भाग एक - कलम ३

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली.


नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे , सीमा अथवा नावे यांत फेरफार .

३ . संसदेला कायद्याद्वारे --

( क ) कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करुन अथवा दोन किंवा अधिक राज्ये किंवा राज्यांचे भाग एकत्र जोडून अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची निर्मिती करता येईल ;

( ख ) कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येईल ;

( ग ) कोणत्याही राज्याचे क्षेत्र घटवता येईल ;

( घ ) कोणत्याही राज्याच्या सीमांमध्ये फेरफार करता येईल ;

( ड ) कोणत्याही राज्याच्या नावामध्ये फेरफार करता येईल ;

[ परंतु , या प्रयोजनाकरता असलेल्या कोणत्याही विधेयकाला राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज आणि त्या विधेयकात अंतर्भूत असलेल्या प्रस्तावामुळे * * * कोणत्याही राज्याचे क्षेत्र , सीमा किंवा नाव यावर परिणाम होणार असेल त्याबाबतीत राष्ट्रपतीने ते विधेयक त्या राज्याच्या विधिमंडळाकडे त्याने , निर्देशनात विनिर्दिष्ट करण्यात आलेला असेल अशा कालावधीत किंवा राष्ट्रपती परवानगी देईल अशा वाढीव कालावधीत त्यावर आपले विचार व्यक्त करावेत यासाठी निर्देशिलेले नसेल तर व याप्रमाणे विनिर्दिष्ट केलेला किंवा वाढवून दिलेला कालावधी संपलेला नसेल तर , ते विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात पुरः स्थापित केले जाणार नाही . ]

[ स्पष्टीकरण एक --- या अनुच्छेदात , खंड ( क ) ते ( ड ) यांमध्ये " राज्य " या शब्दात संघ राज्यक्षत्राचा समावेश आहे . परंतु , परंतुकामधील " राज्य " या शब्दात संघ राज्यक्षेत्राचा समावेश नाही .

स्पष्टीकरण दोन --- खंड ( क ) द्वारे संसदेला प्रदान केलेल्या अधिकारांमध्ये कोणत्याही राज्याचा किंवा संघ राज्यक्षेत्राचा एखादा भाग अन्य कोणत्याही राज्याला किंवा संघ राज्यक्षेत्राला जोडून नवीन राज्य किंवा नवीन संघ राज्यक्षेत्र बनवण्याच्या अधिकाराचा समावेश आहे . ]

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP