विद्यागणपतिरहस्यम् - अध्याय ७ वा
प्रस्तुत पोथी म्हणजे गणेशप्राप्तीची इच्छा करणार्यांना अत्यंत आवश्यक असें पूजाविधान.
ब्रहादेवा, सर्व लोकांवर उपकार होण्यासाठीं, विशेषकरून राजे लोकांना साम्राज्यदायक, यंत्र-तंत्राशिवाय सर्व कर्म साध्य करणारा विद्यागणेश होम सांगतों. चौकोनी, तीन मेखळला असलेलें कुंड तयार करावें. कर्माप्रमाणें तें त्या त्या पटींत तयार करावें. दुसर्यासाठीं देवळांत, स्वत: साठीं स्वत:च्या घरांत, कुंडामध्यें अग्रीचें आधान करून यथासूत्र अग्निमुखक्रिया करावी. कुंडामध्यें सिंहासनाचें ध्यान करून पीठार्चन झाल्यावर पूर्वोक्त मार्गानें पूजा करावी. `` गणानां त्वा '' या मंत्रानें आवाहनापासून नैवेद्यफला-पर्यंत पूजा करून आठ द्रव्यांनीं त्या त्या अक्षरांच्या हजारपट संख्येनें हवन करावें. नवा-वरणपूजा करून कर्म पार पाडलें असतां विघ्रे-श्वर प्रसन्न होतो. पुत्रार्थी पुत्र मिळवितो. धनार्थी धन प्राप्त करतो. बंदी बंधनांतून आणि रोगी केवढयाहि मोठया रोगांतून मुक्त होतो.
कमळांचें हवन करावें. राज्य स्वाधीन होण्याची इच्छा असणार्यानें मालतीपुष्पांनीं हवन करावें. कुडा आणि चपकपुष्पांनीं हवन केल्यास मोठें ऐश्वर्य प्राप्त होतें. शत्रुनाशासाठीं कह्लेरी पुष्पांचें हवन करावें रेशमीवस्त्रांच्या प्राप्तीसाठीं तांबडया फुलांनीं यजन करावें. जास्वंदीच्या होमानें गणेश प्रसन्न होतो.तर कौशेयपुष्यांच्या हवनानें योग.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP