दत्त आरती - जय देव जय देव दत्ता अवधूत...
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.
जय देव जय देव दत्ता अवधूता ॥ आरति ओवाळूं तुज सदगुरुनाथा ॥जय.॥
स्वच्छंदें व्यवहारी आनंद भरिता ॥ कायामाया अनसूयासुता ॥जय.॥१॥
रजतमसत्त्वाविरहित दत्तात्रय नामा ॥ नामाकामातीता चैतन्यधामा ॥जय.॥२॥
नामावेषधारी सर्वांतर्यामीं ॥ अनन्यभावें शरण दिन माणिक नामीं ॥जय.॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : September 27, 2013
TOP