मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णलीला| अभंग १ ते ५ श्रीकृष्णलीला अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते २९ अभंग ३० अभंग ३१ अभंग ३२ अभंग ३३ ते ३५ अभंग ३६ ते ३७ अभंग ३८ ते ४१ अभंग ४२ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५४ श्रीकृष्णलीला - अभंग १ ते ५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग १ ते ५ Translation - भाषांतर १.कृष्णराम लीला सवें त्या गोपाळां । जन्मासी सांवळा कैसा आला ॥१॥विस्तार बोलाया बैस तूं अंतरा । करीं तूं पामरा कृपादान ॥२॥म्हणोनि विनवी पाया पैं निगुती । ऐकावें श्रींपाति नामा ह्मणे ॥३॥२.भूमि भार झाला चालली अदकांत । धरूमियां रूप गाईचें हो ॥१॥विधीपासीं गेली रडूं ते लागली । समद्र वहिली कथा सांगे ॥२॥नको भिऊं म्हणो नि अश्वासि लें विधिनें । सवें तीस घेऊन गेला ठायां ॥३॥नामा ह्मणे तेचि आधार सर्वांची । रूप नाम त्यासी कांही नाहीं ॥४॥३.देव क्षिराब्धिसी आलो हो सकळ । करूनि निश्चळ मनामाजी ॥१॥प्राणायाम मुद्रा लावूनि अंतरीं । इंद्रादि श्रीहरि चिंतूनियां ॥२॥विराट जें पाहीं संस्कृतें वर्णियेलें । तेंचि चिंति-येलें नामा म्हणे ॥३॥४.अकस्मात तेथें उठली ते वाणी । नका भिऊं म्ह-णोनि मेघरूपा ॥१॥ऐकतांचि कानीं हरुषले मनीं । देवाचिया श्रेणी नामा म्हणे ॥२॥५.शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊं आतां ॥१॥पृथ्वीवरी दैत्य माजले ते फार । गार्हाणें सुरवर सांगूं आले ॥२॥शेष ह्मणे मज श्रम झाले फार । यालागीं अवतार मी न घेचि ॥३॥रामअवतारी झालों लक्षुमण । सेविलें अरण्य तुह्मां-सवें ॥४॥चैदा वर्षांवरी केलें उपोषण । जाणतां आपण प्रत्यक्ष हें ॥५॥नामा ह्मणे ऐसें वदे धरणीधर । हांसोनी श्रीधर काय बोले ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP