महावाक्यपंचीकरण - शतक सातवे
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
( आरंभींचीं ३ पानें नाहींत )
+ + + + इच्छा प्रपंचा लागुनी । ते गुणक्षोभिणी माया जाण ॥३७॥
अव्याकृत योगें देहद्वय जाले । देवें जाणीतलें मायेसी हें ॥३८॥
मायेचा जाणता तो माया कैसेनी । निरास त्रिगुणीम सहजचि ॥३९॥
ईश्वर हें नाम मायागुणेम जालें । साक्षदृष्टा बोलें मायेचेनी ॥४०॥
सबळ तत्पद यासी च म्हणावें । शुद्ध तें स्वभावें इयातीत ॥४१॥
मुळींचे स्मरण दृश्याचें स्फुरण । मायायोगें जाण चौथा देहं ॥४२॥
ते मूळ प्रकृति अर्धमात्रा स्थिती । सर्वसाक्षीयुक्ती अवस्था हे ॥४३॥
जीवशिव यांचा सबळांश सांडिता । शुद्धांश तत्वतां ऐक्यरूप ॥४४॥
ईश्वर षड्गुण मायायोगें जाण । सर्व साक्षी खूण तंवरी च ॥४५॥
सर्व नाहीं तेथें साक्षत्व कोठुनी । येकत्व निर्गुणीं जीवेश्वर ॥४६॥
अधोस्फुरणानें अष्टदेहनाम । मायाविद्याभ्रम निरसला ॥४७॥
परमात्मा आणि प्रत्यगात्मा ऐसें । येकत्व हि नसे सस्वरूपीं ॥४८॥
बहुत त्रिपुटया बहुत चौपुटया । कल्पना हिंपुटया येथें जाल्या ॥४९॥
शुद्ध स्वरूपाचें दृश्येंवीण ज्ञान । त्याचें नांव कोण सांगे पैं गा ॥५०॥
मिथ्या मायागुणें प्रकृती पुरुष । मायात्यागें भास कैंचा तेथें ॥५१॥
अष्टधा प्रकृती जडांगें चंचळ । सांडितां निश्चळ जैसें तैसें ॥५२॥
अनंत अपार मनावाचेपर । रामरूपसार संपूर्ण जें ॥५३॥
सद्गुरुप्रसादे ज्ञान हें निर्मळ । जन्म हा सफळ स्वामीकृपें ॥५४॥
ऐसें महावाक्य गुरुशिष्याऐक्य । सद्गुरुसुवाक्यबोधें जालें ॥५५॥
अहं ब्रह्म अर्थ महावाक्य याचा । सोहं हंसा साचा वेदांत हा ॥५६॥
नामरूप गेल्यां सस्वरूपज्ञान । लक्षांशे तूं पूर्ण ब्रह्म सत्य ॥५७॥
या नांव विवेकप्रळये बोलिये । स्वानुभवें बुझे आपआप ॥५८॥
शिष्य तो सुलीन आनंदें निर्भर । नेणे आपपर स्वामीबोधें ॥५९॥
तुटलें बंधन मायेअविद्येचें । ज्ञानाविज्ञानाचें मौन्य जालें ॥६०॥
समर्था सद्गुरु नाहीं उत्तीर्गता । पूर्णत्वें पदार्था ठाव नाहीं ॥६१॥
रामभक्ति पूर्ण तेणें सत्यज्ञान । केलें निरूपण संकळीत ॥६२॥
परोपकारार्थ बोलिलें स्वभावें । याच्या शोधें व्हावें ब्रह्म पूर्ण ॥६३॥
रामदासकृपें बोलिले कल्याण । श्रोतीं न्यनू पूर्ण क्षमा कीजे ॥६४॥
इति श्री महावाक्यपंचविवेकप्रळय विमळब्रह्म निरूपण नाम संपूर्ण ॥
व्योव्या संख्या ॥७७१॥ छ
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP