कुणी (म्ह० मम्मटभट्ट) अचिंत्यनिमित्ता ही तिसरी विशेषोक्ति मानतात व तिचें हें उदाहरण देतात :---
‘मदन हा पकटाच हीं तिन्हीं जगें (त्रैलोक्य) जिंकतो. याचें कारण, शंकरानें त्याच्या शरीराचा नाश केला, पण त्याला त्याच्या बळाचा नाश करतां आला नाहीं.”
अनुक्तनिमित्ता विशेषोक्तीमध्यें असलेलें निमित्त, विचार करतां, निमित्तत्वरूपानें (म्हणजे ज्या धर्मानें तें खरोखरीचें कारण होऊं शकतें त्या धर्मानें) युक्त असें प्रतीत होतें (म्हणजे विचारत करायला बसलें तर, या विशेषोक्तींतील खास निमित्त सांपडू शकतें); पण अचिंत्यनिमित्ता विशेषोक्तींत तसें होत नाहीं; तर, याला एखादें निमित्त असेल कांहीं तरी, पण आतां ध्यानांत येत नाहीं, अशा रूपानें यांत निमित्त प्रतीत होतें, हा अनुक्तनिमित्ता व अचिंत्यनिमित्ता या दोन विशेषोक्तींच्या प्रकारांत फरक. असा त्यांचा आशय.
दुसरे कोणी असें म्हणतात, अनुक्तनिमित्तेंत निमित्ताचें चिंत्यत्व हें विशेषण आहे असें समजू नये. नाहींतर ‘अचिंत्यनिमित्ता’ य दुसर्या प्रकाराची कल्पना करण्याचा गौरवदोष होण्याची पाळी येईल, म्हणून चिंत्य व अचिंत्य अशा दोन प्रकारचें निमित्त ज्यांत सांगितलें नाहीं, त्या दोहोंनाही एकच अनुक्तनिमित्ता विशेषोक्ति म्हणावें, म्हणजे अचिंत्यनिमित्ता अनुक्तनिमित्तेहून निराळी मानू नये, असें या लोकांचें म्हणणें,
ह्या अलंकारांत, कारणाच्या सान्निध्याचा, कार्याच्या अनुत्पत्तीमुळें बाध होतो, असें पुष्कळांचें मत. पण खरें पाहिलें असतां, या अलंकारांत कारणाच्या सान्निध्यानें कार्याच्या अनुत्पत्तीचा बाध होतो. (असें आमचें म्ह० जगन्नाथाचें मत).
‘कापराप्रमाणें जाळून टाकला असतांही, जो ठिकठिकाणीं लोकांत प्रबळ असा मिरवतो, त्या अप्रतिहत वीर्य असणार्या मदनाला नमस्कार असो.’
‘मदन हा एकटाच हीं तिन्हीं जगें (त्रैलोक्य) जिंकतो; कारण शंकरानें याच्या शरीराचा नाश केला, पण त्याला त्याच्या बळाचा नाश करतां आला नाहीं.’
या प्राचीनांच्या विशेषोक्तीच्या प्रसिद्ध उदाहरणांत, मदनाच्या शरीराच्या नाशरूपी कारणाचें सान्निध्य प्रमाणानें सिद्ध असल्यामुळें, त्याचा बाध होऊ शकत नाहीं. कारण मदनाच्या शरीराचा नाश झाला तरी, त्याच्या शक्तीचा व बलाचा नाश कसा झाला नाहीं ? असेंच असर्व लोकांना वाटतें; पण मदनांत शक्ति व बल असतांही त्याच्या शरीराचा नाशा अका झाला असें कांहीं कुणाला वाटत नाहीं.