उद्योगपर्व - भीष्मप्रतिज्ञा

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


भीष्म ह्नणे, ' म्यां कन्या हरिल्या भ्रात्नर्थ काशिराजाच्या, ।
मुनिजनहि ज्यांसि भुलला वरि दिसती सकळिका शिरा ज्याच्या ॥१॥
बहुसंख्य भूप जिंकुनि म्यां स्वपुरा आणिख्या तिघी कन्या,
ज्येष्ठा अंबा वदली, ' वरिला शाल्व, न वरीन मी अन्या, ॥२॥
शाल्वाकडेचि ती म्यां पाठविली, अंबिका स्वभावातें, ।
अंबालिकाहि दिधली विचित्रवीर्या शुचिस्वभावातें ॥३॥
अंबेला शाल्व ह्नणे, ' जा, गंगासूनुचीच नवरी हो ' ।
' परविजिता परपूर्वा ' ऐसा ठेवूनि दोष न वरी हो ! ॥४॥
वरिलाचि मनें, व्हावा, परि त्या ती बायको नको पतिला, ।
आला तद्वदनें बहु ' याहि ' असें आयकोन कोप तिला ॥५॥
रडतचि तपोवनाला गेली पावोनि उग्र ताप सती, ।
मजवरि दोष स्थापुनि, वृत्त कथुनि, करि सखेद तापस ती
राषर्षि होत्नवाहन भृगुरामाचा सखा तिचा आजा, ।
तो पातला अकस्मात् तीर्थतपः पर जसा भरत राजा ॥७॥
तो तें परिसोन, तिला अंकी घेऊनियां, मुनिजनातें ।
सांगे दौहित्री हें ऐसें, होऊनि साश्रु, निज नातें ॥८॥
अंबेसि ह्नणे, ' वत्से ! राम अधिष्ठुनि असें महेंद्रागा, ।
जा, सांग नाम माझें, त्या प्रभुसिच गा , न तूं महेंद्रा गा
तोंचि अकस्मात् तेथें अकृतव्रण पातला रहायास, ।
तो सांगे, ' राम सखा येणार उद्यां तुला पहायास ' ॥१०॥
रामहि दुसरे दिवशीं भेटे, निववूनि घे स्वकाय कवी, ।
नायक वीरांचा जो त्या तो राजर्षि सर्व आयकवी ॥११॥
येती शरण तुला जे ते जन सर्वत्र सत्यदा वरिती ' ।
ऐसें प्रार्थुनि, जोडी अंजलि, घालूनि  तत्पदावरि ती ॥१२॥
राम म्हणे, ' वत्से ! तूं आजवळा पावलीस न वनातें, ।
जें राजर्षिकडे या ब्रह्मर्षिकडेहि तेंचि तव नातें ॥१३॥
अश्रु पुसों दे, वांछिते सांग मज, अनाथसी नकोचि रडूं ।
आह्मांसि आपणासह या दुःखमहाभरे नको चिरडूं ' ॥१४॥
अंबा ह्नणे, ' असें हें झालें, किति कथिल दुःख हें तूतें ।
मारावें भीष्माते या माझ्या परमदुःखहेतूतें ' ॥१५॥
राम ह्नणे, ' धरि न धनु, जरि न विनवितिल मजप्रति ज्ञाते
ब्राह्मणकार्यावांचुनि सोडावी कसि निजप्रतिज्ञा ते ? ॥१६॥
अंबा वदे, ' प्रतिज्ञा शरणागतरक्षणार्थ सोडावी, ।
तुज ईश्वरासि दुष्कर काय प्रभुजी ? सुकीर्ति जोडावी ' ॥१७॥
राम ह्नणे, ' वत्से ! तुज भीष्म नमिल, बहुमता मदाज्ञा त्या;
लंघ्या नव्हे प्रतिज्ञा, प्रतिपाल्या होय हे सदा ज्ञात्या ' ॥१८॥
काश्या ह्नणे, ' वधा की भीष्म ह्नणो, ' निर्जितोस्मि ' आजोबा !
माजो बाहुबळें न च्छात्र, बहु गुरुप्रताप साजो बा ! ' ॥१९॥
अकृतव्रणहि ह्नणे, ' जी ! वर्णुत भृगुकुळगुरुप्रति ज्ञाती; ।
स्मरली मज, स्मरावी स्वामीनीही गुरु प्रतिज्ञा ती ॥२०॥
वदलां म्यां शरणागत दडुनि विप्रादि सर्व तारावा, ।
जो सर्व क्षत्र रणी जिंकील प्रबळ तोहि माराया ' ॥२१॥
भार्गव ह्नणे, ' विसरलों होतों की मोहि या प्रतिज्ञाता, ।
वत्सा ! तुज धन्य म्हणो आधी, मग सर्व याप्रति ज्ञाता ॥२२॥
सामेंचि कार्य होइल जरि, तरि युद्धासि काय कारण हो ! ।
न करील वचन जरि, तरि माराया भरतनायका रण हो '  ॥२३॥
ऐसें योजुनि घेउनि त्या मुनिमित्रांसभेत मुलगीतें, ।
प्रस्थान शीघ्र केलें त्या राजामरमहर्षिकुलगीतें ॥२४॥
येऊनि कुरुक्षेत्री राहे, सांगोनि पाठवी, राजा ! ।
धांवोनि भेटलों मी वेद धनुर्वेद पाठ वीरा ज्या ॥२५॥
मत्कृतपूजन घेउनि राम ह्नणे; ' रे ! सुरापगांगभवा ! ।
भक्त्यर्पित बहु, नाही तरि काय असे दुराप गांग भवा ? ॥२६॥
गरुडें सुधा; तसी त्वां हे अंबा रण करुनि जरि हरिली, ।
तरि हरिलीनमतिजनें संसृतिरुचि तेंवि केंवि परिहरिली ? ॥२७॥
वदलों, ' सत्य भ्रात्याकरितां हरिली बळें; ' पर स्वामी ।
वरिला शाल्व ' ह्नणे हे, घेऊं जाणुनि कसे परस्वा मी ? ' ॥२८॥
राम ह्नणे, ' शाल्व न घे, मानी हरि गज परें दिला न वरी,  ।
त्वां जिंकिली यदर्थ त्वद्भ्राता तो करु इला नवरी ' ॥२९॥
मी वदलों, ' जे दुष्कर सुयशस्कर सांग काज रामा ! तें, ।
होइल अकीर्ति, देतां कां हा उपदेश काजरा मातें ? ॥३०॥
राम ह्नणे, ' त्वद्गुरु मी, माझें सुखपुण्यकीर्तिजनक वच, ।
गुरुवचनासचि ह्नणती सर्व भले पुण्यकीर्ति जन कवच ॥३१॥
मी बोलिलों, ' असें तों न घडेल कधी; दयानदा ! पावें; ।
गुरुनें, ज्यासि अधर्माचरण न माने, तया न दापावें ॥३२॥
राम ह्नणे, ' होय सुखी निजगुरुचें वचन शिष्यजन करिता,  ।
नातरि गुरुकुंभमवक्षोभें छात्रामृतांशुजनक रिता ॥३३॥
हे सर्वमता साक्षात् दुर्गासी सर्वकामदा ज्ञात्या ! ।
लंघील खल महिषसा जो, न करिल भस्म कं मदाज्ञा त्या ?  ॥३४॥
मज गुरुपुढें ' असें तों न घडेल कधीं ' असें कसें वदसी ? ।
असतां समर्थ अघटितवटनापटु मत्कुठार हा सदसी ॥३५॥
खचसील कौरवा ! तूं की बहु चढला तुझा मद सिगेला, ।
लंघावया पहासी ? गांवाला काय रे ! मदसि गेला ? ॥३६॥
वधिले क्षित्तिलवर्ता क्षत्रिय म्यां एकवीसदा सो, ।
माझा प्रताप गातां रुद्रभ्रम दे कवीस दासा ! रे ! ' ॥३७॥
ऐसें भलतेंचि वदे वर्णावा मुख्य जो गुरु गुरुनी, ।
पाहे राम मजकडे, जेंवि हरिकडे हरी गुरुगुरुनी ॥३८॥
वदलों, ' धर्मन्यायें हा देह तपोवनांत राबाबा, ।
त्यजुनि दुरभिमान, धरुनि शांतिसि, तारुनि जनांतरा बाबा !  ॥३९॥
ठाव्या आहेत मला सांगा गोष्टी यथेष्ट अन्या या, ।
तरि भय भलत्यापासुनि होइल जरि मी करीन अन्याया ॥४०॥
वधिले क्षत्रिय तेव्हां नव्हता हा भीष्म शांतनव समज,  ।
देवासि मागते ते झाले, मरणी, करुनि नवस, मज ॥४१॥
गेलें गुरुत्व तुमचें, कां हो ! ह्नणतां वधीन अनघातें ? ।
येइल पदरांत कसे यश धर्मन्यायनिष्ठजनघातें ? ॥४२॥
सच्छिप्याला विद्या गुरु झांकायासि काय हो ! शिकवी ? ।
पांडित्य पहा माझें, पाहोनि मला ह्नणाल ' होशि कवी ' ॥४३॥
हांसुनि राम म्हणे, ' रे ! हितकर गुरुवचन कां न आइकसी ?  ।
साहेल तुजी तुजिया दुःसहशोकानलासि आइ कसी ? ॥४४॥
भीष्मा ! मज सिंह गणी, वेड्या ! तूं आपणासी कलभ गणी,  ।
न रविपुढें मिरवेसे चंद्रीहि, कसें असेल बल भगणी ? ॥४५॥
देसिल सत्यवतीतें शोक बहुत, रडविशाल गंगेतें, ।
समज बरें मददूषित जें जें तेज क्षणांत भंगे तें ॥४६॥
हो सिद्ध, ये; हरीने व्यसु आला तो करेणु केला, हो !  ।
हो गंगेला शोकद, तोखद हें तोक रेणुकेला हो ' ॥४७॥
सिंधूत नग जसा कपि तैसा पाहोनि गर्वनग रामी, ।
वंदुनि ' येतों ' ऐसें बोलुनि आलों फिरोनि नगरा मी ॥४८॥
सत्यवतीतें सांगुनि नमुनि, तदाशीप्रसाद घेऊन, ।
हा गुरुचें दर्शन घे, हेमंती जेंवि अधन घे ऊन ॥४९॥
आह्मां गुरुशिष्यांचा अत्यंताद्भुत पहावया समर, ।
आले बहु सुरराजब्रह्मर्षिसमेत सर्वही अमर ॥५०॥
पुत्नस्नेहें मातें ये वाराया भिऊनि देवधुनी, ।
हनु धरुनि म्हणे, ' बा ! हा कालकरी बहु भटांसि दे वधुनी '  ॥५१॥
सांगोनी कलहकारण वदलों, ' गंगे ! वृथा न कोपावें, ।
रामापरि मज तूंही निजधर्मच्युत करुं नको, पावें ॥५२॥
अत्याज्य सुप्रतिज्ञाग्रह निजकुलधर्म सन्नय नरा हे, ।
तैसें कसें करावें जेणें एकहि न सन्नयन राहे ' ? ॥५३॥
सिधु ह्नणे, ' कोण असी माता जाडील हात पोराशी ? ।
शिष्य असा, मग आग्रह कैसा सोडील हा तपोराशी ' ? ॥५४॥
जों माय ह्नणे, ' देइल हा हरि तुज मुग्धसिंधुरा मरणा ' ।
मजवरि येता झाला, तोंचि यशोदुग्धसिंधु राम रणा ॥५५

उपसंहार

जनमेजयासि ऐसी वैशंपायन कथी कथा, तीतें ।
गाय मयूर रसिककविकिंकर चित्ते असत्पथातीतें ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP