होळीची गाणी - ढगसा आला
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
ढगसा आला
एक पाण्याचा ढगसा आला, ढगसा आला
तेहू ढगासाचा पाणी आला, पाणी आला
तेहू पाण्याचा पूरसा आला, पूरसा आला
तेहू पुरात आली काडी, आली काडी
तेहू काडीची बांधली माडी, बांधली माडी
तेहू माडीत गुरूबाबा, गुरूबाबा
बाबा वाजवं मोहरीपावा, मोहरीपावा
ढग आला
एक पाण्याचा ढग आला
त्या ढगातून पाणी आले
त्या पाण्याचा पूर आला
त्या पुरात वाहात आली काडी
त्या काडीची बांधली माडी
त्या माडीत होते गुरुबाबा
बाबा वाजावतात मोहरीपावा
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP