गिरिराज हिमालयाच्या सोनेरी शिखरावर, ऋषिमुनींच्या सान्निध्यांत कल्पवृक्षांनीं वेढलेल्या रत्नजडित खांबांनीं युक्त असलेल्या रत्नजडित खांबांनीं युक्त असलेल्या रत्नमंडपांत रत्नमय सिंहासनावर पार्वतीसह बसलेल्या श्रीशंकराचें दर्शन घेण्यासाठीं स्वत: ब्रह्मदेव आले आणि हात जोडून स्तुति करूं लागले.
“ हे शंकरा, सच्चिदान्मदस्वरूप, वेदान्तवेद्य अशा तुला माझा नमस्कार असो.
ब्रह्माविष्ण्वादि-स्वरूप, सर्वभूतांच्या अंतर्यामीं असलेल्या तुला माझा पुन्हां पुन्हां नमस्कार असो. ”
या स्तुतीनें संतुष्ट झालेले भगवान् शंकर म्हणाले,
“ ब्रह्मदेवा ! तुझें स्वागत असो.
तुझी सृष्टि निर्माण करण्याची कामगिरी व्यवस्थित चालू आहे ना?
मी तुझ्या स्तुतीनें संतुष्ट झालों आहें.
तुझ्या येण्याचें कारण काय ? ”
तेव्हां ब्रह्मदेव म्हणाले,
“ हे देवेशा, तुला अज्ञात असें कांहीं नाहीं; आणि दुसरें असें कीं, तुझ्या चरणकमलाच्या दर्शनाशिवाय माझ्या-सारख्याला दुसरें कोणतें मोठें फल असणार? तरीहि माझ्या मनांत एक गोष्ट जाणून घ्यावयाची आहे. ती म्हणजे सर्व देवदेवतांनी उपास्य म्हणून मानलेला श्रीगणेश आणि त्याची विश्व-स्वरूपी महाविद्या, जिनें मायेनें हें चराचर विश्व निर्माण केलें आहे, जिला परब्रह्मस्वरूप म्हणतात, त्या विद्यासहित विघ्नेश्वराला जाणण्याची माझी इच्छा आहे. तरी त्यासाठीं यंत्र, तंत्र, पुरश्चर-णादि क्रिया कृपा करून मला सांगा.”
तेव्हां श्रीशंकर म्हणाले, “ ब्रह्मदेवा, ऐक, सर्व ऐश्वर्य देणार्या, सर्व लोकांना विमोहित करणार्या, चतुर्विध पुरुषार्थांचें साधन असलेल्या आणि सर्व सिद्धि प्रदान करणार्या गणेशाचें यथायोग्य स्वरूप तूं ऐक. ” असें म्हणून ते सांगूं लागले :
श्रीविद्यागणेशस्य दक्षिणामूर्ति: ऋषि: । देवी गायत्री छंद: ।
विद्यागणेश्वर: देव: ।
गं बीजम् ।
र्हीं शक्ति: ।
पंचबीजात्मक: र्हामिति षडंग: ।
तथा च ध्यानम् - “ करीन्द्रवदनं वन्दे त्रिनेत्रं चन्द्रशेखरम् ॥
अधस्तात् वनिताकारं सिन्दूरारुणविग्रहम् ॥१॥
उत्तुंगस्तनभारोद्य-द्रत्नभूषणभूषितम् ॥
क्कणत्किंकिणीकाकांची-मणिनपुरभूषितम् ॥२॥
बीजापूरं गदां चापं शूलं चक्रं सरोरुहम् ॥
पाशोत्पले च व्रीह्यग्रं स्वदन्तं रत्नकुंभकम् ॥३॥
बिभ्रत्सकंकणैर्हस्तै-रुभाभ्यां हेमशृंखलम् ॥
बिभ्रंत विद्यागणपं ध्यायेत्सर्वार्थसिद्धये ॥४॥ ”
इति ध्यानम् । हें ध्यान दररोज प्रात:कालीं १६ वेळां करावें.
त्यानें सर्व इच्छा पूर्ण होऊन विघ्नेश्वर प्रसन्न होतो.
आतां मी तुला विघ्नराजाचा मंत्रोद्धार कथन करतों:
“प्रणवं पंचबीजाढयं विद्याप्रथमखण्डकम् ॥
गणपतिं चतुर्थ्यन्तं द्बितीयं खंडमुच्यते ॥१॥
वरद्बयदमुच्चार्य तृतीयं खंडमेव च ॥
पश्चात् सर्वजनं मेऽद्य वशमानय संयुतम् ॥२॥
स्वाहे-त्युक्तो गणेशस्य मन्त्रोऽ सर्वसिद्धिद: ॥
धन-धान्यप्रद: सद्य: सर्वलोकवशंकर: ॥३॥
आयुष्कर: प्रजावृद्धिकरो व्याधिविनाशकृत् ॥ ”
हा मंत्र सदगुरूच्या मुखांतून ग्रहण करावा.
सद्गुणी, गणेशभक्त, मंत्रवेत्ता, दयाळू, शांत आणि परंपरेनें चालत आलेल्या क्तिया करणार्या सद्गुरूकडून ‘ विद्यागणपति मंत्र ’ घ्यावा.