राघवभट्टयां हिरण्यवर्णामित्यस्य - ‘आद्याया: धीऋषि: प्रोक्तस्तत
आनंदकर्दमौ । चिक्लीतश्चेंदिरापुत्रो मुनय: संप्रकीर्तिता: ॥’ इति ।
अन्यत्रापि - ‘तत्राद्यमंत्रस्य ऋषिर्लक्ष्मीर्देवी प्रकीर्तिता । ततश्चतुर्दशानां
वै ऋषयोऽत्र प्रकीर्तिता: ॥ आनंदकर्दमश्चैव चिक्लीतश्चेंदिरासुत: ।’ इति ।
अर्थ :--- ‘हिरण्यवर्णां’ या प्रथम ऋचेचा ऋषि ‘लक्ष्मी’ व पुढील चतुर्दशॠचांचे
आनंद, कर्दम, चिक्लीत व इंदिरासुत हे ऋषि होत. मंत्रद्रष्टया ऋषींमध्यें
‘स्त्री’ ऋषि असल्याचें कित्येक स्थलीं निदर्शनास येतें. म्हणून येथें लक्ष्मी हा
‘स्त्री’ ऋषि कसा ? ही शंका घेण्याचें कारण नाहीं. तसेंच कित्येक मंत्रांचा ऋषि व
देवता एकच असल्याचीं ऋकसंहितेंत अनेक उदाहरणें आहेत. कर्दम व चिक्लीत
हे इंदिरासुत म्हणजे लक्ष्मीचे पुत्र असल्याचं ‘कर्दमेन, आप: सृजंतु’ या
मंत्रांतील वर्ननावरून दिसतें म्हणून इंदिरासुत स्वतंत्र ऋषि नसून हें कर्दमचिक्लीताचें
विशेषण असावें असें वाटतें. पण श्री. वैद्यनाथ पायगुंडे लिहितात ---