घोर नाचाची गाणी - वेढा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
वेढा
जानकी सीता बोली रामाला
रामा शिणगार करी रं
सीतेचे हाती फ़ुलांची मालू
घाली रामाचेगली रं
रामाचे हाती पुतल्यांचा हार
घाली सीतेचे गली रं
रामा तुझा मेढा रे, दुनियेला पडला वेढा रे
रामा तुझा शेला रे, बा कैशाने भिजेला रे
-गेलो होतो युध्दाला तं रंगतानं भिजेला रे
सीते तुझी चोली रे, बा कैशीने भिजेला रे
-गेलो होतो दलनाला तं घामानं भिजेला रे
(मेढा-सैन्याची रचना/व्यूह)
वेढा
जानकी सीता म्हणे रामाला
रामा शृंगार कर रे
सीतेच्या हाती फ़ुलांची माळ
घलते रामाच्या गळ्यात रे
रामाच्या हाती पुतळ्यांचा हार
घलतो सीतेच्या गळ्यात रे
रामा तुझ्या सैन्याची रचना रे, दुनियेला पडला वेढा रे
रामा तुझा शेला रे, कशाने भिजला रे
-गेलो होतो युध्दाला तर रक्ताने भिजला रे
सीते तुझी चोळी ग कशाने भिजली ग
-गेले होते दळणाला तर घामाने भिजली रे
(ह्याच गाण्याची एक निराळी आवृत्ती पृष्ठ क्र. १२८ वर दिलेली आहे..)
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP