पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक , आनुषंगिक व परिणामस्वरुप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद २ व ३ खाली करण्यात आलेले कायदे .
४ . ( १ ) अनुच्छेद २ किंवा अनुच्छेद ३ मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कायद्यात , त्या कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी आवश्यक अशा , पहिली अनुसूची व चौथी अनुसूची यात सुधारणा करण्याविषयीच्या तरतुदी अंतर्भूत असतील आणि संसदेला आवश्यक वाटतील अशाही पूरक , आनुषंगिक व परिणामस्वरुप तरतुदी ( अशा कायद्याचा परिणाम होणार्या राज्याच्या किंवा राज्यांच्या संसदेतील व विधानमंडळातील किंवा विधानमंडळांमधील प्रतिनिधित्वासंबंधीच्या तरतुदींसह ) अंतर्भूत असू शकतील .
( २ ) अनुच्छेद ३६८ च्या प्रयोजनांकरता पूर्वोक्त असा कोणताही कायदा या संविधानाची सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही .