पिंड ब्रह्मांड निवारण - पंचम पद

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.


॥ श्रीगणेशायनम: ॥ अथ महाकारण निरसन ॥
महाकारण तो कसा । ऐक सांगतो तमासा ।
तीहीं देहा साक्षी असा । अभिमान धरितो ॥१॥
शून्य कारणदेहाचाही । साक्षी झालों मीचि पाही ।
कृत कृत्य होऊनि राही । परी तो जाण अज्ञानी ॥२॥
मुळीं ज्ञान ना अज्ञान । तेथें साक्षी कैंचा कोण ।
देह विदेहाचें भान । तेंही जेथें न सरे ॥३॥
शून्यत्वाचा ये चपाटा । करी भ्रांति रवटपटा ।
साक्षात्कारावीण रवोटा । उगाचि तोंडें बडबडी ॥४॥
ज्ञानाग्नीचें प्रगटी करण । होतां पिंडाचें दहन ।
मग ब्रह्मांड भस्मोन । उरे उरी आपुली ॥५॥
ब्रह्मसाक्षाकार ऐसें । शास्त्रीं नाव कीं तयास ।
आत्मा साक्षात्कार मिसें । अनुभवी बोलती ॥६॥
श्रवण मनन निदि-ध्यास । आत्म शाक्षात्कारास ।
वेळ नाहीं परी अभ्यास । सद्‍गुरुही पाहिजे ॥७॥
दुर्लभ सद्‍गुरुची प्राप्ती । आत्म श्रवणास प्रचीती ।
एकांत अभ्यास निरुती । तिनीं जाणें दुर्लभ ॥८॥
सद्‍गुरु आणिक सत्शिष्य । सत्शास्त्र श्रवण अभ्यास ।
साधनें शारवा चंद्रन्यायेस । सप्रतांत निरूपण ॥९॥
ज्यांसी वैराग्य अंतर्बाह्य । साधनासी अती साह्य ।
त्यासी घडे साक्षात्कार्य । नाहीं तरी बडबड ॥१०॥
सर्वां साक्षी तोचि आत्मा । शास्त्र ऐसें बोले नेम ।
शास्त्र इंगितार्थ आत्मा । भ्रमिष्टासी नकळे ॥११॥
द्रष्टा तेंचि पर ब्रह्म । शास्त्रें बोलती संभ्रम ।
त्याचा विचार अनुक्रम । ऐक शिष्या सावध ॥१२॥
द्रष्टत्वाभिमान नसे । शुद्ध चैतन्य गवसे ।
दृष्ट नसतां द्रष्टत्व असे । शास्त्र ब्रह्म म्हणे त्या ॥१३॥
द्वैतावीन अद्वैताची । वार्ता बोलतां नयेची ।
शारवेवीण त्या चंद्राची । सूक्ष्म रेरवा ना कळे ॥१४॥
दृष्ट विर-हित जें शुद्ध । घन चैतन्य प्रसिद्ध ।
त्यासी दृष्टत्व संबंध । कळावया बोलती ॥१५॥
महाकारणीं जो पडे । त्यासी ज्ञान धड पुढें ।
झालें ह्मणूनी पहुडे । सिद्धत्वाच्या योग्यते ॥१६॥
आतां ब्रह्म जाहलों मी । ऐश्या संभ्रमाच्या भ्रमीं ।
पडूनि रहातसे कामीं । चित्त त्याचें गुंतलें ॥१७॥
ब्रह्मीं नाहीं दुजे पण । सर्व ब्रह्मचि आपण ।
कर्ता करविता भगवान । अच्यावच्या बडबडी ॥१८॥
विषय संपादना करितां । ब्रह्म झालें म्हणे आतां ।
मज काहीं नाहीं चिंता । परब्रह्म मी झालों ॥१९॥
महा प्रसाद न होतां । फिटे नाती वाचाळता ।
गेल्याविण प्रपंचता । कैसी सरे सांगा कीं ॥२०॥
स्वप्नीं जहाला ब्रह्मज्ञानी । कृतकृत्य झाला जनीं ।
त्यासी मानिला मुर्खानीं । तैसा ब्रह्म झाला तो ॥२१॥
न चिंतितां देह बुद्धी । आत्मत्वाची तैसी सिद्धी ।
झाली तरीच उपाधी । महाकारण निवारे ॥२२॥
विषय संपादन करितां । सिद्ध झालों ह्मणे आतां ।
मज कांहीं नाहीं चिंता । परब्रह्म मी झालों ॥२३॥
आतां असो हें बोलणें । वाचे किती करूं शीण ।
जातां वैष्णवां शरण । आत्म शोध लागतो ॥२४॥

इति श्रीलघुआत्ममथने गुरुशिष्य कथने महाकारण देह निवारण पंचम पद समाप्त: ॥

श्रीसीतारामचंद्रार्पण मस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP