भ्रान्तिमान् अलंकार - लक्षण २
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
भ्रांतिमान् अलंकाराचें उदाहरण :---
“सोन्याच्या द्रवाच्या कांतीप्रमाणें रमणीय अशा प्रियेसह असणार्या रामाकडे पाहून, चातक पक्ष्यांची पिल्लें. (त्यांना) विजेनें युक्त असलेल्या मेघांची भ्रांति झाल्यामुळें, वनामध्यें नाचूं लागलीं.”
ह्या श्लोकांत, चातकांना वाटणार्या हर्षाला उपस्कारक होणारी ही त्यांची भ्रांति आहे; आणि म्हणूनच ह्या भ्रांतीला अलंकार म्हटले पाहिजे. या श्लोकाचा उत्तरार्ध, ‘परिफुल्लपतत्रपल्लवैर्मुमुदे चातकप्पोतकैर्वने’ (ज्यांनीं आपल्या पिसांचीं टोकें फुगवलीं आहेत अशी चातकांची पिल्लें वनांत आनंद पावलीं) असा उत्तरार्ध निर्माण केला तर, हाच श्लोक भ्रांतिध्वनीचें उदाहरण होईल.
आतां अप्पय्य दीक्षितांनीं भ्रांतिमान् अलंकाराचें खालीप्रमाणें लक्षण करून, त्याचें विवेचन केलें आहे, तें असें :---
“कवीला संमत असलेल्या साद्दश्यामुळें, विषयाचे (मूळ) स्वरूप झाकलें गेल्यानें, त्याच्या ठिकाणीं ततसद्दश विषयीचे होणारे भ्रांतिज्ञान ज्या ठिकाणीं वर्णिले जातें, त्याला भ्रांतिमान् अलंकार म्हणतात,
(कवीला संमत असलेल्या साद्दश्यामुळें विषयाच्या ठिकाणीं विषयीचें जें (भ्रांतिरूप) अनुभव - ज्ञान होतें. त्याचें वर्णन करणार्या वाक्याला भ्रांतिमान् अलंकार म्हणावें,) असें भ्रांतिमान् अलंकाराचे लक्षण करून, ह्या लक्षणांतून रूपकाचें निवारण करण्याकरितां, ‘ज्याचे स्वरूप झाकलें गेलें आहे असा विषय’ हे शब्द लक्षणांत घातले गेले आहेत.”
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP