(म्ह० उपमेय वाक्यांतील धर्म बिंब व उपमान वाक्यांतील धर्म प्रतिबिंब, असा या दोन धर्मांत सबंध आहे.)” त्या तुम्हाला मूळ (आधार) असलेल्या ग्रंथाशीं (म्ह० अलंकारसर्वस्वाशीं) तुमच्या म्हणण्याचा विरोध येऊ लागेल. (यावर) तुम्ही (विमर्शिनीकार) असें म्हणल कीं, “वरील अलंकारसर्वस्वकारांच्या च्छेदकांतील ‘यन्निबन्धनंच विवक्षितम् ’ या वाक्यांत, ‘विवक्षितम्’ या विशेषणाला, (एका विशेष्याची जरूर असल्याने) ‘अर्थालंकारत्वम्’ हें विशेष्य शेषपूर्ति म्हणून घ्या, पण औपम्य मात्र घेऊ नक,” पण हें तुमचें म्हणणें चूक आहे. कारण ‘औपम्यं विवक्षितम्’ या वाक्यांत, एक वेळ विवक्षितम् या भूतकृदन्ताच्या (निष्ठेच्या) योगानें, औपम्या ह्या विशेष्याचा कर्म म्हणून परामर्श केला असल्यानें पुढच्या वाक्यांत त्या भूतकृदन्तानें औपम्याचाच परामर्य करणें व्युत्पत्तीच्या द्दष्टीनें योग्य आहे. जसें, ‘न चैत्रार्थमोदन: पव्क: यदर्थं च पव्क: स मैत्र:’ या वाक्यांतल्या दुसर्या पव्क या शब्दाचा संबंध, भाताकडे न लावतां, दुसर्या अध्याह्रत भाजी वगैरेकडे लावला तर, त्यांत स्पष्टच असंगति होईल. म्हणून आम्ही सांगितलेल्या मार्गाला अनुसरून, प्राचीनांनीं या दोन अलंकारांच्या केलेल्या विभागाचा मेळ घालणें योग्य होईल. इतकाही (म्ह० असा मेळ घालण्याचा) चांगुलपणा त्यांच्यांत (विमर्शिनीकारांत) नसेल तर, “एकाच अलंकाराचे हे (प्रतिवस्तूपमा व द्दष्टांत) ओद्न्न प्रकार आहेत, व या दोहोंतलें जें भेदक (फरक) सांगितलें तें या दोघांना अलंकार म्हणायला साधकप्रमाण नसून, हे दोन एकाच अलंकाराचे दोन प्रकार आहेत असें म्हणायला साधकप्रमाण आहे, असें म्हणणें (आम्हांलाही) सोपें आहे.
वैधर्म्यानें होणार्या द्दष्टांताचें उदाहरण :---
“चांगल्या कुळांत जन्मलेले लोक दुसर्यांना आनंद देतात; क८चला (कुचल्याचें झाड) ताप हरण करण्यास केव्हांही समर्था होत नाहीं.”
अथवा हें उदाहरण :---
“हे भगवंता ! माणसांच्या अंत:करणांत तोंपर्यंतच (आधिभौतिक, आधिदैविक, व आध्यात्मिक असे) तीन प्रकारचे ताप असतात जोंपर्यंत तुझा कृपाकटाक्ष त्यांच्याकडे वळत नाहीं; पूर्वेच्या क्षितिजावर सूर्यबिंब आलें असतां, कमळाच्या आंतल्या गाभ्यांत अंधकार कुठून राहणार ?
वरीलपैकीं पहिल्या श्लोकांत, प्रीतिजनन व तापनिर्वापणाचा अभाव या दोहोंमध्यें, वैधर्म्यानें बिंबप्रतिबिंबभाव आहे; व दुसर्या श्लोकांत, तापत्रय राहणें व अंधकार दूर करणें या दोहोंत, बिंबप्रतिबिंबभाव आहे (पण तो वैधर्म्यानें).
येथे रसगंगाधरांतील द्दष्टांतप्रकरण समाप्त झालें.