मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|संत नामदेवांचे पाळणे| कान्होबा निवडीं आपुलीं ग... संत नामदेवांचे पाळणे स्त्री गरवार पति उदरीं । ... कान्होबा निवडीं आपुलीं ग... कान्होबा निवडीं आपुलीं गो... अरे अरे कान्हया वेल्हाळा ... मुक्ताफळ नथ नाकीं । चरणीं... अच्युता अनंत गोविंद । अरे... हरिनाम गोड झालें काय सांग... रावणा मारून माझे माये गे ... संपूर्ण विश्चाचा आत्म्याच... जो भक्तजन करुणाकर क्षीरसि... योगी ब्रम्हचारी सिद्ध ब्र... राजसी तामसी जें गाणें । त... तळीयाचे पाळी वृक्षावरी बै... भक्त आवडता भेटला । बोलूं ... अहो त्रिभुवना माझारीं । भ... पाळणा - कान्होबा निवडीं आपुलीं ग... पाळणे - Palane are the marathi lullby songs usually sung at Naming Ceremony called "Barase" (बारसे). These are also sung while putting child to sleep in a swing. Tags : namdevpalanaनामदेवपाळणा पाळणा Translation - भाषांतर कान्होबा निवर्डी आपुलीं गोधनें ॥धु०॥पांच पांच पोळ्या तीन भाकरी । दीड कानिवला एक पुरी । आम्हा धाडिलें वैल्या दुरी । आमुची ठकवून खाल्ली शिदोरी ॥ कान्हो० ॥१॥परियेसी शारंगधरा । तुझा बैल चुकला मोरा । सांगूं गेलों तुझ्या घरा । पाठीं लागला तुझा म्हातारा ॥ कान्होबा० ॥२॥परियसीं हृषीकेशी । गाई म्हशीचें दूध पिशी । वासरें प्यालीं म्हणून सांगशी । उद्यां ताक नाहीं आम्हासी ॥ कान्हो० ॥३॥कान्होबा ओढाळ तुझ्या गाई । होत्या नव्हत्या कळंबा ठायीं । शिव्या देती तुझी आई ॥ कान्होबा० ॥४॥विष्णुदास नामा साहे । देवा तूंचि बाप माये । अखंड माझे ह्रदयीं राहें ॥ कान्होबा० ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 16, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP