करुणापर मागणें - अभंग १३ ते १५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या
१३.
दासी देवा अनुसरावें । कां आणिका शरण जावें ॥१॥
लाभालाभ जेथींचा तेथें । श्रम अन्यथा तो व्यर्थ ॥२॥
पुण्योदक मागीरथी । नेदी चातकाची तृप्ती ॥३॥
सेवितां स्तवितां चकोरा । काय वर्षे अमृतधारा ॥४॥
कासवीविण कोण बाळा । पाळी निज द्दष्टि स्नेहाळा ॥५॥
स्वामीचिया मनोभावा । करणें ते परम सेवा ॥६॥
दास विठा म्हणे मीन । कैसा वाचे उदकेविण ॥७॥
१४.
घेतां देतां तूं तिहीं लोकीं उदार । माझा कां अव्हेर केला बापा ॥१॥
तुझी सेवा देईं तुझी सेवा देईं । तुझी सेवा देईं श्रीविठ्ठला ॥२॥
विठा म्हणे केशवा नको हा संसार । तुझे चरर्णीं अभ्यंतर ध्यान देईं ॥३॥
१५.
कीर्तनाची ध्वनि पडली माझ्या कानीं । जाईन लोटांगणीं तेंथवरी ॥१॥
माझें सुख तें पहा वैष्णव जन । तयांचीं दर्शनें कैं होतील ॥२॥
उभ्या गाती आणि कीर्तन ऐकती । ह्रदयों आळविती केशीराज ॥३॥
ऐसीयाचे संगतीं होता बाप माझा । म्हणतसे राजा विठा नामयाचा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2015
TOP