मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
नृसिंहसरस्वती । मनि धरुनि...

दत्ताची आरती - नृसिंहसरस्वती । मनि धरुनि...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


नृसिंहसरस्वती । मनि धरुनियां प्रीती ॥

ओवाळीतों शेजारती । अंगीकाराया श्रीपती ॥ धृ. ॥

ब्रह्मा येउनि देव देवा । म्हणे कोण कोण जीवा ॥

उपजवूं कोठे केव्हां । संदेश हा मज व्हावा ॥ नृसिंह. ॥ १ ॥

विष्णुही येऊनीयां आज्ञा मागे वंदुनियां । कोण जीवा काय खाया ॥

कैसे देऊं कवणे ठाया ॥ नृसिंह.॥ २ ॥

येऊनियां महादेव । वंदूनीया पादद्वंद ॥

ज्ञान कोणा देऊं देवा । आज्ञा करा स्वयमेवा ॥ नृसिंह. ॥ ३ ॥

अंबा म्हणे बाळ यती । फार झाली असे राती ।

झोंप आलीं तुजप्रतीं । भक्त रक्षुनी श्रम होती ॥ नृसिंह. ॥ ४ ॥

विनविती भक्तवृंद । सेवा घेउनिया छंद ॥

पुरवुनि दे ब्रह्मानंद ॥ भीमाप्रौत्रानंदकंद ।

नृसिंहसरस्वती. ॥ ५ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP