दत्ताची आरती - ओवाळूं आरती श्रीगुरुराज स...
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.
ओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा ।
भक्तांते पावसी करुनी कृपेची छाया ॥ धृ. ॥
मदांध होउनि आलो तव चरण पाहाया ॥ १ ॥
तारुनि शरणांगत ठाय येई निजचरणी ।
हेंच मागणे श्रीगुरु तुजला जोडुनियां पाणी ॥ २ ॥
कामक्रोधादिक हे शत्रू पीडित बहु मजला ।
वारुनि त्यांते रक्षी माते आपुल्या सेवेला ॥ ३ ॥
मोरेश्वरसुत वासुदेव हा तत्पर सेवेसी ।
श्रीगुरुदत्ता स्वामी समर्था तारी दासासी ॥ ४ ॥
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2012
TOP