मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|प्रल्हाद चरित्र| भाग ३ प्रल्हाद चरित्र भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ प्रल्हाद चरित्र - भाग ३ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpralhadअभंगनामदेवप्रल्हाद भाग ३ Translation - भाषांतर घेऊनियां गुरू आले राजसभे । वंदूनियां उभे सन्मुख तो ॥१॥ह्मणे काय पढसी तूं सांग । म्हणे लागूं वेगें हरीहरी ॥२॥ऐकतां वचन बोले क्रोधावोनि । पापीयासी झणी नका येथें ॥३॥माझा जो वैरी तया आठवितो । कुळघात होतो ऐशानेंचि ॥४॥म्हणूनि समुद्रीं नेऊनियां टाका । अग्नींत लोटा कां दुराचारी ॥५॥शस्त्रघाव वरी मारारे अधम । काळाग्नीते सम विष पाजा ॥६॥पर्वतावरी नेऊनियां टाका । प्राण याचा घ्या कां अवघे दूत ॥७॥राजआज्ञा होतां संकोचित दूत । राजा बोले त्यांतें काय पाहतां ॥८॥दूतीं राजाज्ञेनें धरुनि हो नेतां । मुखीं त्या अनंता आठवितो ॥९॥तयेकाळीं भक्त उभा निर्भय चित्त । काय हो करीत हरि माझा ॥१०॥नेऊनियां तिरी समुद्राचे पाहीं । म्हणती आतांही ऐक बापा ॥११॥येरु म्हणे हरि असे नारायण । तो मज लागून तारील हो ॥१२॥टाकितां उदकीं वरतीच राहे । म्हणती हा पाहें पोहतसे ॥१३॥तेथूनि काढितां अग्नींत टाकीला । शीतळ हो झाला अग्नी स्पर्शें ॥१४॥हरिदासा काय शक्ति हो जाळाया । म्हणोनियां पायां वंदितसे ॥१५॥मुखीं हरिहरि उच्चार नामाचा । गर्जे भक्त साचा सर्वांठायीं ॥१६॥अग्नि तो शीतळ होतां मात राया । म्हणे जादु केली याद दुर्जनानें ॥१७॥विष हळाहळ करुनियां वाटी । नेऊनियां होटीं लाविताती ॥१८॥भोक्ता नारायण म्हणोनियां त्याला । अमृत तो झाला प्रल्हादासी ॥१९॥पर्वंत शिकरीं बैसऊनि खालें । लिटितां हो बोले सर्व सत्ता ॥२०॥जळीं स्थळीं व्यापि आहे नारायण । तेथें काय होणें भय दु:ख ॥२१॥पडतांचि खालीं उठोनियां उभा । पाहतां हो सभा भय दु:ख मानी ॥२२॥म्हणे मारा याला शस्त्रघाय वरी । धांवोनियां चिरी महाबळें ॥२३॥हाणितां शस्त्रानें न लगती कांहीं । मुखीं हरि पाही आठवीत ॥२४॥म्हणे गजपायीं बांधोनियां मारा । कुंजर ते आणा बोले राजा ॥२५॥आणोनियां हत्ती घालीत हो वर । पाहे तो समोर विक्राळ सिंह ॥२६॥दाहि दिगंतर उलंघुनी गेले । उपाय न चाले कांहीं त्यासी ॥२७॥श्रमयुक्त झाळा राजा कांहीं केल्या । भक्त राजा भला न ढळेचि ॥२८॥नामा म्हणे भक्त निर्भय सर्वांसी । काय हो तयासी उपेक्षी हरी ॥२९॥ N/A References : N/A Last Updated : January 12, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP