अथ हृदयादिषडंग

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


अंगन्यासे तु हृदयादिषडंग:, पंचांग:, पंचदशांग:, षोडशांगन्यासश्चेति प्रकारा उक्त ग्रंथांतरे ।
ह्र्दयादिषडंगे -  हृदयं, शिर: शिखा, कवचं, नेत्रम, अस्त्रमिति ।
‘पंचांगे नेत्रसंत्याग’  इति वचनात्‌ हृदयं, शिर:, शिखा, कवचम्‌. अस्त्रं चेति  पंचांगानि ।
पंचदशांगानि तु श्रीसूक्तन्यासे वक्ष्यंते । षोडशांगानि पुरुषसूक्तन्यासादौ प्रसिद्धानि । सविधानब्रम्हाणस्पतिसूक्तग्रंथेऽस्माभिरुक्तानि ।
बहुविधेऽपि न्यासप्रकारे सांप्र्तं प्राथ: बहवोंऽगुष्ठादि षडंगं च हृदयादिषडंगं मुख्यत्वात्‌ कुर्वन्ति ।
‘हृदयादिषडंगे च प्रोच्यंते जातयोऽथ षट्‌ ।
हृदयाय नमश्चेति शिरसे स्वाहया युतम ।
शिखायै वषडंतं च कवचाय च हुमिति ।
नेत्रत्रयाय वौषट्‌ स्यात्‌ अस्त्रायफडितीरितम्‌ ॥’
तथा स्पर्शमुद्राप्रकार:- हृद्यंगुलित्रयं न्यस्येत्तर्जन्यादिद्वयं तु के ।
शिखाप्रदेशं सांगुष्ठं दशांगुल्यस्तु वर्मणि ।
मध्यमांगलित्रयेण नेत्रललाटेषु स्पर्श: ।
तर्जनीमध्यमाभ्यां त्रि: वामकरतलसंताडनेन अस्त्रमिति सौभाग्यकल्पद्रुमे ।
‘अंगुष्ठतर्जनीशब्दो  मुद्रा स्याच्छोटिकाव्हया’- इति छोटिकामुद्रया दिग्बंधं कारयेत्‌ ।

अर्थ :--- हृदयादिषडंगन्यासप्रकार सांगतों. तत्तन्मंत्रस्थ वर्ण वा पद जें उक्तअसेल त्याचा उच्चार करून - ‘हृदयाय नम:’ असें म्हणून - तर्जनी, मध्यमाव अनामिका या अंगुलित्रयानें हृदयाला स्पर्श करावा. शिरसे स्वाहा म्हणून तर्जना, मध्यमा या अंगुलिद्वयानें मस्तकाला स्पर्श करावा. शिखायै वषट्‌ म्हणून तर्जनी, मध्यमा व अंगुष्ठ या त्रयीनें शिखास्पर्श करावा. कवचाय हुं म्हणून ‘स्कंधादारभ्य नाभ्यंत: स्पर्श:’ - दोन्ही हातांच्या अंगुलींनीं स्कंधापासून  नाभीपर्यंत स्पर्श करावा. नेत्रत्रयाय वौषट्‌ म्हणून तर्जनी, मध्यमा व अनामिका या अंगुलित्रयानें दोन नेत्र व ललाट यांना स्पर्श करावा. अस्त्राचा विधि असा :‘अस्त्राय फट्‌’ असें म्हणून

‘प्रसारिताभ्यां हस्ताभ्यां कृत्वा तालत्रयं सुधी:’

इति वचनात्‌ दोन्ही हातांनीं तीनवेळ टाळी वाजविणें, असा याचा अर्थ आहे. सौभाग्यकल्पद्रुमामध्येंतर्ज नीमध्यमाभ्यां त्रि: वामकरतलसंताडनेन अस्त्रम्‌ ॥, डाव्या हाताच्या तळावर तर्जनी व मध्यमा या बोटांनीं तीन वेळ टाळी वाजविणें, हें अस्त्रलक्षण दिलें आहे. याप्रमाणें षडंग आचरुन दिग्बंध करणें तो असा: ‘छोटिकामुद्रया सर्वा: समंताद्वंधयेद्दिश: ।’ ‘अंगुष्ठतर्जनीशब्दो  मुद्रा स्याच्छोटिकाव्हया’ - प्रक्षिणित अंगुष्ठ व तर्जनी यांनीं शब्द करणें यला छोटिकामुद्रा म्हणतात. या छोटिकामुद्रेनें पूर्वेकडून परित: चुटकी वाजविणें हे दिग्बंध करणें होय. भूतादिकांचें उत्सारण होऊन कार्य निर्विन्घपणें तडीस जावें, हा दिग्बंधनाचा हेतु आहे. येथें शंका अशी; या हृदयादि - षडंगाचे वेळीं
ह्रदय या स्थानवाचक पदाचा उच्चार करून नम: याची संयोजना केली त्याप्रमाणें शिरस्‌ इत्यादि अंगवाचकाचे वेळीं नम: याची योजना न करतां स्वाहा, वषट्‌, हुं, या निरनिराळ्या शब्दांची योजना कां? या शंकेचें उत्तर चं० दीपिकेंत दिले आहे. शास्त्रविधिवचन आहे म्हणून अशी योजना करणें हें ठिकच. पण शिरस्‌ इत्यादि स्थानीं स्वाहादिशब्दयोजनेंत फार मोठा खोल अर्थ आहे हें दाखविलें आहे.
‘तत्र द्रष्टव्यम्‌’ इति षडंग: ।
पंचांगन्यासेऽपि अयमेव विधि: ।
नेत्रत्रयाय इति तु नास्ति ।
पंचांगन्यासाचे वेळीं असाव स्पर्शमुद्रादि प्रकार आहे. त्यांत ‘नेत्रत्रयाय’ हें नाहीं. पंचदशांगन्यास पुढें प्रयोगात स्पष्ट दिला आहे. एवं सामान्यत: सर्वकर्मसु विहितस्य करादिषडंगन्यासस्य प्रकार उक्त: ।


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP