श्री उमाहेमावती व्रत - माहात्म्य
उमा हेमावती व्रत मनोभावे केल्याने संपत्ती आणि संतती प्राप्त होते.
१. हे व्रत केल्याने आपापल्या कार्यक्षेत्रात उन्नतीचा, उत्कर्षाचा लाभ होतो. दुःख, दारिद्र्य, रोग नाहिसे होतात. सुखशांति, धनसंपत्ती, संतती प्राप्त होते. उत्तम आरोग्य लाभते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. मनोरथ पूर्ण करणारे अत्यंत प्रभावी सर्वश्रेष्ठ असे व्रत आहे. हे व्रत निष्ठेने श्रद्धेने, भक्तिभावाने इच्छीत फल प्राप्तीसाठी करावे. मात्र त्यासाठी श्रद्धा आणि सबूरी हवी.
२. शुक्र ग्रह अनिष्ठ असल्यास हे व्रत करावे. कलावंतानी हे व्रत अवश्य करावे. त्यांचा भाग्योदय निश्चित होईल.
३. या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्याच्या पहिल्या शुक्रवार पासून सुरु करावी. शेवटच्या शुक्रवारी व्रताचे उद्यापन करावे.
४. व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी एका सुवासिनीला बोलवावे. तिला हळदी कुंकू लावावे. तिची खणानारळाने ओटी भरावी. तिला देवी उमाहेमावती समजून नमस्कार करावा. तिला या ग्रंथाची एक प्रत द्यावी. सुवासिनी व कुमारिका यांना त्या शुभप्रसंगी या ग्रंथाच्या पाच प्रती देऊन त्यांनाहि नमस्कार करावा.
५. पूजा करण्यासाठी पुरोहित गुरुजीची आवश्यकता नाही. ती स्वतःच करावी.
६. हे व्रत करणार्यांच्या घरातील माणसानी प्रेमाने रहावे. घरात कलह करू नये.
७. हे व्रत करीत असता एखाद्या शुक्रवारी खंड पडला तर पुढच्या शुक्रवारी करावे. तो शुक्रवार मोजू नये.
८. दर शुक्रवारी हा ग्रंथ वाचावा. या ग्रंथ श्रवणाचा इतरांनाही लाभ द्यावा. श्री उमाहेमावती माता तुमच्यावर संतुष्ट होवो.
N/A
References : N/A
Last Updated : December 20, 2013
TOP