पुरश्चरणकर्तुर्विशेषा:

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


गोतमीये -
पुरश्चरणकृन्मंत्री भिक्षाभक्षं विचिंतयेत्‌ ।
अन्यथा भोजनाद्दोषात्सिद्धिहानि: प्रजायते ॥१॥
शस्तान्नं चसमश्नीयात्‌ मंत्रसिद्धिसमीहया ।
तस्मान्नित्यं प्रयत्नेन शस्तान्नाशी भवेन्नर: ॥२॥
भुंजानो वा हविष्यान्नं शाकं यावकमेव वा ।
पयो मूलं फलं वापि यत्र यत्रोपलभ्यते ॥३॥
विश्वामित्रकल्पेऽपि - वैदिकैस्तांत्रिकैश्चैव अन्नशुद्धि: प्रकीर्तिता ।
अन्नानुसारि कर्माणि बुद्धि: कर्मानुसारत: ॥
अत एवान्नशोधनं कुर्यात्‌ । शूद्रान्नं शूद्रसंपर्कं शूद्रेण च सहाशनम्‌ ।
ते यांति नरकं घोरं यावच्चंद्रदिवाकरौ ॥ इति ।
सारसंग्रहे - तैलाक्तवस्तु नाश्नीयात्‌ नग्नस्तोये न संविशेत्‌ ।
अशुचिर्न स्वपेत्क्वापि नासास्याद्यशुचिर्भवेत्‌ ॥
लवणं तिलसंभूतं नाश्नीयात्केवलं सुधी: ।
लिंपेद्धरिद्रां वक्त्रे नो नानृतं प्रवदेत्‌ क्वचित्‌ ॥
कदाचिन्मलिनो न स्यात्‌ भुवं नैव लिखेद्यथा ।
श्रीफलांबुजसद्रोणा मूर्ध्नि जातु न धारयेत्‌ ॥
तथा च निर्मलाचारो युक्त: शुद्धमना भवेत्‌ ।
शुद्धमाल्यानुलेपश्च शुद्धाभरणभूषित: ॥
शुद्धवस्त्रपरीधान: शुद्धदेहस्वलंकृत: ।
उत्कृष्टगंधानुलेप: शुद्धदंतश्च सत्तम: ॥
विष्णुभक्तश्च सततं रम्यो जाप्यो भवेत्सुधी: ।
रजस्वलामेकचारां योषितं न स्पृशेदपि ॥
शांत: शुचिस्मितो वाग्मी मधुरालापवान्भवेत्‌ ।
दयार्द्रचेताराचार्यदेवातिथ्यर्चने रत: ॥
गुर्वग्निपूजानिर्तो पुण्यशीलो द्दढव्रत: ।
एताद्धशैश्व नियमैर्युक्तो लक्ष्मीं लभेत स: ॥ इति ।

नारायणीये - नाजिघ्रेन्नाक्रमेदब्जं तद्वीजं च न भक्षयेत्‌ ।
विल्वैर्न मार्जयेद्दंतान्‌ त्रिसंध्यं प्रणमेच्च तान्‌ ॥
प्रातर्भक्ष्यास्तिलाश्चैता धार्या लक्ष्मीं प्रपूजयेत्‌ ।
धारयेन्मूर्ध्नि तत्पुष्पं उत्तरे मधुरान्नभुक्‌ ॥
पायसं बिल्वबीजं च भक्षयेच्छुक्लपर्वणि ॥ इति ।
शारदातिलके अष्टमपटले - द्रोणपंकजबिल्वानि पद्भयां जातु न लंघयेत्‌ ।
सहदेवीमिंद्रवल्लीं श्रीदेवीं विष्णुवल्लभावम्‌ ॥
कन्याजम्बूप्रवालं च धारयेन्मूर्ध्नि सर्वदा ॥
अथ वर्ज्यानि - वर्जयेन्मधुरक्षारलयणं तैलमेव च ।
क्षारं च लवणं मांसं गृंजनं कांस्यभोजनम्‌ ॥
माषाढकी मसूरं च कोद्रवांश्चणकानपि ।
कौटिल्यं क्षौरमभ्यंगमनिवेदितभोजनम्‌ ॥
असंकल्पितकृत्यं च वर्जयन्मर्दनादिकं ।
मंत्रजपान्नपानीयै: स्नात्वाचमनभोजनम्‌ ॥
कुर्याद्यथोक्तविधिना त्रिसंध्यं देवतार्चनम्‌ ।
शक्त्या त्रिषवणं स्नानमशक्तो द्वे सकृच्च वा ॥
अस्नातस्य फलं नास्ति नच तर्पयत: पितृन्‌ ।
अपवित्रकरो लग्न: शिरसि प्रावृतो‍ऽपि वा ॥
प्रलपन्‌ प्रजपेद्यावत्तावन्निष्फलमुच्यते ॥ इति ॥
कुलार्णवे विशेष :--- यस्यान्नपानपुष्टांग: कुरुते धर्मसंचयम्‌ ।
अन्नदातु: फलस्यार्धं कर्तुश्चार्धं न संशय: ॥
तस्मात्सर्वप्रयत्नेन परान्नं वर्जयेत्सुधी: ।
पुरश्चरणकालेऽपि सर्वकर्मसु शांभवि ॥
जिव्हा दग्धा परान्नेन करौ दग्धौ प्रतिग्रहात्‌ ।
मनो दग्धं परस्त्रीभि: कथं सिद्धिर्वरानने ॥
अत्र परान्ननिषेधो भिक्षेतरविषय: भिक्षायां स्वसत्तोत्पादनात्‌ ।
अत एव भिक्षा नैव प्रतिग्रह: इति, योगिनीहृदये - शयीत कुशशय्यायां शुचिवस्त्रधर: सदा ।
प्रत्यहं क्षालयेत्‌ शय्यामेकाकी निर्भय: स्वपेत्‌ ॥
मैथुनं तत्कथालापं तद्नोष्ठीं परिवर्जयेत्‌ ।
असत्यभाषणं वाचं कुटिलां परिवर्जयेत्‌ ॥
वर्जयेत्‌ गीतवाद्यादि श्रवणं नृत्यदर्शनं ।
अत्यंतगंधलेपं च पुष्पधारणमेव चा ॥
त्यजेदुष्णोदकस्नानं (शक्तौ सत्यां) अन्यदेवप्रपूजनम्‌ ॥
उपास्यदेवतारूपां वा तां भावयेदित्यर्थ: ।
अन्यत्र - एवमुक्तविधानेन विलंबं त्वरितं विना ।
उक्तसंख्यं जपं कुर्यात्‌ पुरश्चरणसिद्धये ॥
देवतागुरुमंत्राणामैक्यं संभावयन्‌ धिया ।
जपेदेकमना: प्रात:कालं मध्यंदिनावधि ॥
मुंडमालायां - यत्संख्यया समारब्धं तत्कर्तव्यमहर्निशम्‌ ।
यदि न्यूनादिकं कुर्याद्दतभ्रष्टो भवेन्नर: ।
न्यूनाधिकं न कर्तव्यं आसमाप्तं सदा जपेत्‌ ॥ इति ।
न्य़ूनातिरिक्तकर्माणि न फलंति कदाचन ।
यथाविधि कृतान्येव तत्कर्माणि फलंति हि ॥
भूशय्या ब्रम्हाचारित्वं मौनमाचार्यसेवनं ।
नित्यं त्रिषवणं स्नानं क्षुरकर्मविवर्जनम्‌ ॥
नित्यपूजा नित्यदानं देवतास्तुतिकीर्तनम्‌ ।
नैमित्तिकार्चनं चैव विश्वासो गुरुदेवयो: ॥
जपनिष्ठा द्वादशैते धर्मा: स्युर्मंत्रसिद्धये ॥
सारसंग्रहे - एवं च मंत्रवित्प्राज्ञ: कुर्यान्नित्यजपक्रियां ।
पुरश्वर्याविधावेतत्‌ श्रीसूक्तजपतत्पर: । पुरश्चर्यासुसिद्धयर्थं कुर्याद्दतमनुत्तममिति ॥ इति पुरश्चरणकर्तुर्नियमा: ।

वरील वचनांचा सारांशरूपानें अर्थ देतों :--- या खालील वचनांत पुरश्चरण करणार्‍याबद्दलचे विशेष नियम सांगतों. शास्त्रकारांनी प्रथम अन्नदोषाबद्दल फार काळजी घेतली आहे. पुरश्चरण करणार्‍यानें शक्य तों भिक्षान्न सेवन म्हणून मंत्रसिद्धि शीघ्र व्हावी याकरितां पवित्र अन्न शुचिर्भूतपणें सेवावें. हविष्यान्न, कंद, मुळें, फळें व दूध (प्रकृतिस्वास्थ्य लक्षांत घेऊन) यांतून कोणताही इष्ट आहार स्वीकारावा. असें गौतम म्हणतो. विश्वामित्रकल्प म्हणतो - धर्मशास्त्र व तंत्रशास्त्रवेत्त्या पुरुषांनीं अन्नशुद्धीबद्दल फार लिहिलें आहे. अन्नानुसार बुद्धि, व तदनुसार कर्म असल्यानें सद्भावना उत्पन्न होण्याकरतां सच्छील पुरुषांचे घरचें शुद्ध अन्न शुद्धपणेंच स्वीकारावें, शूद्रसंपर्क, शूद्रान्न, वगैरे सर्वथा वर्ज्य करावें. सारसंग्रह म्हणतो - पुरश्चरणारंभ केल्यापासून पुरश्वरण संपेपर्यंत तेलकट पदार्थ खाऊं नयेत. नग्नस्नान करूं नये. शुद्धभूमीवर पवित्रपणें शयन करावें. नासिका, मुख
वगैरे इंद्रियें शुद्ध राखावीं. मीठ वर्ज्य करावें. मुखाला हळद लावूं नये. असत्य भाषण करुं नये, अपवित्र मलिन वस्त्र नेसूं नये. श्रीफल (नारळ), किंवा बेलफळ, कमळ,
द्रोणपुष्प हीं मस्तकावर कधींही धारण करूं नयेत. सदाचाररत शुद्ध मन असावें. शुद्ध गंधपुष्प आणि अलंकार धारण करावे. भगवंताकडे नेहमीं वृत्ति असावी. रजस्वला
स्त्रीचा स्पर्शं, संभाषण, अवलोकन जपकालीं करूं नये, वृत्ति शांत, हसतमुख, व मधुर भाषण करणारी असावी, देव अतिथि, ब्राम्हाण. गुरु, अग्नि यांची सेवा करावी.
यामुळें मनुष्य लक्ष्मीवान होतो. नारायणीयामध्यें - कमल. त्याचें बीज यांचें अवघ्राण करूं नये. बिल्वकाष्ठ व बिल्वपत्र यानें  दंतधावन करूं नये. यांना त्रिकाल
वंदन करावें. तीळ खावे, तीळ धारण करावे. पायस, बिल्वफळ, शुक्लपर्वणि (१)भक्षण, करावें. शारदातिलक म्हणतो - देवीव्रत धारण करणार्‍यानें द्रोणपुष्प, कमल, बिल्व यांचें उल्लंघन करूं नये. सह्देवी, इंद्रवल्ली, श्रीदेवी, तुलस, कन्या (१), जम्बू, प्रवाल हीं मस्तकावर धारण करावीं. आतां वर्ज्यावर्ज्य लिहितों - मध, क्षार पदार्थ, मीठ, तेल, मद्य, मांस, गाजर, कांस्यपात्रांत भोजन, उडीद, मसूर, कोद्रव, हरभरे, खाऊं नयेत. कुटिलवृत्ति, क्षौर, अभ्यंगस्नान, देवाला समर्पण न केलेला पदार्थ, संकल्परहित कर्म, मर्दन हीं वर्ज्य करावीं. स्नान करून यथाविधि भोजन करावें. शक्य तर त्रिकालदेवतापूजन, त्रिकालस्नान, निदान दोन वेळ किंवा एक वेळ तरी अवश्य करावें. अस्नात स्थितींत कोणतेंही कर्म करूं नये. हस्त - पाद शुद्ध असावे. मस्तकावर उष्णीष असतां, जमामध्यें संभाषण करीत केलेलें जपादिक व्यर्थ होय. कुलार्णवामध्यें - परान्न सर्वथा वर्ज्य करावें. कारण आपण ज्याचें अन्न खाऊन कर्म करतों. त्याला त्या सत्कर्माचें अर्धपुण्य जातें. हे पार्वती, परान्नानें जिव्हा दग्ध झाली आणि हस्त प्रतिग्रहानें दग्ध झाले, तसेंच मन परस्त्रीचिंतनानें दग्ध झालें तर अशा पुरुषाला सिद्धि शीघ्र कशी होणार ? योगिनीहृदयांत म्हटलें आहे - दर्भासनावर  शयन करावें. शय्या शुद्ध पवित्र असावी. शक्य तर रोज धुवावी. एकाकी झोपावें. मैथुन व तत्संबंधी गोष्टी कराव्या. गीत - वाद्य - नृत्य - दर्शन वर्ज्य करावें. या गोष्टी मन:संयम बिघडवतात. शक्ति असेल तर शीतस्नान करावें. उष्णोदकस्नान वर्ज्य  करावें. उपास्य देवतेवांचून अन्य देवतापूजन वर्ज्य करावें. याचा अर्थ अन्यदेवता हें आपले उपास्य देवतेचें रूप आहे अशी भावना ठेवून पूजन
करण्यास हरकत नाहीं. याप्रमाणें अनुष्ठानप्रसंगीं अतिशय विलंब व अति त्वर या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहेत. शांत मनानें जपानुष्ठान करावें. पुरश्वरणांत रोज जपाची जी नियमित संख्या असेल ती पूर्ण करावी. देवता, गुरु व मंत्र हीं सर्व एकरूप आहेत ही भावना ठेवावी, एकाग्र मनानें मध्यान्हापर्यंत जप करावा. पुरश्चरणाच्या रोजच्या जपसंख्येंत (शक्य तों) न्यूनाधिकपणा करूं नये, शक्य तों अनुष्ठान यथाविधि होईल अशी दक्षता असावी. भूशय्या, ब्रम्हाचर्य, मौन, श्रीगुरुसेवा, त्रिकालस्नान, क्षौरवर्जन, नित्य इष्टदेवतापूजा, नित्यदान, इष्ट देवतेचा स्तुतिस्तोत्रपाठ, नैमित्तिकार्चन, देव व गुरु यांचे वाक्यावर द्दढश्रद्धा, या बारा गोष्टी मंत्रसिद्धीला अत्यंत उपकारक आहेत. याप्रमाणें हे सर्व
विधिनियम कोणत्याही पुरश्चरणार्थ विहित आहेत. श्रीसूक्तानुष्ठान करणार्‍या पुरुषानें पुरश्चरणानुष्ठानाच्या फलसिद्धीकरतां हे नियम अवश्य यथाशक्ति आचरावे. याप्रमाणें पुरश्वरणकर्त्याचे विशेष नियम सांगितले.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP