पुरश्वरणस्य द्वैविध्यम्‌

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


तत्र श्रीसूक्तस्य पुरश्चरणं द्विविधं । द्वादशसहस्रादिसूक्तावृत्त्यात्मकम्‌ - द्वादशाहस्रऋक्‌संख्यात्मकं च । आद्यं यथा - मुद्रिते - ‘श्रीसूक्तस्य समस्तस्य  पुंसा समृद्धिमिच्छता । कुर्यादर्कसहस्राणि पुरश्चर्याविद्यौ जप: ॥’ इति । अन्यत्रापि - आचम्य प्राणानायम्य थियै लक्ष्म्यै तत: परं । हिरण्यवर्णां सूक्तस्य जपं कुर्याद्यतनामस: । सर्वं जपेत्तत: सूक्तं श्रीसूक्तं शुभदं नृणाम्‌ ॥
अथवा
तिथिसंख्यानि शतानि च जपेत्सुधी: । जपेद्वापि महाप्राज्ञो रविसंख्यशतानि च ॥ सहस्रादवरा नास्ति पुरश्वर्या समीरिता । यो वै नियममास्थाय शुद्धमासे जपेन्नर: ॥ हविष्यलघुभुक्‌ धीमान्‌ यतवान्‌ संयतेन्द्रिय: । शौचाचारसमायुक्तो दुष्टक्रोधादिवर्जित: । त्यजेन्मंत्री सदा सर्वं नीचसंदर्शनादिकं । सुस्नात: सुप्रसन्नात्मा  सदाल्हादसमायुत: ॥ एवं च मंत्रवित्प्राज्ञ: कुर्यान्नित्यं जपक्रियां । पुरश्वर्याविधावेतच्छ्रीसूक्तजपतत्पर: ॥ पुरश्वर्यासुसिद्धयर्थं कुर्याद्धवनमुत्तमम्‌ । रक्ताब्जौर्बिल्वपत्रैश्च बिल्वपुष्पफलैरतथा ॥ मधुत्रयसमायुक्तैस्तत्समिद्भिश्च पायासै: । होतव्यं नियमात्तत्र सहस्नं घृतसंयुतम्‌ ॥ अन्यैर्मनोरमैर्द्रव्यै: खाद्यै: सुमधुरै: फलै: । पूर्णाहुर्ति तत: कृत्वा बलिदानपुर:सरं ॥ कुमारीणां प्रसन्नानां सुरूपाणां च नित्यश: । ब्रम्हावंशोद्भवानां चसुवाचो भाषिणां ध्रुवं ॥ सुवासिनीनां च तथा पूजनं समुदीरितम्‌ । मधुरं भोजनं देयं शर्कराघृतसंयुतम्‌ ॥ दश वा सप्त वा चाथ पंच वा तिस्र एक वा । एकाप्यशक्तेन तथा पूज्या कन्या सुवासिनी ॥ यथाशक्ति च तासाम वै दद्यात्‌ कंचुकवाससी । अलंकारादिकं चैव सुमनोमालिका: शुभा: ॥ यथाशक्त्याथवा कुर्यात सर्वमेतद्धि पूजनम्‌ । यत्कृतं जपहोमादि पूजासंतृप्तिहेतवे ॥ द्विजसंतर्पणं चव श्रियै सर्वं निवेदयेत्‌ । एवं कृते कथं न स्यु:लक्ष्मीसंपत्समृद्धय: ॥
न मुञ्चति सदा लक्ष्मीस्तन्नरं पद्मवासिनी ॥ इति ॥

श्रीसूक्तपुरश्ररण द्वादशहस्त्रादि आवृत्यात्मक द्वादससहस्रऋचा-संख्यात्मक असें दोन प्रकारचें आहे. दुसर्‍या ऋगात्मक पुरश्वरणांतही दोन भेद आहेत. ते पुढें स्पष्ट होतील.

सूक्तावृत्ति प्रकार असा :--- पूर्वोत्तरांगन्याससहित श्रीसूक्ताच्या बारा हजार आवृत्ति किंवा पंधराशें अथवा बाराशें वा सहस्त्रावृत्ति जप विधिपूर्वंक केल्यानें पुरक्षरण होतें. प्रयोग पुढें दिला आहे.

श्रीसूक्तपुरश्वरण सूक्तावृत्तिसंख्या
१२००० द्वादासहस्रावृत्तय:         
१५०० तिथिसंख्याशतानि     
१२०० द्वादशशतानि         
१००० सहस्त्रावृत्तय: इति     
    
या चार पक्षांमध्यें शेवटचा सहस्रावृत्तिपक्ष हा गौण आहे. शक्त्यनुसार यांतील कोणताही पक्ष मनांत निश्चित करावा.

उक्तमासादि शुभदिनीं ‘आरभ्य शुक्लप्रतिपद्येकाददयंतं प्रजपेन्मनुम्‌ ॥ अथवा प्रोक्तमासादौ यथेच्छं प्रजपेन्नर: ॥ ‘किंअवा ‘शुद्धमासे जपेन्नर:’ इत्यादि  राघवभट्टीय वचनानुसार आश्चिन शुद्ध प्रतिपदेला आरंभ करून एकादशीपर्यंत, अथवा कोणत्याही पुढें ‘कालविचार’ या प्रकरणांत दिलेल्या मासांमध्यें शुक्ल प्रतिपदा ते एकादशी वा कोणत्याही शुभदिनीं, शुभदिनीं, संकल्पित संख्यात्मक पुरश्वरणाला आरंभ करावा. ब्रम्हाचर्यादि यथोक्त नियमांचें यथाशक्ति परिपालन करून अनुष्ठान करावें. समाप्तिदिवशीं द्वादशीला, वा समाप्तिदिन अन्य असेल तर त्या दिवशीं, होम हवन, द्विजसंतर्पण करून, दहा, सात, पांच, तीन किंवा एक ब्राम्हाणसुवासिनी कुमारिका यांना भोजन घालून शक्त्यनुसार खण (वस्त्र) व अलंकार देऊन ब्राम्हणांना दक्षिणादानानें संतुष्ट करून आशीर्वाद घ्यावा. सर्व कर्म श्रद्धेनें करून श्रीजगन्माता म्हालक्ष्मीचे चरणीं समर्पण करून क्षमापूर्वक प्रार्थना करून कर्म पूर्ण
करावें. अनुष्ठानाचा - होमहवनाचा - विधि पुढें दिला आहे, याप्रमाणें यथाविधि अनुष्ठान केल्यानें त्याचा लक्ष्मी कधींही त्याग करीत नाहीं. याप्रमाणें यथासांग कर्मानुष्ठान पूर्ण झाल्यानें श्रीलक्ष्मी आनंदानें त्याचे घरीं वास करील. पुत्रपौत्र व धनधान्यानें तो मनुष्य समृद्ध होईल. यांत तिळमात्र शंका नाहीं.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP