चक्रव्यूह कथा - प्रसंग तिसरा
श्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.
॥ श्रीकृस्णारायायन्मा : ॥
अभीमन्या म्हणे द्रोपदासी : तुम्ही राखावे राया धर्मासी : मी सोडवीन भिमासी : भेदीन चक्रवीहु : ॥१॥
मग आला वेगेसी : प्रदक्षणा करी चक्रवीहुंसी : वीर राहीले चहुफासी : हुडाहुडा : ॥२॥
येक आसती आडदुरी : येक आचाट महावीरी : वीहु रचीला आसे माहाकुसरी : मग काये करी अभीमन्या तो : ॥३॥
दारवठा पुर्वदीसे : तेथें द्रोण गुरू असे : मग गेला दक्षेणे दीसे : तेथे आसे जईद्रथ : ॥४॥
तेथे असती कुमर : आमीत पायाचे मोगर : भयानक दीसती आसुर : नाही जुझार तयामधी : ॥५॥
तेथें असे आवधी खेरी : मग आभीमन्या काय करी : उठावला तयावरी : मग संव्हारी दळाते : ॥६॥
तया विरा पळ सुटला : जईद्रथ चक्राने हाणीतीला : तो मुर्छागत जाला : मग आभीमन्या चालीला तयावरी : ॥७॥
जईद्रथ जवं सावरी : तव आभीमन्या रीगे भीतरी : कौरवसैन्ये संव्हारी : मग पाचारी दु:श्वासैनाते : ॥८॥
मग थोर वरसला बाणी ; दुस्वासैन पडीळा रणी : वीरा जाली भंगाणी : रणि पडिले असंक्षांत ॥९॥
वीर हाणती शस्त्रेंघाते : नीवारुनी तयांचे शस्त्रेतें : वरसला सरजाळातें : आभीमन्या तो : ॥१०॥
अर्जुनाचा कुमरु : सैन्यासी करी मारु : तेथें जाला हाहाकारु : पळाला वीर सुसर्मा तो ॥११॥
कृपाचार्या आणि सुसर्मा : आणीक वीर कृतवर्मा : तेही पाचारीले आभीमन्या : संव सैन्य दोन क्षेवणी ॥१२॥
सकळ हाणीती ऐकोत : तो नीवारी शस्त्रातें : कौरवसैन्यासी जाला काळ : माहावीरा सुटला पळ : सैन्य उधळलें ॥१५॥
ऐसा जाला हाहाकारू : माहावीराच केला संहारु : तव पावला द्रोणगुरु : तीये वेळीं ॥१६॥
तेणे अभिमन्या पाचारीला : आमितां बाणी हाणीतीला : ते बाण तोडितां जाला : अभीमन्या तो : ॥१७॥
त्याचे संध्यान तोडुनी : मग द्रोणाते हाणीतीला खडतर बाणी : सारथी घोडे संव्हारोनी : धनुस्य छेदिलें : ॥१८॥
द्रोण वीरथी केला : रथ सांडोनि पळाला : तव वेगेंसी पावला : अस्वस्थामा तो : ॥१९॥
तया अर्जुनाचीया सुता : आश्वस्तामा जाला हाणतां : आभीमन्या जाला तोडिता : संध्यान त्याचें ॥२०॥
ते बाण तोडुनी : हाणितला पाचां बाणी : सारथी पाडिला रणी : वारु च्यार्ही : ॥२१॥
मग रथ सोडोनी पळाला : वीरासी पळ सुटला : भीम होता वेढिला : तो मोकला जाला : ॥२२॥
भीमातें सोडविलें : वीर पळोनि गेलें : मग दोघें मीलाले : आले आपुलीया सैन्याते : ॥२३॥
तो अभीमन्या वीरू : म्हणौ नये लेकरु : मग म्हणे गुरू : हा हो रे सासार्जुन : ॥२४॥
चक्रवीडु भेदुनी : केली वीरा भंगणी : वीर पाडिलें येक क्षेवणी : तिये वेळीं देखा ॥२५॥
न नागवे हा सुभटु : सैन्यासी भंवंडिला आटु : महाबळि होया सुभटु : पार्थकुमरू हा ॥२६॥
प्राराक्रमि दारुण : नाही सासाअर्जुना वाचून : दळभार मोडोण : चक्रवीहु भेदीला ॥२७॥
द्रोण म्हणे दुर्योधनासी : ऐसा पुत्रि नाही तुमचा वोंसी : जो जिंति पांडवासी : आणि रायां समस्ता ॥२८॥
ऐसे आइकोनी बोलन : मग म्हणे लक्षिमण : आज्ञा दिजे संग्राम करीन : अभीमन्यासी ॥२९॥
यावरी म्हणे गंधारु : तो सासाआर्जुनाचा आवतारू : महाकाळाचा जुंझारू : जींतीला गुरू क्षणामाजी : ॥३०॥
येव्हाडा त्याचा प्राक्रर्म : त्यासी कैसा करीसी संग्राम : वाया वरीतोसी भ्रम : नीवांत राहे ॥३१॥
बोलिला लक्षीमण वीरु : तो अर्जुनाचा कुमरू : मी तुझें लेंकरू : तरि जुंजाचे कवतीक पाहे माझें ॥३२॥
तो आर्जुनाचा कुमरू : दळाचा केला संव्हारू : तयांतें काए लेकरूं : म्हणौ नऐ : ॥३३॥
मी तुझा धाकुटा : जींतीन राया आदटा : रणी साना मोटा : म्हणौ नये ॥३४॥
मज ठेवितासी धाकुटेपण : परि नेणा माझी आंगवण : मि जींकेन जाण : आभीमन्यासी : ॥३५॥
मग द्रोण म्हणे लक्षिमणा : माहावीराचा राणा : तुमचा प्राक्रम केसणा : जे भीडाल आभीमन्यासी : ॥३६॥
गाढे जे आसुर : कोन्ही न राहती तयासमोर : त्याचे बाण जे खडतर : मेरू मंदार कडतरती ॥३७॥
यावरि लक्षिमण म्हणे : आम्हा काये उणे : आम्हासी अज्ञा देणे : कवतीक पाहावें : ॥३८॥
बहुतापरी सीकविले : परी तो न आईके म्हणतीलें : दुर्योघनासि पुसीले : मग नीगता जाला : ॥३९॥
ते व्हेंळी कौरवनाथे : सैन्ये वो दिधले सांगाते : दुस्वासैन सैल्यातें : पाठवीले ॥४०॥
राणे रायाचे कुमर : गजरथ आसिवार : तयां सवं आपार : नीगते जाले : ॥४१॥
च्यार क्षेवणी रहिवरा : दाहा सहस्रे कुंजरा : ऐरा दळभारा : गणित नाही ॥४२॥
आणीक नामनीकें विर : ऐसे दीधले अपार : ऐकवटुनी समोर : चालीयेले : ॥४३॥
मग द्रोणे काऐ केले : तया चक्रवीहुते रचिले : आभीमन्याते वेढिले : कोटी गुणा : ॥४४॥
तो पार्थनंदन : हाणितीला पाचारून : तो न भंगे अभिमन्य : तया वेळी ॥४५॥
सैल्या आणि द्रोण : तीसरा दुस्वासैन : हाणितीला पाचारून : अभीमन्या तो ॥४६॥
सैन्य (नाय) क वीर बहुते : ते शस्त्रे वरूसतें : सींहिनाद गर्जंतें : वाजती रणतुर : ॥४७॥
हाका देती वीक्राळी : न्याहा उठती अंत्राळी : अभीमन्या ते वेळीं : काये करीता जाला : ॥४८॥
संध्यान करी तातडी : त्याची तो शस्त्रे तोडी : बाण वर्सला लक्षे क्रोडी : रणि पाडिले माहावीर ॥४९॥
अभीमन्याचे सर : ते दारूण खडतर : राये भेदिले माहावीर : ते वेळी देखा : ॥५०॥
दळ भंगले देखुन : काये करी दुस्वासैन : मग गदा घेउन : धांविनला ॥५१॥
ते व्हेळी पार्थसुतें : देखीले दुस्वासैनातें : बाणि हाणीतले तयांतें : तो मुर्छेंनातें पावला ॥५२॥
आणीक संधान करी : तव सैल्या पावला झडकरी : बाणी हाणीतला तीखारी : न लोटे माहाबळी तो : ॥५३॥
सरधारी वरसला : वीरा बहुता हाणीतला : तो वरच्यावरि तोडिता जाला : आभीमन्या देखा : ॥५४॥
ते वेळी पार्थसुते : हाणीतलें अस्वस्थामयांते : तो जाला मुर्छागतें : तवं पावला सैल्य ॥५५॥
आस्वस्थामा घातला रथी : सैन्ये सैल्या नीगे पवनगती : कौरवसैन्ये पळती : दाही दीसा : ॥५६॥
तवं पावला लक्षीमण वीर : सवं कुंजराचा भार : राहे राहे वीरा स्थीर : ऐसा धीर देत असे : ॥५७॥
लक्षिमण म्हणे अभीमन्यातें : तुवा सैन्ये मारीलें बहुतें : आता साहे मातें : मग आमित्य बानि वरूसला ॥५८॥
लक्षीमन्य संधान करी : आभीमन्य तोडी वरिच्यावरी : ऐसा संग्राम जाला भारी : त्या राजकुमरासी ॥५९॥
मग त्या लक्षीमणासांगाते : रायाचे कुमर होते : तेही हाणते जाले तेथे : अभीमन्यासी ॥६०॥
ते व्हेळी पार्थसतु : साडोनीया रथ : लक्षीमना पाचारीत : गदा घेतली करी : ॥६१॥
न सावरेचि आला : लक्षिमण हाणीतीला : घाव सत्राणे लागला : तो पडिला रनभुमीसी : ॥६२॥
ऐसा जाल कोल्हाळ : राजकुमरा सुटला पळ : आभीमन्या क्षत्रियाचा काळ : संव्हारी कुमराते : ॥६३॥
मारोनि रायाचे राजकुमरातें : मारीले आपार तेथें : मग संव्हांरी कुंजरातें : वीर पळती कौरवांचे : ॥६४॥
लक्ष्मीमण रणासी आणिला : थोर हाहाकार जाला : सैल्या आस्वस्थामा पळता देखिला : दुर्योधनाने : ॥६५॥
मग म्हणे गांधारु : एता न देखु राजकुमरु : पळत होता दळभारु : तेही सांगीतलें : ॥६६॥
राजकुमर पडिला रणी : ऐसें आईकीलं कानी : मग घातली लोळणी : रथाखाली : ॥६७॥
ऐसा दुखिस्त जाला : तेथे कर्न द्रोण आला : तेही दुर्योधन संबोखीला : मग काऐ बोले द्रोण : ॥६८॥
आम्ही बहुत सीकवीले : (तो नाइके म्हणितिले :) त्याचे नीमित्ये पुरलें : का षाठवीला तुम्ही ॥६९॥
तो नव्हे धाकुटे लेकरु : सासाअर्जुनाचा अवतारु : जाणे चक्रवीहुचां मार्गु : तो विर आनीवार : ॥७०॥
जळो आमचें जीणें : अवघें जीतिलें तेणें : कुमर गेला प्राणे : सुडें घेईन तयाचा ॥७१॥
क्षेत्रियांमाजि पंचानन : न वचे रणभुमिवाचुन : आता अवघे मिळोन : सुड घ्यावा लक्षिमाणाचा : ॥७२॥
मग चक्रवीहु रचीला : वीरासि म्हणता जाला : पाव मागुता घाला : सरिरी प्राण आहे तवं ॥७३॥
वीर सकळ म्हणती : प्राण जातिल तरी जाती : पावो न घालावा मागुती : करु ख्याती आवघे मिळोनी : ॥७४॥
ऐस्या बोलती पैजा : भार चालीले वोजा : वेढिले पार्था आत्मजा : कोटी गुणा : ॥७५॥
थोर कोपे उठावले : सरधारी वरुसले : मग आभीमन्ये काए केलें : ते आईक राया तु : ॥७६॥
ऐक बाण काहाडी : तेही होती लक्ष क्रोडी : येव्हडी मंत्राची प्रौढी : वीर पडले धरणीवरी ॥७७॥
ऐसे युध्य थोर जाले : मग द्रोणे काये केले : त्याचें धनुस्य छेदीले : तवं आस्वस्थामा पावला : ॥७८॥
आणीक मारीले वारु : वीरथी जाला कुमऋ : मग तो माहावीरु : काय करीता जाला : ॥७९॥
मग अभीमन्ये काय करी : मग खर्ग घेतले करी : सैन्याते संव्हारी : तीये वेळी देखा ॥८०॥
येकाते खर्ग हाणतु : येकाते पाई धरोनी टाकीतु : ऐसा मार बहूतु : करी कौरवासी : ॥८१॥
सैन्य बहुत आटले : मग द्रोणे म्हणतीलें : यासी चहबाही वेढीले : पाहीजे तुम्ही : ॥८२॥
कर्ण आणी कृपाचार्या : आस्वस्थामा द्रोणाच्यार्या : चौघें चहुबाबाहिया : शस्त्रधारी वरुसती : ॥८३॥
ते चौघे अतीरथी : संधान वेगेंसी करीती : बाण खडतर हाणती : आभीमन्यासी ॥८४॥
तो उसळला गगना : हाणीता जाला राया कर्णा : तेणे त्यासि आली मुछेंना : तवं आस्वस्थामा हाणितला ॥८५॥
त्याचा मारूनी सारथी : उसळीला गगनगती : तव द्रोणे ब्रह्मशक्ती : हाणीतीली ॥८६॥
ते लागली जीव्हांरी : पडला धरणीयेवरी : तवं हाणीतीला बहुता वीरी : शस्त्रांघाती ॥८७॥
कौरव मिळोणि सकळी : हाणीतीला सुबळी : मुर्छना आली तीये वेळी : तया वीरासी ॥८८॥
मागुतां उठु पाहे : तवं आमित पडतीं घाये : येकला करील काये : कोन्ही नाही तयापासी ॥८९॥
मीळोनी कौरवी समस्ती : आभीमन्या पाडीला क्षेती : वीर भवते भोवती : कोन्ही न राहाती संमुख ॥९०॥
आभीमन्या पाडला रणी : देखोनि कापिंनली धरणी : कौरव म्हणती घ्या याचे पायेवणी : वंदीजे चरण याचे : ॥९१॥
जरि यासी पाठराखा असता : तरी हा समस्तासी मारीता : त्यासी जाला पाहाता : दुर्योधन तो ॥९२॥
पाहे तव रूप सावळा : नेटकी भरली वर्श्ये सोळा : याने संव्हारीलें दळा : आणि कुमरु लक्षिमणा : ॥९३॥
तेथें जईद्रथ आला : तेणें चरणतळे हाणितीला : तयासी दुर्योधन कोपला : बहुतांपरी ॥९४॥
गांधारु म्हणे जईद्रथासी : या भेणे तु पळाला होतासी : पडलया पापरा हाणसी : हा कवण क्षत्रधर्म ॥९५॥
पडलेंया दीधळा पापर : हे आंगवण केली थोर : हासती वीर सकळ : कौरवाचें ॥९६॥
म्हणति भली आंगवण केली : पडलीयां लात दीधली : हे आइकोनी बोली : मान घातली खालुती ॥९७॥
मग दुर्योधन आपन : सोधीता जाला रण : जयाचे गेले प्राण : ते सतगति लावीले : ॥९८॥
जीत घायाळ उचलीले : ते मेलीकारा पाठविले : तव पांडवि आईकीले : आभीमन्या पडिला : ॥९९॥
तेथें कोल्हाळ जाला थोरु : आति दुखींस्त योधीष्टीरु : आईकोनी व्ररकोदरु : आंग टाकीलें धरणीवर्ही : ॥३०१॥
तव सुमद्रेने आईकीले : तीये थोर दख जालें : कथा ई वीस्तारा जाले : ग्रंथ आवरेना : ॥२॥
ईतुके तेथ वर्तलें : तंव कृस्ण आर्जुन पैलिकडे गेले. तेथें युध्ये कैसे जालें : ते सांगे वीष्णुदास पंडीतें :॥३॥६०॥६३॥
इति चक्रवीहु आभीमन्ये बध जाला : प्रसंग तीसरा जाणावा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP