विभावना अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
“कारणाच्या अभावाच्या स्थळीं राहणारी म्हणून सांगितलेली कार्याची उत्पत्ति ती विभावना.”
मम्मटभटांनीं म्हटलें आहे. “क्रियेचा निषेध (म्ह० कारणाचा अभाव) केला असतांही कार्य व्यक्त होणें, म्हणजे विभावना.” या करिकेंतील क्रिया शब्दानें कारण हा अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणीं (विभावनेंत) कारणाचा अभाव ज्या ठिकाणीं राहतो त्या स्थलीं (म्ह० अभावाबरोबर एकत्र राहणारी) कार्याचा उत्पत्ति सांगितली असतां, (कारणावांचून कार्याची उत्पत्ति या द्दष्टीनें अशा स्थळीं) वरवर विरोध भासत असला तरी, त्या कार्याचें दुसरें कोणतें तरी कारण कल्पून त्या विरोधाचा परिहार करतां येतो उदाहरण :---
“शस्त्रावाचून विवेकी तरूणांचीं सुद्धां अंत:करणें फाडून टाकणार्या, अनंत मायारूप अशा ज्यांच्या सुंदर लीला आहेत, व नीलकमळाच्या पाकळीप्रमाणें ज्यांचे दीर्घ नयन आहेत अशा स्त्रियांचा जय आहे.”
या श्लोकांत, फाडून टाकणें या क्रियेला शस्त्र हें साधन अथवा कारण आहे; परंतु तें शस्त्र नसतांही, ह्या ठिकाणीं, फाडण्याची क्रिया सांगितली असल्यानें, ती वरवर विरुद्ध दिसली तरी त्या क्रियेला (म्ह० विदारण क्रियेला) सुंदर स्त्रियांचे विलास कारण आहेत, अशा अर्थांत त्या विदारण क्रियेचें पर्यवसान होतें.
कोणी या ठिकाणीं अशी शंका घेतात कीं, “ह्या ठिकाणीं ज्या कार्याची उत्पत्ति सांगितली आहे, त्या कार्याचें जें खरें म्हणून माहीत असलेलें कारण त्याचा तर अभाव प्रतीत ह्त नाहीं. बरें, ज्या कारणाचा अभाव प्रतीत होतो, त्याच कारणानें होणारें जें कार्य त्याची उत्पत्तीही येथें सांगितलेली नाही. उदाहरणार्थ, ह्या ठिकाणीं दारण म्हणजे फाडून टाकणें हा एक विशेष पीडेचा प्रकार म्हणून सांगावयाचा आहे; दोन भागांत चिरफाड करणें, ही गोष्ट कांहीं ह्या ठिकाणीं सांगायची नाहीं (ह्या ठिकाणीं विशिष्ट पीडा म्हणजे विरहानें होणारी पीडा [कामपीडा] सांगायाची आहे); त्या कामपीडेला शस्त्र हें कांहीं कारण म्हणून प्रसिद्ध नाहीं. शस्त्र करण म्हणुन जे प्रसिद्ध आहे तें, दोन भाग करणें (चिरफाड करणें) या क्रियेचें. (मग कारणाच्या म्हणजे शस्त्राच्या अभावासह कार्याची म्हणजे चिरफाडीची उत्पत्ति ह्या ठिकाणीं सांगितली आहेच कुठें ? उत्पत्ति सांगितली आहे दुसर्याच एका कार्याची, म्हणजे कामपीडेची. मग येथें विभावना अलंकार तुमच्या लक्षणाप्रमाणें कसा ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP