कृष्णदासांची बाळक्रीडा - प्रसंग ५
श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.
मग उठउनि वसुदेवातें ॥ जाणविलें मागीला वृत्तांतातें ॥ आतां डोहाळे देवकीतें ॥ होती ते परीयेसा पां ॥१६७॥
देवकी म्हणें प्राणेश्वरा ॥ मज डोहाळें होताती अवधारा ॥ येरु म्हणें वसुंधरा ॥ तुज प्रसन्न जाली ॥१६८॥
तरी जाणवैल आतां ॥ तुज डोहाळे सांगतां ॥ तवं येरी म्हणे मज भोंवता ॥ भारू असे देवांचा ॥१६९॥
मीं जिकडे द्दष्टी करीं ॥ तो देव मजची जोहार करी ॥ आणि विमानें अंबरी ॥ दाटली असती ॥१७०॥
जव मीं सूर्याकडे पाहें ॥ तंव तो मज हात जोडुनी उभा राहे ॥ मज ऋध आला आहे ॥ जे कंसासुर वधावा ॥१७१॥
येकवीसा स्वर्गाच्या उतरडी ॥ तीतुकी देखत असे परवडी ॥ पर येकु हीं न बो (ले) प्रौढी ॥ मज देखोनियां ॥१७२॥
तेतीसां कोडी देवांसी ॥ इंद्र तो ऊभा मजपासीं ॥ विमानें दाटली आकाशीं ॥ माळा हाती घेऊनियां ॥१७३॥
आणीक येक सांगों काई ॥ फुराण येतसे माझा बाहीं ॥ अवलोकितां दिशा दाहीं ॥ मीच येकी समर्थ ॥१७४॥
आणीक विप्रीत वाटतसे मज ॥ आणीकां द्यावें कंसाचे राज्य ॥ दैत्यां निर्दाळुनी काज ॥ करावें देवांचें ॥१७५॥
साधुसंत बैसवावें ॥ दुष्ट दैत्य नासावें ॥ रुसी मानभावो सुरवीयां करावें ॥ करावें आनंद पवाडें ॥१७६॥
यैसे मज होताती डोहाळे ॥ तव वसुदेवें जोडुनी कर कमळें ॥ आतां आमुचें भाग्ये फळासी आले ॥ होते सुंदरी ॥१७७॥
यैसें तेहीं वेवस्तीले तव देवे बंदीसाळे बीजे केलें ॥ कंस कोठें मारी (न) म्हणितिले ॥ तवं दोघे जाली (भय) भितें ॥१७८॥
आगा मी ब्रह्म कां भीतां ॥ कंस वधुनी दैत्या संहारीता ॥ तुमचे साह्य करीन आतां ॥ पुत्र होउनि तुमचा ॥१७९॥
हीं तुवां बीजे केलें आमचीया काजा ॥ यैसे आम्हा जाणो आलें देवराजा ॥ तुं आम्हा पुत्र होसी ब्रह्म तेजा ॥ कोणा सुकृतास्तव सांधैं ॥१८०॥
देव म्हणे तुम्हीं पूर्वीं तप केलें ॥ क्षेत्रीं तुम्हीं अन्न पुरविलें ॥ म्हणौनि चौघां येकची पुण्य जाले ॥ तुम्हीं ब्राह्मण ते वेळीं ॥१८१॥
म्यां तुमचे उदरी जन्म घ्यावें ॥ तयांवर वसुगळा खेळावें ॥ म्हणौनि मज गोकुळा न्यावें ॥ वसुदेवा ॥१८२॥
तेहीं म्हणितिलें आम्हापाई सांखळा ॥ दुसरी द्वारीं कवाडें आगळा ॥ कैसें म्या न्यावें तुम्हां गोकुळा ॥ सांधैं सामर्थे ॥१८३॥
आगा मीं बाळक होईन निरुतें ॥ माझा चरणु लावीसील जेथें ॥ चरणें बंध तुटती तेथें ॥ जेथे चरणु लागे माझा ॥१८४॥
तो कथा नीर्नव सांघीतला ॥ तो ऐकोनीं माता पिता संतोषला । म्हणती आम्हां कैवारा देव आला ॥ घाला दंडवत ॥१८५॥
तेथें देवें आणीक विचारु केला ॥ देवकीचें पोटीचा बळीमद्रु नेला ॥ तो रोहिणीचा उदरीं घातला ॥ नेउनी गोकुळीं ॥१८६॥
तेथें तो नवलावो जाला ॥ तेणें नंदु राजा संकला ॥ तो म्हणें आम्हा बोलु लागला ॥ वसुदेवा जाणविलें ॥१८७॥
हे वसुदेवें आईकोनी मात ॥ म्हणें नंदराया तुम्हीं न व्हावें दुचीत ॥ हे जालों असे जाण देवक्रुत ॥ आमचेची आहे ते ॥१८८॥
तंव येरीकडें देव बाळ आवचिता जाला ॥ देवकीयां वसुगळा होउनि राहिला ॥ तंव देवकी म्हणें आंम्हां पुत्रु जाला ॥ वसुदेवा ॥१८९॥
येरु संतोषला ऐकतां ॥ तंव बाळकें टाहो केला अवचितां ॥ हा शब्दु रक्षेनाईता ॥ ठाउका जाला ॥१९०॥
ते म्हणती देवकीये पुत्र जाला ॥ यैसा शब्दु प्रकटला ॥ तेवेळे परिवारु पावला ॥ देवरायाचा ॥१९१॥
दैत्यीं करावा बोभाटु ॥ तंव वारींयांचा सुटला धुंदाटु ॥ पींपळु जाला सात कुटु ॥ मुळासहित न्येला गगन मार्गें ॥१९२॥
तेथें कागासुर गर्जना करी ॥ तंव मेघ वर्षले सीळाधारी ॥ गारा बैसत्याती सीरीं ॥ तेथें कैची उरी कागासुरा ॥१९३॥
गंधर्वें जव करावी गर्जना ॥ तवं श्रुत जालें नारायणा ॥ तेणें चरणी धरुनी गगनां ॥ उचलुनि नेला ॥१९४॥
जेंगट पीटी तांतडी ॥ तंव आकाशीं गर्जु तडाडी ॥ तेणें जाहाले देशधडी ॥ सकळ लोक ॥१९५॥
तंव तया कंसाचीये मंदीरीं ॥ वारेयानें केली आपरापरी ॥ येकवीसां खणांची उपरी ॥ ते कोसळती असे ॥१९६॥
घरें उडती आकाशा ॥ त्यांतु पाउसाचा भोंवतुसे वळसा ॥ लोक म्हणती म्हयेसा ॥ पाव पाव ॥१९७॥
आशंकेचे दुर्ग कडाडिले ॥ तें सांडुनी लोक गेले ॥ घरुनी घर पडीलें ॥ यैसें केले जन्मकाळीं ॥१९८॥
श्रावनी वद्यी पवित्रु ॥ अष्टमी रोहिणी नक्षत्रु ॥ दिवसु मंगळवारु ॥ चंद्रउदे जन्म देवरायांचा ॥१९९॥
जैसा कां बाळ सुर्यो उगवला ॥ तैसा वळवयांचा प्रकाशु पडिला ॥ जैसा कां हिरा झळकला ॥ तैसा मिरवला श्यामतनु ॥२००॥
जो चौदा भुवनांचा दातारू ॥ तोची अवतरला परमेश्वरू ॥ तो होउनिया लेंकरु ॥ देवकीयेचा ॥२०१॥
चतुर्भुज सांवळा ॥ आणी भुजा वाटोळींया सरळा ॥ श्री मुगटीं पिंगट जावळा ॥ शोमती लंब कर्ण ॥२०२॥
अजानबाहो जगजेठी ॥ सरळ नासांपुट हनवटी ॥ आणि त्रीरेशा त्रीकंठी ॥ शोमताती ॥२०३॥
यैसा बत्तीस लक्षणु ॥ सामुद्रीकें संपूर्णु ॥ जगत्र जीवनु ॥ अवतरलासे ॥२०४॥
ध्वज उर्ध रेशां अंकुशु ॥ आणि सर्व तीर्थांचें वळनवसु ॥ तळवां दिसती प्रकाशु ॥ सुरंग पद्मांचें ॥२०५॥
यैसें बाळकु देखीले ॥ तंव देवकीया पतीते विनविलें ॥ जी जी जें धरत्री या सांगीतलें ॥ ते जालें सत्ये स्वामीया ॥२०६॥
आणीक प्राणेश्वरा ॥ आईक मागीला विचारा ॥ कोण्हीं न देखे या पुत्रा ॥ तवं न्यांवा गोकुळा ॥२०७॥
हा येस्वदेपासी दीजे ॥ तीसी बहुतां रीती निरिविज ॥ तीची कन्या घेउनि येईजे ॥ येर्हीं कंसु अनर्थु करील ॥२०८॥
म्हणौनी वसुदेवा वसुगळा घातला ॥ तेणें देवाचा चरणु कुलपा लाविला ॥ तंव उघडी खळखळां ॥ पांईचेहीं सांखळ तुटले ॥२०९॥
मग तो धांवें लवडासवडी ॥ तंव यमुना जात असे दोहीं थडीं ॥ ते देखोनि भेणें आली हुडहुडी ॥ आतां कैसें होईल ॥२१०॥
मग आठवले देवाचे वचना ॥ मीं लावीन याचा चरण ॥ मग देईल वाट यमुना ॥ यैसें विचारिले ॥२११॥
मग म्हणें आवो यमुने माये ॥ जरी हा परमेश्वरु अबतरला होये ॥ तरि याचा चर्नु तुज लागत आहे ॥ मज वाट देई ॥२१२॥
मग तें यमुना दोनी भाग जाली ॥ तया परमानंदा वाट दीधली ॥ तंब समस्तें असती नीजैली ॥ तंव गेला मंदिरा नंदाचिया ॥२१३॥
दुर्ग दारवंटें आगळा ॥ सुबंधा लोहाचिया सांखळा ॥ त्या उघडलियां खळखळां ॥ चरणु लागतांचि ॥२१४॥
नंदाचिया राउळा गेला ॥ तयासी सर्व व्रतांतु सांगींतिला ॥ मग यशोदेप्रती गेला ॥ तीणें देखिला तो बाळकु ॥२१५॥
म्हणें उपजतांचि यैसे लेंकरु ॥ अजानबाहो श्याम सुंदरु ॥ सर्व लक्षणी मनोहरू ॥ हा अवतार होईल ॥२१६॥
मग नंद येशोदा बोलती ॥ हा आणीला येव्हडेया रात्रीं ॥ यमुना दोहीं थडीया असे जाती ॥ आणी सातै दरवंटे होहा आगळा ॥२१७॥
तुम्हीं आलेतीं कवण्यापरी ॥ येरु म्हणें नवल अवधारी ॥ यमुना वाहे सभराभरी ॥ तीणें वाट दीधली ॥२१८॥
याचा चरणी ते दोनी भागजी जाली ॥ कवाडें तैसीची उघडिली ॥ आम्हासी वाट दीधली ॥ दैवं यैसे जाणा ॥२१९॥
वसुदेव म्हणें तो वृत्तांतु ऐक ॥ हा पुत्रु तुम्हां आम्हां येकु ॥ हे खूण सांगीतली येनेंची दु:ख ॥ सर्वज्ञु रावो हा ॥२२०॥
आवो हा पुत्रु यौगीयाचे ध्याण ॥ यैसे वो येशोदे निरुतें जाण ॥ यासी करावें जतन ॥ हा लेंकरु जाला ॥२२१॥
आम्हीं तरि दोघें जने ॥ कंसा हाती नाहीं वांचनें ॥ वरी येव्हढे वांचवनें ॥ वंशी येकु तुमचेनें ॥२२२॥
बहुत करुणां भाकिली ॥ मग नंद येशोदा गहिंवरली ॥ म्हणती आम्हा कन्या जाहाली ॥ ते न्यावी वसुदेवा ॥२२३॥
येर्हवीं कंस न राखे जीवें ॥ तो धांवेल माहा गर्वे ॥ हे त्याचें हातीं द्यावें ॥ येर्हवी अनर्थु करिल ॥२२४॥
मग कन्या घेउनि निघाला ॥ येमुना तीरास आला ॥ पुनरपी यैसेचि बोलिला ॥ तंव दोनी भाग जाली ॥२२५॥
ते दीधली देवकीये करीं ॥ यैसे जाले बंदीखाणा भीतरीं ॥ तेव्हेळीं वायो मेघ भोवंडीत होते बाहेरी ॥ ते शांत जाले ॥२२६॥
तंव पूर्व दिशा उजळली ॥ रक्षणाईतें सानंदे जाली ॥ कागासुरें हांक दीधली ॥ झडाडिले येमळा अर्जुन ॥२२७॥
गंधर्ड करी गर्जना ॥ जेंगट पीटी सत्राना ॥ हा कीं गर्जत असें गगन ॥ विघ्न दारुण मांडलें ॥२२८॥
तंव कंसासुर महादैत्यु ॥ तो धांवीनला सींहीं नादे गर्जतु ॥ घे धे मारी करीतु ॥ आला बंदीखाणा भीतरी ॥२२९॥
मग तयास कोमळ बाळकां ॥ चरणी धरिले आईका ॥ मग सुंमरली देवकी आंबीका ॥ देवा आकांता पाव वेगी ॥२३०॥
तुं सर्व जीवाचा कोंवसां ॥ माझ्या उदरा आलासी हा भर्वसा ॥ तुज कारणें रुषीकेशा ॥ हे बाळक जीवें जात असे ॥२३१॥
हें आपेस चुकवावें ॥ आणि या बाळकाते राखावे ॥ तरी जाणवैल स्वभावें ॥ तुं परमेश्वरू अवतरला होसी ॥२३२॥
यैसें देवकी चिंतीत असे मनीं ॥ तंव कंसु बाळकातें भोवंडीतु असे गगणी ॥ जवं आपटुं गेला धरणी ॥ तंव ते जाले तेजमयें ॥२३३॥
तडकु जैसा अवचिता वाजिनिला ॥ तंव कंसाचा हात उपटला ॥ प्रकाश प्रगटला तवं कंस पडिला ॥ धरणीवरी ॥२३४॥
जैसी बारा सुर्यांची प्रौढी ॥ तैसें बाळक आकाशीं तडाडी ॥ गर्जुनियां घडघडी ॥ धांवें कंसावरी ॥२३५॥
तंव कंस चांचरतु पडतु ॥ पाहा पळतुसे दैत्यनाथु ॥ मग जगा जाला आकांतु ॥ म्हणती आकाश पडिले ॥२३६॥
महाकलोळ वन्ही ॥ गर्जतु भोवे गगनीं ॥ तडकु फुटती मेदनीं ॥ तेणें धरनीं कापतीसे ॥२३७॥
मग म्हणें मीं अनिवार वीज ॥ ग्रासुं आली येरे कंसा तुज ॥ पर आज्ञा नाहीं मज ॥ त्या देवरायांची ॥२३८॥
आरे ये श्रृष्टीचा दातारू ॥ तेणें गोकुळीं केला अवतारू ॥ तो तुझा करिल संहारू ॥ सकळ दैत्यांसीं ॥२३९॥
अरे त्या देवांचीयां गळा ॥ आहेती वैजै (यं) ती माळा ॥ त्या मधील मीं येकी कळा ॥ जालीये प्रकट ॥२४०॥
कंसा सोडीलासि रे जायें ॥ येरी गगनीं अद्दस्ट होये ॥ कंसासुर कांपतु जायें ॥ आपुलीया परिवारातुं ॥२४१॥
वीज जेधवां कडाडिली । ते वेळी मथुरा नीपाणीं जालीं ॥ सकळें उदकें आटलीं ॥ कोरडीया बावी पोखरणी ॥२४२॥
उपरीया धवळारें ॥ पडली रायांची दामोदरे ॥ मग म्हणतीलें कंसासुरें ॥ आतां काय कीजे ॥२४३॥
समें बैसले सकळैक ॥ बुद्धीवंत प्रधान अन्येक ॥ जे जे प्रतापीये वीरनायक ॥ भाट ब्राह्मण साधुसंत ॥२४४॥
हे सकळ पडिले चिंतावनी ॥ रावो म्हणें बुद्धी सांगा कवणी ॥ जे गोकुळां जाउनि ततक्षणीं ॥ झडकरुनीं ठाई घाला ॥२४५॥
म्हणती नंदाचिये घरीं ॥ सुधी कवणु करी ॥ बुधी आंतुडा रे वैरी ॥ येर्हवीं अनर्थु होईल ॥२४६॥
तंव कंसासुरें विडा उचलिला ॥ तेथें मांभळभट उठिला ॥ वीडा घेउनी बोलिला ॥ राया परियसी प्रतिज्ञा माझी ॥२४७॥
आतां देव खेळे बाळलीळा ॥ मांभळभट जाईल गोकुळा ॥ ते कथा पवित्र रसाळा ॥ सांगरे कृष्ण दासा ॥२४८॥
॥ प्रसंगु पांचवा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP