मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मस्वरूपस्थिति| अभंग १६ ते २० आत्मस्वरूपस्थिति अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १२ अभंग १३ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते २८ आत्मस्वरूपस्थिति - अभंग १६ ते २० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpadअभंगनामदेवपद अभंग १६ ते २० Translation - भाषांतर १६. देव खाते देव पीते । देवावरी मी निजतें ॥१॥देव देते देव घेते । देवासवें व्यवहारिते ॥२॥देव येथें देव तेथें । देवाणिणें नाहीं रीतें ॥३॥जनी म्हणे विठाबाई । भरूनि उरलें अंतरबाही ॥४॥१७. श्रीमूर्ति असे बिंबली । तरी हे देहस्थिति पालटली ॥१॥धन्य माझा इह जन्म । ह्रदयीं विठोबाचें नाम ॥२॥तृष्णा आणि आशा । पळोन गेल्या दाही दिशा ॥३॥नामा म्हणे जनी पाहें । द्वारीं विठ्ठल उभा आहे ॥४॥१८. जनी द्दष्टि पाहे । जिकडे तिकडे हरि आहे ॥१॥मग म्हणे वो देवासी । तुमच्या नामयाची दासी ॥२॥नामयाचा प्रसाद । झाला जनीला आनंद ॥३॥१९. झाली पूर्ण कृपा आहे । ऐसा पूर जो कां पाहे ॥१॥ऐसा पूर जो कां पाहे । गुरुपुत्र तोचि होय ॥२॥पूर्णपदीं जो स्थापिला । जनीं म्हणे धन्य झाला ॥३॥२०. नित्य हातानें वारावें । ह्रदय अंतरीं प्रेरित जावें ॥१॥ऐसा स्वरूपाचा पूर । आला आसे नेत्नावर ॥२॥स्वरूपाचा पूर आला । पाहातां डोळा झाकूळला ॥३॥जनी म्हणे ऐसा पूर । पाहें तोचि रघुवीर ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP