संस्कृत सूची|पूजा विधीः|श्रीसूक्तविधानम्|ऋषिदैवतच्छंदोविचार:| छंदोविचार: ऋषिदैवतच्छंदोविचार: ऋषिदैवतच्छंदोविचार: श्रीसूक्ते ऋष्यादिविचार: आनंदकर्दमचिक्लीतेंदिरासुताश्चत्वारो ऋषय: दैवतविचार: छंदोविचार: छंदोविचार: प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे. Tags : hindupoojasrisooktvidhiपूजाविधीश्रीसूक्तहिंदू छंदोविचार: Translation - भाषांतर शारदातिलकटीकायां ‘पूर्वासां तिसृणां छंद अनुष्टुप् समुदीरितम् ।चतुर्थ्या बृहती पंचमी षष्ठी तु त्रिष्टुबीरिता ॥ सप्तमी प्रमुखाष्टानांअनुष्टुप् परिकीर्तितम् । प्रस्तारपंक्तिरंत्याया देवता श्री: प्रकीर्तिता ॥’इति ॥ प्राचीन ग्रंथामध्यें - ‘आद्यास्तिस्त्रोऽनुष्टुभ: । चतुर्थी बृहती । पंचमीषष्ठयौत्रिष्टुभौ, ततोऽष्टावनुष्टुब:, अंत्या प्रस्तारपंक्ति: ।’ असाच वरील वचनानुसार छंदोनिर्देश केलेला आहे. पण अलीकडील संशोधनामध्यें - चतुर्थी बृहती व अंत्याआस्तारपंक्ति: हें युक्त नसून चतुर्थी प्रस्तारपंक्ति व अंत्या आस्तारपंक्ति छंद लक्षणानेंसिद्ध होतो असें विद्वान् म्हणतात. पं. सातवळेकर यांनीं याप्रमाणेंच छंदोनिर्देशकेला आहे. चं० दीपिकेमध्यें - ‘चतुर्थी च तथान्तिमा, प्रस्तारपंक्ती’ असेंलिहिलें आहे. वैद्यनाथ पायगुंडे आपले श्रीसूक्तव्याख्यानांत लिहिता -“चतुर्थी‘कां सोऽस्मि’ ही भुरिक पुरस्तात् बृहती, द्वितीयपादे एकाक्षराधिक्यात्भुरिजत्वम् । पंचदशी - ‘तां म आवह’ ही - इयं आस्तारपंक्तिछंदस्का । अंत्ययो:पादयोर्द्वादशाक्षरत्वात् ।” पण प्रथमच छंदोनिदेंश करतांना - ग्रंथारंमीं -‘आस्तारपंक्तिरंतायाश्छंद एवं क्रमो मत: । प्रस्तारपंक्ति: पंक्तिर्वा तस्या: छंदइतीरितम्’ असा शेवटच्या ऋचेबद्दल प्रस्तारपंक्ति छंदाचा विकल्प दाखवितात.वैदिक मंत्राच्या छंदाबद्दल आम्हीं पुष्कळ विचार केला. पण शेवटीं असाचनिष्कर्ष निघतो कीं, सर्वानुक्रमानें ज्या मंत्राचा जो छंद सांगितला असेल तोचप्रमाण मानणें, कारण कित्येक वेळां अक्षरपरिगणन करतांना व्यंजनें सोडावीलागतात, अथवा गणना करून छंद जुळवून घ्यावा लागतो. उदाहरण - ऋ सं.अष्टक २ अध्याय १ वर्ग १३ यांतील ‘सहिशर्धो’ ही ऋचा. या ऋचेचा सर्वानुक्रमानें अतिधृति छंद दिला आहे. अक्षरगणना करतां ६८ अक्षरें होतात.वस्तुत: ७६ अक्षरें पाहिजेत. ८ अक्षरें अधिक घ्यावीं लागतात. त्याशिवायअतिधृति छंद जमत नाहीं. श्रीसूक्त परिशिष्टरूप असत्यानें याचा सर्वानुक्रम नाहीं.म्हणून छंदाबद्दल मतभेद द्दष्टीस पडतात. आम्हीं शारदातिलकस्थ टीकाकार व अन्यलिखित - मुद्रित विधानपुस्तकांतून वर लिहिल्याप्रमाणें छंदोनिदेंश केला असल्यानेंतसाच केला आहे. पृथ्वीधराचार्य, निर्णयसिंधुकार कमलाकरभट्ट, नारायणभट्टइत्यादि प्राचीन विद्वानांनीं आपले निबंधग्रंथांतून - प्रयोगग्रंथांतून वरीलप्रमाणें‘चतुर्थी बृहती, अंत्या प्रस्तारपंक्ति:’ असेंच लिहिलें आहे तें अगदीं विचार नकरतां छंदोलक्षण लक्षांत न घेतां अंधपरंपरेनें लिहिलें असें कसें म्हणतां येईल ?तात्पर्थ, हिरण्यवर्णामिति पंचदशर्चस्य सूक्तस्य आद्याया: लक्ष्मी:तत आनंदकर्दमचिक्लीतेंदिरासुता ऋषय: । श्रीर्देवता (श्र्यग्नीदेवते वा)आद्यास्तिस्त्रोऽनुष्टुभ: चतुर्थी बृहती, पंचमीषष्ठयौ त्रिष्टुभौ, ततोऽष्टावनुष्टुभ:, अंत्या प्रस्तारपंक्ति:, असा ऋष्यादिनिर्देश करणेंच शास्त्रसंमतहोय असें आमचें स्पष्ट मत आहे. बहुप्रमाणग्रंथसंमतिलाभात । ‘ब्यंजनानि तुबीजानि शक्तयस्तु स्वरा मता: । अलक्ष्मीपरिहारार्थं लक्ष्मीप्राप्त्यै तथैव च ॥विनियोग: समादिष्टो ऋष्यादीन्विन्यसेत् तत: ।’ अथवा - ‘श्रीवैं बीजं रमा शक्ति:हीं कीलकमिदं मतम । बिंदव: कीलकं चेति भूर्भुव:स्वरनेन वै ॥ प्रणवाद्येनदिग्बंध: ।’ व्यंजनें - ककारादि - हीं कीलकं चेति भूर्भुव:स्व: हा दिम्बंध होय. क्वचित् -‘हिरण्यावर्णामिति ऋग्बीजं । कांसोऽस्मि इति ऋक् शक्ति: । तां म आवह इति कीलकं ।अलक्ष्मीपरिहार व लक्ष्मीप्राप्ति याकरितां श्रीसूक्ताचा विनियोग सांगितला आहे.आतां कामनेप्रमाणें शक्ति, बीज व कीलक बदलतें तें तज्ज्ञांकडून समजून घ्यावें.॥ इति श्रीसूक्तविधाने ऋष्यादिविचार: ॥ N/A References : N/A Last Updated : May 24, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP