विचित्र अलंकार - लक्षण २
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
ह्या ठिकाणीं लोकांना जीवरूपानें प्रत्यक्ष सिद्ध असलेला जो परमेश्वर, त्याच्या प्राप्तीकरितां दुसर्यांना प्रश्न करणें ही क्रिया वरवर अनुकूल भासणारी असली तरी ती वस्तुत: अनुकूल नाहीं. परमेश्वराच्या शोधाचें अनुकूल साधन म्हणजे ज्याचें त्याचें स्वत:चें ह्रदय; कारण ‘यत् साक्षाद परोक्षात्’ (जें ब्रम्हा प्रत्यक्ष डोळ्यांनीं दिसतें) असें श्रुतीचें वचन आहे.
कोणी अशी शंका घेतील कीं, “यांत कारणाला (म्ह० इष्ट साधनाला) अयोग्य असें कार्य असतें; या द्दष्टीनें, या (विचित्र) अलंकाराला विषमाचा एक प्रकार म्हणावें.” पण हें म्हणणें बरोबर नाहीं; कारण विषम अलंकारांतील कार्याला पुरुषकृत प्रयत्नाची जरूर नसते. पण विचित्र अलंकारांत मात्र, कार्याकरतां पुरुषालाच प्रयत्न करावा लागतो. शिवाय विषमालंकारांत कार्य व कारण या दोहोंमधील गुणांचा निराळेपणा हा (या विषमाच्या) प्रकाराला कारण असतो. (विचित्र अलंकारांत इष्ट साधनाकरितां इष्टाच्या विरुद्ध कृति करणें हा विशिष्ट प्रकार असल्यामुळें, विषम व विचित्र हे दोन्ही अलंकार एकच आहेत असें म्हणतां येत नाहीं.)
येथें रसगंगाधरांतील विचित्रालंकार हें प्रकरण समाप्त झालें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP