पूर्वमेघ - श्लोक ६१ ते ६५

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(६१) अन्येकालीं, जलधर ! महाकालभूमीस जासी ।
राहें तेथें तरि, रवि न जों जाय अस्ताचलासी ॥
व्हावें सन्ध्याबलिसमयिंचा दुंदुभी तूं अमोल ।
तूतें मोठें फल मधुरशा गर्जितांचें मिळेल ॥

(६२) नृत्यें ज्यांच्या मुखर रशना; कोंदिल्या रत्नजातें ।
ढाळोनी ज्या, कनकवलिंच्या, शीणल्या, चामरांतें ॥
तूझ्या, पादां सुखद, पहिल्या, पावुनी प्रोक्षणाला ।
वेश्या तूतें वितरिति अलिश्रेणिशा वीक्षणांला ॥

(६३) तेथें वृक्षांवरि भुजजशा, मंडलें तूं स्थिरावें ।
संध्यारागा तदुपरि जपापुष्परक्ता वरावें ॥
ओलें नागांबर जणुं; असा तूं स्मरारीस सेवीं ।
नृत्यारंभीं, गतभयचि या पाहि भक्तीस देवी ॥

(६४) जालोद्नीणैंरुपचितवपु: केशसंस्कारधूपैर्बन्धुप्रीत्या भवनशिखिभिर्दत्तनृत्योपहार: ।
हर्म्येष्वस्या: कुसुमसुरभिष्वध्वखेदं नयेथा
लक्ष्मीं पश्यंल्ललितवनितापादरागाङ्कितेषु ॥

(६५) भर्तु: कण्ठच्छविरिति गणै: सादरं वीक्ष्यमाण:
पुण्यं यायास्त्रिभुवनगुरोर्धाम चण्डीश्वरस्य ।
धूतोद्यानं कुवलयरजोगन्धिभिर्गन्धवत्यास्तोयक्रीडा निरतयुवतिस्नानतिक्तैर्मरुद्भि: ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP