खेळगीते - फ़ुगडीचा जिखणॉं
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
फ़ुगडीचा जिखणॉं
१. माझे वटीत आवलं गं आवलं
कलूला झालं कावलं गं कावलं
२. माझ्या अंगावं येशील ग येशील
माझी सवत होशील ग होशील
३. एकव पाय हलवीते ग हलवीते
आपलशी नवर्याला बोलवीते
४. चल चल भावो बनात जाऊ
कवळी काकडी वाटून खाऊ
ह्यो ह्यो मेला फ़सवितो
तंगडीला तंगडी घुसवितो
५. माझे चुलीवं तवा ग
कालीचा नवरा नवा ग
माझे हाती चूना ग
सूनीचा नवरा जूना ग
६. लाडू बाय लाडू
म्हातारपणी नवरा केला
तो झाला साडू
७. शिराई काडी वसईना
माझी सवत बसईना
८. लसणकांदी सोलेना
माझी सवत बोलेना
९. होळीची किटी
मेल्या, नको मारू मिठी
सहा रंगी फ़ुगड्या फ़ुयाच्या!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP