नागपंचमीची गाणी - नागपंचमीचा सणू
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
नागपंचमीचा सणू
आला नागपंचमीचा सणू ग
बंधू बहिणीला जातो मुलू ग
बहिणीनं दूरून पाहिला ग
आणला पाय धुवायाला पाणी ग
काढला दांडावरून टावेल
माझे बंधूचे पाय पुसाया ग
आणला चंदनाचा पाटू
माझे बंधूचे बैठकीला ग
लाडू-पोल्यांचा भुजन केला
माझे बंधूला जेवायला ग
नागपंचमीचा सण
आला नागपंचमीचा सण ग
भाऊ बहिणीला जातो मूळ ग
बहिणीने दुरून पाहिले ग
आणले पाय धुण्याला पाणी ग...
काढला खुंटीवरून टॉवेल
माझ्या भावाचे पाय पुसण्याला ग
आणला चंदनाचा पाट
माझ्या भावाला बसाण्याला ग
लाडू-पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला
माझ्या भावाला जेवाण्याला ग
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP