प्रभायुक्त चित्त । तंद्रालोक भविष्ययुक्ता । राहतसे ॥५८०॥
सर्वज्ञलोकीं समज पुराअ । मुक्तानंदा हा प्रकार सारा । अनुभवण्यानें मानव बने खरा । ईशस्वरूप ॥८१॥
हा नील बिंदु । असे महासुख सिंधु । ज्ञानीयांचा ज्ञानानंदु । जाण ॥८२॥
प्रेमानंद । योग्यांचा योग्यांचा योगानंद । सच्चिन्मय नीलिमा, मुक्तानंद । देवतांमधील महादेव ॥८३॥
रामाचा राम, कृष्णाचा कृष्ण । देवांचा देव, दर्शनांचें लक्षपूर्ण । मुक्तानंदा ध्यानाचें ध्येय संपूर्ण । अंतरींची नीलिमा ॥८४॥
ज्ञानीची गती मती । मुक्तानंदा सारी स्थिती । ज्ञानी होतां ज्ञात  होते ती दूरूनी नाहीं ॥८५॥
ज्ञानीची राहणी सहज बालवता । बालक केवळ स्वस्वरूप विस्मृत । ज्ञानी स्वरूप करी ज्ञात । विधिनिषेधपार जाऊनी ॥८६॥
ज्ञानी स्वयंपूर्ण ब्रह्म । त्यातें कशास नियमधर्म । करी स्वेच्छा क्रीडारत कर्म । नामरूपरहित होऊनी ॥८७॥
सोडी देहाभिमान । ममतेचा त्याग करून । शब्द मात्र घे समजुन । निंदाप्रशंसा ॥८८॥
निरिच्छ, नियमित । मुक्तानंदा योगी योगमुक्त । सहज जीवनमुक्त । समजावा ॥८९॥
राही जनीं, असे एकला । आत्मरंगीं सदा रंगला । असा पुण्यात्मा जीवनमुक्त जाहला । वितरी एकाकी जीवनाला ॥५९०॥
श्रीगुरु नित्यानंद कृपापात्र । नगर गणेशपुरी वैकुण्ठमात्र । योगशक्ति महापीठ स्वतंत्र । पृथ्वीवरील सिद्धलोक ॥९१॥
महापुण्यानें नरतनु पावला । महानक्षेत्र गणेशपुरीस पातला । भूवैकुण्ठ-सिद्धलोकरहिवासी झाला । नित्यानंदांच्या ॥९२॥
कमी भाग्यानें, गर्वमदानें । गणेशपुरीला सोडुनि अभिमानानें । जर जाशी बाहरे मूर्खपणानें । स्वतें गमावशील ॥९३॥
पूर्व पुण्याईनें । महान तपस्येनें । सहजप्राप्त आशीर्वादानें । नरतनु ही ॥९४॥
सहजच निर्मल गणेशपुरीला । मुक्तानंदा निवास लाभला । धैर्य त्याग प्रेमानें लायकीला । वाढवुनी राही ॥९५॥
तुझा वास यथायोग्य  । जेथ राही नित्यानंद साम्राज्य । निवासी त्याचा जो लोक दिव्य । त्यास कंगाल न प्रिय ॥९६॥
गणेशपुरीच्या अणुअणूंत । झळकणारी महान चमकत । तिची भगवती कुण्डलिनी व्याप्त । पूर्णपणें ॥९७॥
मुक्तानंदा असा हा भूवैकुण्ठ । चितीलोक संपूर्ण सुस्पष्ट । सोडुनि कशास फिरसी कोठ । रसहीन जगतीं ॥९८॥
अंतर रसाला तेथ । करूनि घे प्राप्त । पूर्ण समाधानयुक्त । जो आहे ॥९९॥
गणेशपुरी प्रकट । मुक्तानंदा स्वर्गलोक इष्ट । पस्तावण्या जाशी फुकट । कशास कोठें ॥६००॥

N/A

References : N/A
Last Updated : July 01, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP