क्रमानें उदाहरणें :---
“मेघ दिसूं लागतांच, आभाळ काजळासारखें काळें झालें; आणि इकडे पथिकाचें ह्रदय रक्त, व स्त्रीचे (मृगनयनेचे) गाल फिकट दिसूं लागलें.”
“चंद्राचें मण्डल उदय पावलें; आणि लागलाच विरही जनांचा वर्ग रडूं लागला; व सर्व उत्तम तरूण मंडळीवर आपला अधिकार गाजविणारा मदन खूष झाला.”
ह्यांपैकीं पहिल्या उदाहरणांत गुणांचा (म्ह० काळा, तांबडा व पांढरा या) एकाच वेळीं निरनिराळ्या धर्मींशी (आकाश, पथिकह्रदय व गाल या धर्मींशीं) एकाच वेळीं निरनिराळ्या धर्मींशी (आकाश, पथिकह्रदय व गाळ्ल या धर्मींशीं) संबंध वर्णिला आहे. दुसर्या उदाहरणांत, क्रियांचा वरीलप्रमाणेंच संबंध [म्ह० उदय पावणें, रडणें व आनंद पावणें या क्रियांचा (क्रमानें) चद्र, वियोगी जन व मदन या भिन्न धर्मींशी] झाला आहे.
“श्री विष्णूच्या पायांच्या नखांच्या, चोहोंकडे फांकणार्या, प्रभेनें तांबूस, श्री शंकराच्या जटांच्या तेजोवलयामुळें सोन्याची शोभा धारण करणारी, आपल्या मूळच्या वर्णामुळें, पाणीदार मोत्यांच्या चळकणार्या घोसाप्रमाणें (तेज:पुंज) देह असलेली, अशी ती स्वर्गंगा, पापांच्या राशीनें क्लेश पावणार्या आम्हाला, अनेक त्रासांतून वाचवो.”
“हे राजा ! तुझ्या भोंवतालचे कवि, लोभानें, भले तुझी सुति करोत; पण तेवढयानें तूं स्तुति करायला योग्य थोडाच होणार आहेस ? (मुळींच नाहीं); कारण, अलिकडे तुझ्या धनुष्याचा तरुण पराक्रम पृथ्वीला पोटाशीं घट्ट आवळून (काय) धरीत आहे; दिशांना आलिंगन (काय) देत आहे; स्वर्गसुंदरीचें चुंबन (काय) घेत आहे; आणि अगम्य अशा अमरावतीशीं एकदम संबंध (काय) ठेवीत आहे !”
वरील दोन उदाहरणांपैकीं पहिल्यांत, (तांबडा, पिवळा व पांढरा या) गुणांचा गंगा या एक धर्मीशीं, व दुसर्यांत क्रियांचा (कवटाळणें, आलिंगिणें चुंबिणें व अगम्यागमन करणें या क्रियांचा) चापप्रतापाशीं (या एक धर्मीशीं) संबंध आला आहे. ‘आताम्रा०’ या श्लोकांत, श्रीहरीच्या चरणनखाशीं संबंध येण्याच्या वेळीं, गंगेचा श्रीशंकराच्या जटांशीं संबंध येत नाहीं (हें खरें) आणि त्यामुळें, लाल (तांबूस) व पिंगट रंगांचा एकाच वेळीं गंगेशीं संबंध येण्याचाही संभव नाहीं (हेंही खरें); प्रत्येकाचा, संबंध येणें शक्य असल्यानें, (तिन्ही वर्णांचा एकाच वेळीं संबंध नसला तरी) कांहीं बिघडत नाहीं.
“श्रीविष्णूच्या कमलासारख्या चरणांच्या स्वच्छ नस्वातून तुझा जन्म, शंकरांच्या जटांचें वेटोळें हेंच घर त्यांत तुझें हारणें, व पतित जनांना तारणें हा तुझा आवडता उद्योग; मग हे आई (गंगे) तुझा जगांत सतत उत्कर्ष कां बरें असणार नाहीं ?”
ह्या ठिकाणीं सांगितलेल्या तीन गोष्टी (जन्म, राहणें व उद्योग) यांपैकीं एकानेंही गंगेचा उत्कर्ष होणें संभवनीय आहे; तरी पण ह्या तिन्ही गोष्टी गंगेचा उत्कर्ष करण्याकरतां, चढाओढीनें एकत्र आल्या आहेत. व त्या तिन्हीही रमणीय आहेत
“चंदनाच्या झाडावर असणार्या मोठया सापांच्या तोंडातून निघणारें, व शरीराला भाजून टाकणारे वारे वाहत आहेत; आंब्याचीं हीं लाल झाडें डोळ्यांना चटके देत आहेत; आणि हाय हाय ! हे कोकिळही कानांत आपलें कूजनरूपी विष ओतीत आहेत; मग कोवळ्या कमळाच्या कानांत आपलें कूजनरुपी विष ओतीत आहेत; मग कोवळ्या कमळाच्या देठाप्रमाणें कोमल शरीराची ही बाला आपले प्राण कसे वाचवील बरें ?”
ह्यांतील तीनही पदार्थ (वारे, आंबे व कोकिळ) प्राण घेण्याकरता एकत्र येत असल्यानें अरमणीय आहेत.