अंक दुसरा - प्रवेश दुसरा

‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जाते.


[ स्थळ : शाहजहानचा दिवाणखाना, पडादा वर जातो, तेव्हां रंगभूमींवर शाहजहान, दाराशुकोह, जगन्नाथ व लवंगिका हीं पात्रें दिसतात. शाहजादी लंवगिका, आसनस्थ शाहजहानचे पाय घट्ट धरून, करूणा भाकीत आहे, असें हश्य दिसतें ]

शाहजादी : अब्बाजान, रहेम कीजिये, मै माफी चाहती हूं ! आमच्या चोरच्या मुलाखतीबाबत इतके खफा होऊं नका, दया करा. अबाजान, रात्रींअपरात्रीं आक्रंदन केल्यानं बागवानाची झोपमोड आणि आपल्या प्रेमाचा बोभाटा होईल, हें बुलबुलांच्या जोडीला ठाऊक का नसतं ? पण मोहब्बतीनं पागल झालेले निराशेनं घायाळ झालेले ते जीव, आपलं मन आवरूं शकत नाहींत!. नदी!. दर्याकडे सरळच धांव घेते, वांकडी चाल ठीक नाहीं, हें तिला माहीत का नसतं ? पण वाटेंत पहाड आडवे आले, तर तिला नाइलाजानं वांकडं वळण घ्यावंच लागतं !

शाहजहान :  ( उद्वेगानें ) लेकिन‌ तुमची ही मोहब्बतीची बेफाम नदी, सिर्फ वांकडं वळणच घेत नाहीं, तर या शाहेजहाँच्या दिलचा पहाडहि फोडते आहे !

दारा : गुस्ताकी माफ जहाँपन्हा, महापुरांत मोठमोठीं झाडं गदगदा हाल्तात, पण त्यानंच पहाडहि डलमळूं लागला, तर कसं चालेल ? शिवाय, आपण मानतां तेवढा कांहीं हा पेंच मुष्किल नाहीं.

शाहजहान :  ( उपहासानें ) तुमच्यासारख्या अवलिया महंतांना कसलाच पेंच मुष्किल नाहीं ! वेद माननारा काफर अन‌ कुराण मानणारा मुसलमान या दोहोंनाहि समान लेखणारे तुम्ही !

दारा : अलबत‌, त्यांत गैर काय आहे अब्बाजान ?

अपौरुषेयं ग्रंथोस्माकं कुराणं
सिद्धानां वेद इत्युच्यते

असां माँ म्हटलं आहे, तें झूट आहे का ?

शाहजहान : तें झूट आहे कीं नाहीं हा सवाल नाहीं दारा ! हे बुलंद खियाल किताबांतच शोभून दिसतात. अस्मानांतील सूरज अस्मानांत असला तरच ठीक. जमिनीवर आला तर सारी दुनिया खाक होईल !

दारा : लेकिन अब्बाजान, त्याच्या सुनहरी किरणांनींच जमीन शानदार दिसते; दुनिया जिवंत राहाते ! किरणांच्या रूपानं सूर्य जमिनीवर उतरतो, तसेच दिलदार वागणुकीनं धर्मग्रंथ दुनियेंत उतरले पाहिजेत ! जहाँपन्हा, लवंगी और जगन्नाथ यांच्या शादीस मंजुरी देऊन आपण अच्ची दिलदारी दाखवा. असे खफा होऊं नका अब्बाजान ! राणा दिलशीं--एका हिंदु नर्तकीशीं--मीं शादी करण्याची परवानगी मागितली. तेव्हां आपण असेच दिलगीर झालां होतां. लेकीन‌ आपण अखेर रहेम केली. परवानगी दिली. तशीच परवानगी माझ्या मानलेल्या बहिणीला.

शाह्जहान : तेव्हां माझी गफलत झाली होती.

दारा : ( हंसून ) मग तशीच गफलत, तशीच चूक, फिरून एकदां होऊं द्या !

शाहजहान : [ संतापानें ] दारा, ये मजाककी बात नहीं हैं, हा सिर्फ मजहबचा सवाल नाहीं; हा राजकारणाचा सवाल आहे. शाहजादीची शादी एका बिरहमन‌ शायराशीं लावण्यास परवानगी दिली. तर आपले मुललमान सरदार केवढे बिथरतील, तुमचे आमचे छुपे दुष्मन केवढी बेदिली माजवतील याचा विचार करा, दारा, ज्यांना राज्य करायचं आहे, त्यांची नजर दूर आणि जिगर पोलादी पाहिजे !

दारा : बेशक‌ बादशहांचा कलेजा पोलादासारखा सख्त पाहिजे, लेकिन‌ जहाँपन्हा, तो दुष्मनांसाठीं-- जिगरदारांसाठीं नव्हे ! बादशहांचा कलेजा जसा पोलादासारखा सरूत पाहिजे, तसाच वेळ पडल्यास फुलासारखा मुलायमहि पाहिजे !. तशीच वेळ आतां आली आहे. या आशिकांच्या भावना नाजुक दिलानं अन‌ हमददींनं जाणून आपण हा पेंच सोडवावा अब्बाजान,

शाहजहान : पेंच सोडवायल आम्ही तयारच आहोंत, निकाल लाबायल आम्ही तयार आहोंत . लेकिन, एका शर्तीवर, ( लवंगिकेस ) जगन्नाथराय आपल मजहब सोडून पैगंबराच्या पाक पंथांत येत असतील, तर मी त्यांच्याशीं तुझी शादी लावून देण्यास तयार आहे, हें मीं तुला कलबलं होतं, पण त्याचा जबाब तूं दिला नाहींस .

शाहजादी : काय जबाब देणार ? जगन्नाथरायांना ही शर्त कबूल नाहीं.

शाहजहान : शर्त कबूल नही ?

जगन्नाथ : नाहीं, नाहीं, नाहीं. बिलकुल मंजूर नाहीं. शाहजादीशीं माझं लग्न न झालं. तरी माझं प्रेम तिलभरहि कमी होणार नाहीं आणि तिचंहि माझ्यावरील प्रेम अढळ राहील. पण केवळ जड देहाच्या मीलनासाठीं, बुद्धीस पटलेला, मनांत ठसलेला नि थोर पूर्वजांपासून परंपरेनें चालत आलेला पवित्र धर्म मीं विकला, तर पुरुष या संज्ञेसच मी अपात्र ठरेन, आणि मग अशा पौरुषहीन नरपशूवर शाहजादीच काय, पण सामान्य स्त्रीहि प्रेम करूं शकणार नाहीं. केवळ एखाद्या सुंदरीचा हात विवाह--पूर्वक हातीं घेण्यासाठीं धर्मांवर लाथ मारणार्‍याला आपण नादान म्हणणार नाहीं का ?

शाहजहान : बस‌ ! फिर ये क्यों नही कहते, कि हमे इस्लामसे नफरत‌ है ?

दारा : नहीं नहीं, जगन्नाथरायका दुष्मन‌ भी ये इल्जाम नहीं लगा सकता ! इस्लाम--धर्मचाच काय, प्ण ईश्वराकडे नेणार्‍या कोणत्याच धर्मपंथाचा जगन्नाथरयांना द्वेष वाटत नाहीं. अब्बाजान, ह्यांना मुसलमान धर्माचा द्वेष नि तिरस्कार वाटत असता, तर ह्यांनीं ‘ अल्लोपनिषद‌ ’ लिहून अल्लाचा गौरव केला असता का ?

शाहजहान : तो फिर ‘ अल्लोपनिषद‌ ’ लिहिणार्‍या शायरानं अल्लाच्या प्यार्‍या धर्मांत कां येऊं नये ?

जगन्नाथ : जहाँपन्हा ! एखादा धर्म सर्वश्रेष्ठ वाटल्यामुळें तो आपखुषीनें स्वीकारणं वेगळं. नि एखाद्या ऐहिक स्वार्थासाठीं तो स्वीकारणं वेगळं. माझ्या बुद्धीला नि मनाला इस्लामधर्म सर्वश्रेष्ठ वाटल असता, तर तो मी आपण होऊन स्वीकारला असता. पण राजकन्येचि विवाहमाल गळ्यांत पडण्याच्या मतलबी हेतूनं स्वधर्माचा सौदा करणं निंध नाहीं का ? जहाँपन्हा, आपल्यावर असाच प्रसंग आला असता तर.
शाहजहान : असे भलते सवाल मुगले-आझम‌ शाहेहाँला विचारतां ? तुम्ही स्वतःला समजतां तरी कोण ?

जगन्नाथ : एक सीध्या चालीचा सामान्य माणूस ! आपला एक प्रजाजन, जहाँपन्हां -पण स्वप्नांत दिलेलं वचन पाळणार्‍या राजा हरिश्वंद्राचं गुणगान करणरा ! वडिलांकडून वचनभंगाचं पाप घडूं नये, म्हणून चौदा वर्षें वनवास भोगणार्‍या श्रीरामचंद्राला आदर्श पुरुषोत्तम मानणारा !!

शाहजहान : खामोश‌ ! अशीं बडीं बडीं नांवं पुकारलींत, तरी आम्ही गफलतींत येणार नाहीं. शाहजादीच्या नि तुमच्या शादीस आम्हीं  परवानगी देणं अशक्य आहे, सिर्फ इतनाहीं नाहीं, तुम्हांल दिल्लींतून हद्दपार करण्याचा हुकूम मला फर्मावावा लागेला, मानलेली का असेना, पण लंवगिका माझी वेटी आहे. तिची शादी मी काफर हिंदूशीं होऊं देणार नाहीं, मग तो ‘काफर’ हिंदु कितीहि गुणी असो, पंडित असो, बुलंद--खियाल शायर असो !

जगन्नाथ : कांहीं हरकत नाहीं, माझा आत्मा शाहजादीच्या चरणाशीं दिलींत तडफडत ठेवून, मी दिल्लीच काय, पण आपलं सांर साम्राज्य सोडून दुसरीकडे निधून जायला तयार आहे ! पण जहाँपन्हा, “ आपल्या प्रेयसीच्या स्मृतीसाठीं प्रेमाचं जगप्रसिद्ध संगमरवरी स्मारक उभारीत असलेले मोगल सम्राट आपल्या मुलीच्या प्रेमाचं थडगंहि तितक्याच कुशतेनं उभारूं शकतात  ” अशी अपकीर्ति दुनिवेच्या बाजारांत पसरणं योग्य आहे का, याचा आपणच विचार करावा, आपण माझ्या हद्दपारीचा हुक‍म तरी कशाला काढतां ? हा पाहा, या विश्वमोहक आमिषासाठींहि स्वतःचा धर्म न सोडण्याचा गुन्हा केलेला हा जगन्नाथ, दिल्ली सोडून निघून जात आहे ! जहाँपन्हा, या अपराध्याचा हा अखेरचा मुजरा घ्या आणि ( लवंगिकेस ) लंवंगिके, माझा देह कुठेंहि भटकत असला, तरी माझं मन तुझायापाशींच घुटमळत राहील, हें माझं अखेरचं वचन स्वीकार ! नमस्कार. ( जाऊं लागतो. )

दारा : ठहरिये जगन्नाथ, ठहरिये !

शाहजादी :  ( पुढें सरसावून ) जाऊं नका. जगन्नाथ, जाऊम नका ! माझी कसम आहे तुम्हांला, जांऊ नका ! ( जगन्नाथ थबकतो. शाहजादी शाहजहानकडे वळून ) अब्बाजान, इन्साफ नि इन्सान यांची कदर करनारे, असा तुमचा अस्करा अलम दुनियेंत गाजत असतांना, माझ्याच बाबतींत असे कां कठोर होतां ? तुम्हीं मला बालपणापासून पोटच्या पोरीप्रमाणं वाढविलं, तें काय अपेशी मोहब्बतीचा खंजीर माझ्या दिलांत खुपसण्यासाठीं  ? त्यापेक्षां एक लखलखीत कटयार घ्या आणि जगन्नाथरायांच्या--माझ्या प्रेमदैवताच्या--पायाशीं माझे तुकडे तुकडे तरी करून टाका !

शाहजहान : इतनी परेशान मत हो बेटा ! आपला मजहब सोडून दुसर्‍याच्या मजहबांत शिरणं बेइज्जतीचं आहे.

दारा : लेकिन. जगन्नाथांच्या बाबतींत मात्र तें इज्जतीचं आहे, असंच ना आपलं म्हणणं ? आपणांसारख्या थोर बादशहांनीं, एकाला एक न्याय अन‌ दुसर्‍याला दुसरा न्याय लावणं ठीक दिसत नाहीं. अब्बाजान, जो पतीचा धर्म तोच आपोआप पत्नीचा धर्म बनतो, हें परंपरेनेंच शाबीत केलं आहे. आपल्या आजोबांनी--थोर अकवर बादशहांनीं--जोधाबाईशीं शादी केली. तेव्हां हा धर्माचा पहाड आड आला नाहीं ! इतकंत कशाला. आपली माता--उदयसिंग राठोडांची वंशपताका बालमती--यांची शादी जहांगीर बादशहांशीं झाली, तेव्हांहि मजहबी बंधन बाधलं नाहीं ! तेव्हां जो पुरुषाचा धर्म, तोच आपोआप स्त्रीचाहि धर्म ठरला. पण आतां मात्र, ज मजहब जगन्नाथांचा, तोच लवंगिकेचा कां ठरूं नये ? धर्माची दीवार आतांच कां खडी व्हावी ?

शाहजहान : ( अवस्थ होऊन ) मोगल सम्राटांची बात अलग नि या हिंदु शायरची बात अलग !

दारा : बात अलग कशी ? आपण म्हणालं होतां, की ‘ दरबारचे बादशहा आम्ही; मैफलीचे बादशहा जगन्नाट्थराय ’ ! ही आपली दिलदार उदार वृत्ति कोठें गेली ? दरबारांतील बादशहानें मुशायर्‍यांतील बादशहाल आपली मुलगीतीही मानलेली मुलगी--कां देऊं नये ? इतका भेदभाव आपल्यासारख्या अहलेदिल बादशहानं दाखवाव अं ? आपण लल किल्लयांतील संगमरवरी इमारतीवर तराजूची तस्वीर खोदून जाहीर केलं आहे, कीं शाहजहान बादशहा इन्साफच्या बाबतींत सोनं तोलण्याच्या तराझूइतका कांटेकोरा अहे. लेकिन आपण जगन्नाथरायांना घातलेली शर्त, त्या हिर्‍या--मोत्यांनीं सजविलेल्या तराजूला बट्टा लावीत आहे ! लाल किल्लयांत ठसठशीतपणें खोडलेल्या त्या तराजूलाच नव्हे, तर साठ सुवर्णघंटांची सांखळी आपल्या राजवाडायाबाहेर ठेवून, वाटेल त्याल जुलमाविरुद्ध दाद मागूं देणार्‍या जहांगीराच्या परंपरेलाहि कमीपणा आणीत आहे !

शाहजादी ; विचार करा अब्बाजान ! ज्य उत्कट भावनेनें आपण ताजमहाल उभारत आहांत, ती भावना आठवा ! बेगमसाहिबांच्या विरहानं होणारी स्वतःची तगमग आठवा ! आणि मग सांगा, त्या भावनेच्या आड अशा अपमानकारका अटी नि असेच अडथळे आले असते, तर तुमच्या दिलाची किती दारूण दैना झाली असती ?

शाहजहान : बस‌ बस्‌ ! ऐसे परेशान करेशान करनेवाले सवालत मत करो बेटा ! मला कांहीं हमददीं नाहीं. दर्दभर्‍या मोहव्वतीची कल्पना नाहीं. असं का तुला वाटतं ?

शाहजादी : तुम्हांस मोहब्बतीच्या दुःखाची कल्पना नाहीं, असं कोण म्हणेल ? पण अब्बाजान‍. मीराबाईनं म्हटलं तेंच खरं, ‘ घालूयकी गति घायला जाने, और न जाने कोय ’ ! दुसर्‍याम्चा दर्द थंडगार असतो !

शाहजहान : चांगला टोला हाणलस हं बेटी ! तुल पोटच्या पोरीहून हमदर्दीनं वाढविलं, ते तुझे शब्दांचे तिखट तीर खाण्यासाठींच ! या शाहेजहाँला दुसर्‍यांचा दर्द थंडगार वाटतो ! दुसर्‍याच्या मोहब्बतीचा दर्द त्याला कळत नाहीं ! वाहवा, खाशी तारीफ ! आधींच शाहजादे माझं ऐकेनासे झाले आहेत आणि आतां माझी बेटी आणि माझे दरबारी नौकर देखील शब्दांचे तीर मारून माझी धूलधाण उडवीत आहेत ! राजकारणांतील मोठमोठे सवाल चुटकीसरशीं निकालांत काढणार्‍या शाहेजहाँल हा घरगुती पेंच सोडवितां येत नाहीं. किती नामुष्कीची बात !

दारा : शांत व्हा अब्बाजान, शांत व्हा. कोण्या हिंदु शायरानं म्हटलं आहे--

काष्ठभेद निपुणो ऽ पि मिलिंद:
निष्कियो भवति पंकज--कोशे ।

भंवरा टणक लाकूड पोंखरूं शकतो, लेकिन‌ कमलाचा मुलायम‌ कोश छेदूं शकत नाहीं ? मोहब्बतीचं तोडणं फार मुष्किल आहे !

शाहजादी : अब्बाजान, बैचैन होऊं नका, आमची शादी.

शाहजहान : बस‌ बस्‌ . पुरे झाली तुमची बेबंद बडबड. तुम्हांस तुमच्या शादीच्या सिंगार सुचतो. लेकिन‌ बरबादीचा अंगार दिसत नाहीं--दिसणारही नाहीं ! तुमच्याच हिताचे सांगितलेले चार शब्द तुम्हांस जहरासारखे कडूच वाटणार; कारण तुम्ही धुंद जवानीच्या बीमारीनें पछाडलेले आहांत. तुमच्याशॊम अधिक बोलण्यांत कांहीं मतलब नाहीं. मला इथं अकेला बसूं द्या जरा--हन तख‌लिया चाहते हैं !.
[ शाहजादी, जगन्नाथ, दारा जातात--अतिशय अस्वस्थपणें. ]

शाहजहान : [ स्वगत ] माझ्या बोलण्यानं हे दोन प्रेमी जीव किती घायाळ झाले असतील ! त्यांना असेच तडफडत ठेवूं, कीं त्यांच्या शादीला बिनशर्त परवानगी देऊं ? माझी इज्जत संभाळूं. कीं त्यांच्या मोहब्बतीला मान देऊं? कांहीं सुचत नाहीं, कांहीं सुचत नाहीं. अब मैं क्य करूं ? या खुदा ! अब मैं क्य करूं ?

[ इतक्यांत शाहजादीचा आर्त पुकार पडद्याआडून ऐकूं येतो. :--

गिरी बिजलियां जल गया आशियाना
रहा बस अभी आँसुओंका फसाना ॥.
भगवान ! बन गये हम‌ बे--आस बे-सहारे
बरबाद हो गया दिल‌ कोई नही हमारे ॥

हे आर्त बोल कानीं पडतांच शाहजहान काबरा--बावरा होतो. इकडे तिकडे पाहातो, तोच त्याची नजर मुमताजमहलच्या तसबिरीकडे जाते. अन‌ तिची आठवण होते. ]

मुम‌ताज ! अशीच, अगदीं अशीच दर्दभरी गजल एका बैरागिणीनं म्हटली होती, तेव्हां तुझ्या फुलासारख्या डोळ्यांत अश्रूंचे दंवबिंदु तरळले होते.  पण. पण लवंगिकेच्या या पुकारानं माझं कठोर मन विरघळत नाही. मुलीच्या आक्रंदनानं देखील या अभागी बापाच्या दिलाचा पहाड पाझरत नाहीं !. माफ कर, माफ कर मुमताज, मला निष्ठुर समजूं नकोस. माझा दिल विरघळून जात नाही. कारण तो ठिकाणावरच नाहीं ! अंधाराच्या दर्यांत तो गोते खात आहे. त्याला खूदाशिवाय आतां कोणताच आधार  नाहीं--कोणाचाहि आधार नाहीं !.

[ इतक्यांत, भग्नह्रदयी जगन्नाथाचा विलप कानीं येतो:--

ईश्वरा तूंच एक आधार ॥ध्रु.॥
नवथर प्रीती मधुर हांसरी
स्पप्नांची दुनिया चंदेरी 
जळून गेली अवचित सारी
दैवाघातें भंगुनि गेली ह्रदयविणेची तार.

हा आर्त विलाप कानीं पडल्यानें शाहजहान अधिकच अस्वस्थ  होतो आणि पुन: सुमताजच्या तसबिरीकडे पाहून उद‌गारतो- ]

मुम‌ताज, मुम‌ताज त्या घायाळ बुलबुलंचे हे दर्दभरे आवाज माझं काळीज चरचरा कापून जात आहेत. अन‌ अशा वेळीं तुझा सल्ला माझ्या नशिवीं नाहीं ! या दुनियेच्या दगाबाज दर्यांत शाहेजहाँल अकेला सोडून तूं निघून गेलीस, आणि आतां तुझी याद तेवढी मागें राहिली ! मघांशीं त्या जवान‌ प्रेमिकांशीं कठोरतेनं बोलतांना आंतल्या आंत माझा दिल तुज्या यादगीरीनं विरघळून जात होता. मुमताज !. त्या जवानीच्या रसील्या रात्रीं आठवल्या, झेलमकांठच्या शाही बगीच्यांतील सफर याद आली, अन‌ पुन: याद आली तुझी  वफादार मोह्ब्बत !, एकदां तूं शाही हमामांत, संगमरवरी कारंजाच्या खुषबूदार धारा अंगावर घेत असतांना मीं म्हटलं , “ किती सुंदर दिसतेस तूं मुमूताज ! तुझ्या या रूपावर आशक होऊन खुद्द खुदा तुल नंदनवनांत घेऊन जाण्यास इथं आला तर ?, ” तेव्हां तूं जबाब दिलास, “ मी खुदाल सांगेन, कीं मी कशाला येऊं तुझ्याबरोबर ? तूं खुदान नाहींस मुळी. कारण “ मुहब्बतही खुदा है ।’
आणि तो मला शाहजहानच्या सहवासांत केव्हांच हांसिल झाला आहे.”

( एकदम दचकून ) आँ ? तूं माझ्याकडे खफा नजरेनं पाहात आहेस ? तुझे गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ थरथरत आहेत ? तुझ्या फुलांसारख्या डोळ्यांतून गैरमजींचे अग्निपराग बाहेर पडत आहेत ?. काय म्हणतेस ?

“ मुहब्बतही खुदा है ! तर मग खुदाच्या नांवानं आपल्या मुलीच्या इमानदार मोहब्बतीपुढें मजहबी तटबंदी कां उभी करतां ? आपल्यावरून दुनियेला कां ओळखत नाहीं ? दुसर्‍याच्या मोहब्बतीची हीच कदर तुम्हांस असेल, तर जमीनदोस्त करून टाका तो ताजमहाल !.”

नको. नको. मुन‌ताज ! अशा तिखट शब्दांचि तलवार चालवूं नकोस ! सिर्फ इजतीचा नि राजकारणाचा हा सवाल नाहीं. रूढी मोडून केलेली शादी त्यांच्या बरबादीस कारण होईल. समाजाच्या तेज टीकेच्या भडिमारानं त्या कोंवळ्या प्रेमिकांचा तोल सुटेल आणि मग आफतीच्या दर्योत त्यांच्या जिंदगीचं जहाज गोते खाऊं लागेल; असं वारंवार माझ्या मनांत येतं मुमताज !. पण हें त्या धुंद जीवांना पटत नाहीं--पटणं शक्य नाहीं. मी त्यांच्या काळजीचं नाटक करीत आहें. असाच आरोप ते करणार !. मग मी काय करूं ? तूंच सांग मुमतातज! मी काय फैसला देऊं ? कीं ज्यानं त्यांना इष्काच्या फैर्‍यांत अन्‌ मला या मुष्किल पेंचांत टाकलं. त्या अल्लावरच सारा भार टाकूं ?. होय. त्याच्यावरच सारा भार टाकल पाहिजे,या गहिर्‍या अंधारांत एक आधार आहे ! [ इतक्यां दूरून जगन्नाथाची ’ ईश्वरा ! तुंच एक आधार ’ ही विलापलहरी कानीं येते. ज्या खिडकींतून ’ हे सूर येत आहेत असा भास होतो. त्या खिडकीकडे शाहजहान वेगानें आणि आवेगानें जातो--गोत संपतांच जड पावलं टाकीत मंचकापाशीं येतो आणि” या खुदा ! या गरीबजबाज !” असा पुकार करून मंचकावर कोसळतो.  ]

पडदा पडतो

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP