आनंदकर्दमचिक्लीतेंदिरासुताश्चत्वारो ऋषय:
प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.
आनंद, कर्दम, चिक्लीत व इंदिरासुत हे चार ऋषि आहेत. सारसंग्रह व
मंत्रकोशोक्त प्रयोगामध्यें (शांतिरत्न) इंदिरासुत याबद्दल श्रीपुत्र असा निदेंश
आहे. पं. सातवळेकर यांनीं मुद्रित केलेल्या ऋकसंहितेच्या पुस्तकांत (आवृत्ति दुसरी)
शेवटीं परिशिष्टांत श्रीसूक्त दिलें असून त्यांत ‘आनंद, कर्दम, श्रीद, चिक्लीत’
असा ऋषींचा उल्लेख केला आहे. म्हणजे लक्ष्मी व इंदिरासुत हे ऋषि घेतले नाहींत.
पण श्रीसूक्तविधानाच्या निरनिराळ्या प्राचीन हस्तलिखितव मुद्रित पुस्तकांतून -
प्रयोगग्रंथांतून मंत्रकोशामध्यें ‘श्रीद’ हा ऋषि कोठेंच उल्लेखिलेला नाहीं.
चौखम्बामुद्रित पुस्तकांत खालीं टिण्यणींत ‘श्रीद’ असा उल्लेल आढळतो. पण
मूलवचनांत तसा कोठेंही निर्देश नसल्यानें तो पाठ आम्हांला स्वीकाराई वाटत नाहीं.
तात्पर्य : ‘हिरण्यवर्णामिति पंचदशर्चस्य सूक्तस्य श्रीरानन्दकर्दमचिक्लीतेन्दिरासुता
ऋषय:’ असा, अथवा ‘आद्याया: लक्ष्मी; तत
आनंदकर्दमचिक्लीतेंदिरासुता ऋषय:’ असाच ऊह करणें शास्त्रीय होय.
आताम विविध कामनेकरतां पुढें दिलेल्या केवळ एकाच ऋचेचें अनुष्ठान करणें
असेल तर - पायगुंडे लिहितात - ‘प्रत्येकविधिपक्षे तु आद्याया ऋच;
लक्ष्मीऋषि: इत्येव, तदुत्तरं चतुर्दशानां ऋचां प्रत्येकमपि चत्वार
ऋषय:’ इति । आद्यऋचेचें अनुष्ठान करणें असेल तर केवल ‘लक्ष्मीऋषि:’
असा व पुढील कोणत्याही ऋचेचें अनुष्ठान करणें असेल तर
‘आनंदकर्दमचिक्लीतेंदिरासुता ऋषय;’ असा समुदित ऋषिनिर्देश करावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP