आरती श्रमहरणीची - रघुविरदेहश्रम हरुनी प्रवा...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


रघुविरदेहश्रम हरुनी प्रवाह तूं घेसी ।
भवश्रमहारक म्हणुनी नामाते धरीसी ।
दर्शनमात्रें हरती असंख्य अघरासी ।
आदिशक्ती परमेश्वरी कैवल्या देशी ॥१॥
जय देवी जय देवी जय जी श्रमहरणी ।
दर्शन स्नानें पानें दुस्तर भव तरणी ॥ध्रु.॥
तव तीरीं ज्याचा वास मोक्षप्रद त्यासी ।
अगणित गुण न कळे अगमानिगमासी ।
त्रितापहरके काय वर्णूं महिमेसी ।
श्रीगुरुवर कल्याणपद दायक होसी ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP