प्रत्यनिक अलंकार - लक्षण २
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
“ज्या भगवान् विष्णूचें कांहींही वाकडे करायला समर्थ नसलेला, व भगवंतांनीं शिरच्छेद केल्यामुळें ज्यानें त्यांच्याविषयीं वैरभाव मनांत धरला आहे असा, तो चतुर राहु, त्या भगवंताच्या सुंदर वदनासारखा ज्याचा आकार आहे अशा चंद्राला अजून त्रास देत आहे.” (मात्र १४।७८)
या अलंकारसर्वस्वकारांनीं प्रत्यनीकाचें उदाहरण म्हणून दिलेल्या प्राचीन पद्यांतही, भगवंताविषयीं सतत वैरभाव असल्यामुळें कीं काय, भगवंताच्या तोंडासारखा जो चंद्र त्याला राहू त्रास देत आहे, अशा अर्थाची प्रतीति होत असल्यानें गम्य उत्प्रेक्षा मानली पाहिजे,
पण “ज्यानें पृथ्वीवरील माझ्या रूपाची कीर्ति नाहींशी करून टाकलीं त्याच्यावर हिचें मन बसलें (नाहीं कां.), अशा रीतीनें तुझ्याविषयी मदनाला मत्सर वाटल्यामुळेंच कीं काय, कांहीं एक दयामाया न दाखवितां तो तिला घायाळ करीत आहे ” (माघ ९।६३).
ह्या कुवलयानंदकारानें दिलेल्या उदाहरणांत हेतु हा अंश व उत्प्रेक्षा हा अंश असें दोन्हीही अंश शाब्द असल्यानें, हें ह्या अलंकाराचें उदारहण ह्या महाशयांनीं कसें काय दिलें, तें आम्हांस समजत नाहीं.
प्रतिपक्षाच्या ठिकाणीं असलेलें सामर्थ्य व स्वत:च्या ठायीं असलेला दुबळेपणा, हीं ह्या अलंकारांत, प्रतीत होत असल्यानें, दुसर्या प्रकारच्या हेतूत्प्रेक्षेहून हा प्रकार निराळा पडतो हें खरें असले तरी, त्यामुळें हा प्रकार हेतूत्प्रेक्षेच्या कक्षेच्या बाहेर राहतो, असें मात्र म्हणतां येणार नाहीं. कारण हा प्रकार हेतूत्प्रेक्षेला सोडून कधींही राहत नाहीं; फक्त याला हेतूत्प्रेक्षेचा एक पोटभेद माना म्हणजे झालें. पृथ्वीच्या पोटांतला एक प्रकार असलेला पट घटाहून निराळा असला तरी, तेवढयामुळें तो पट पृथ्वीच्या बाहेरचा (पदार्थ) आहे असें म्हणतां येत नाहीं. असेंही (याबाबतींत कित्येकांचें म्हणणें आहे.
येथें रसगंगाधरांतील प्रत्यनीक प्रकरण समाप्त झालें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP