मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|मेघदूत|पूर्वमेघ| श्लोक ४१ ते ४५ पूर्वमेघ श्लोक १ ते ४ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२२ पूर्वमेघ - श्लोक ४१ ते ४५ महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर. Tags : meghadoottranslationभाषांतरमराठीमेघदूत श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर (४१) उद्यानांच्या वइ, तव दिनीं, पांडुरा केतकांनीं ।चैत्यें सारीं घरटिं करुनी व्यापिलीं वायसांनीं ॥रानें जेथें करिति पिकल्या जांभळी श्यामवर्ण ।हंसां थोडी वसति जिकडे, होति ऐसे दशार्ण ॥(४२) जातां, लोकीं प्रथित, विदिशा राजधानी तयांची ।लाधे तूतें, परिणति परा, बा ! विलासीपणाची ॥तीरीं वीचिध्वनिमुखर जें, चंचलभ्रू तरंगीं ।प्यावें वेत्रा - जल मधु, तिचें आस्य कीं, प्रेमरंगीं ॥(४३) नीचैर्नामा गिरिवरि वसें; कांहिं विश्रांति चाखीं ।जो कादंबीं पुलकित तव स्पर्शनें जाहला कीं ॥जेथें वेश्यारतिपरिमळें व्यापिल्या कंदरांनीं ।चंदोद्दामें प्रकटिलिं निजें यौवनें नागरांनीं ॥(४४) वर्षीं जातां पथिं नवजलें, घेउनी विश्रमास ।तीरोद्यानीं वनतटिनिच्या, यूथिकाजालकांस ॥गंडस्वेदा पुसुनि कमलें कर्णिंचीं म्लान होती ।छायादानें क्षणचि सुखवी माळिणींचीं मुखें तीं ॥(४५) घ्यावा लागे, त्यजुनि उदिची, वांकुडा मार्ग तूतें ।प्रासादांचा विसर न तरी उज्जनीच्या पडों दे ॥विद्युत्तेजें पुररमणिचे नेत्र भेणें विलोल ।त्यांहीं तेथें जरि न रमसी, बा ! तुझा जन्म फोल ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP