लघु आत्मकथन - मंगलाचरण

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.


॥ श्री सीतारामचंद्र चरणारविंदा भ्यो नम: ॥

लघु अत्ममथन नामें । रचीं मी हा अनुक्रमें ।
यासि पाहतां आत्म भ्रमें । बाधिजे ना सर्वथा ॥१॥
याचा भूपाळीं छंद । ह्मणतां भ्रांति निर्वाद ।
चारी चरण अभंग बद्ध । अथवा वाचा ओंवीनें ॥२॥
स्थूळ शरीरा पासोनी । पिंडीं देह जे का तिन्ही ।
चरीं ब्रह्मांडीं सांगूनीं । आत्मा मथिला आपणें ॥३॥

इति परिभाषा समाप्त: ॥

मंगलाचरण.

नरदेह अयोध्येसी । येवूनि भेटावें रामासी ।
नाहीं तरी चौर्‍यांसीं । फिरणें लागे चुकेना ॥१॥
सीता चिच्छक्ती सहित । निर्गुण आसनीं बैसत ।
तेयूनि पाहतो सतत । चराचर आपणा ॥२॥
आधीं । टांकितो दृश्यासी । मग साधितो शद्धासी ।
निर्विकल्प समाधीसी । निवांत दीप सारिखा ॥३॥
मग जिकडे जिकडे पाहे । तिकडे तिकडे आपण होये ।
होणें न होणें ही राहे । वैष्णवचि तो असे ॥४॥

इति मंगलाचरण समाप्त: ॥

॥ अथ अधिष्ठाण कथन ॥

मी मी ऐसें ह्मणत । परी मी कोण हें नेणत ।
तेंचि आतां मी सांगत । ऐक शिष्या सावध ॥१॥
स्थूळ देह लिंगदेह । कारण जाण तिजा देह ।
चौथा महाकारण देहा । पिंडीं देह चार हे ॥२॥
ब्रह्मांड हिरण्यगर्म माया । चौथी जाण मूळ माया ।
पिंड ब्रह्मांडीं हे काया ॥ मिळूनि झाल्या आठ हीं ॥३॥
चार देहांचा जो साक्षी । त्याची ध्वनी मी मी ऐसी ।
खुणे जाणावें तयांसी । रवूण पुसा वैष्णवां ॥४॥

इति अधिष्ठान निरूपण समाप्त: ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP