आरती दासबोधाची - वेदाणतसंमतीचा काव्यसिंधु ...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
वेदाणतसंमतीचा काव्यसिंधु भरला ।
श्रुति शास्त्रग्रंथ गीता साक्ष संगम केला ।
महानुभाव संतजनीं अनुभव चाखीला ।
अज्ञान जड जीवा मार्ग सुगम जाला ॥१॥
जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा ।
आरती वोवाळीन विमळज्ञान बालबोधा ॥ध्रु.॥
नवविधा भक्तिपंथें रामरूप अनुभवी ।
चातुर्यनिधी मोठा मायाचक्र उगवी ।
हरिहरहदयींचें गुह्य प्रगट दावी ।
बद्ध चि सिद्ध जाले असंख्यात मानवी ॥२॥
वीस हि दशकींचा अनुभव जो पाहो ।
नित्यनेम विवरितां स्वयें ब्रह्म चि होये ।
अपार पुण्य गांठीं तरी श्रवण लाहे ।
कल्याण लेखकाचें भावगर्भ हदईं ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP