विशेषोक्ति अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
‘एखाद्या वस्तूच्या प्रसिद्ध कारणांच्या समूहाबरोबर त्याच ठिकाणीं राहाणारी म्हणून वर्णिलेली जी कार्याची अनुत्पत्ति, ती विशेषोक्ति.
अशा ठिकाणीं, कारणें जवळ असतांनाही कार्याची उत्पत्ति न होणें, यांत विरोध भासतो हें खरें; पण तो विरोध, प्रसिद्ध कारणाहून इतर कारणें नसल्याचें जें ज्ञान त्यानें नाहींसा होतो.
उदाहरण :---
“उपनिषदें कोळून प्यालों, अरेरे ! गीता पण तोंडपाठ केली; तरी पण हाय हाय ! ती चंद्रवदना (माझ्या) ह्रदयरूपी घरांतून कांहीं बाहेर जात नाहीं.”
अथवा हें दुसरें उदाहरण :---
“प्रत्येक क्षणीं अखिल लोकांना मृत्यूच्या जबडयांत प्रवेश करीत असलेले पाहूनही, अरेरे ! हें दुष्ट मन अजून विषयापासून परावृत्त हो नाहीं.”
यांपैकीं पहिल्या श्लोकांत, उपनिषदांच्या अर्थाचा विचार व सर्व लोकांच्या अनित्यत्वाचें ज्ञान हीं दोन्हीं विरक्ति अथवा वैराग्य उत्पन्न होण्याची प्रसिद्ध कारणें हजर असूनही वैराम्य उत्पन्न होत नाहीं, असें वर्णन केल्यामुळें, विषयांची आसक्ति अजून मनांत फार आहे, व त्यामुळें वैराग्य उत्पन्न होण्याला प्रतिबंध होतो, असें ह्या ठिकाणीं प्रतीत होते. ही अनुक्तनिमित्ता विशेषोक्ति (म्हणावी). कारण ह्या ठिकाणीं वैराग्याची उत्पत्ति न होण्याला प्रतिबंधकरूप कारण (अत्यंत आसक्ति हें) ह्या ठिकाणीं शब्दानें सांगितलेलें नाहीं. वरील श्लोकांतच ‘रागान्धं चित्तमिदम्’ आसक्तीनें आंधळे झालेलें हें मन असा तृतीय चरण केला, तर हीच उक्तनिमित्ता विशेषोक्तिही होईल.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP